पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर खोडवे यांचे उत्कृष्ट कार्या बदल पोलीस अधीक्षक नांदेड यांनी बक्षीस देवुन केला सन्मान...

इमेज
  By संजय चिखले मरवाळीकर नांदेड,दि.३० डिसेंबर: अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे नेमणुकीस असलेले श्री सुधीर भालचंद्र खोडवे यांनी दिनांक 10 डिसेंबर, 2024 रोजी सायंकाळी 07.30 वा. चे सुमारास नांदेड उत्तरचे आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या घराजवळील स्टेट बँकेसमोर उभ्या असलेल्या कारने पेट घेतला असता बघ्याची गर्दी जमली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर भालचंद्र खोडवे, हे तिथुन जात असतांना त्यांनी जमलेली गर्दी पाहुन सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी चारचाकी वाहन क्रमांक एमएच-20/ईई-7982 ही जळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी कोणीही मदतीला जात नव्हते अशावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन समोर असलेल्या बेकरी य आजुबाजूला असलेल्या घरातुन बकेटमध्ये पाणी घेतले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे आग बघणारे अनेक जण होते कांही तर मोबाईलमध्ये शुटींग करीत होते परंतु कोणीही ही आग विझविण्याकरीता धावुन आले नाही. आगीमुळे निर्माण होणारा पुढील अनर्थ टळला आहे. त्यांनी या पुर्वी सुध्दा उत्तम कामगीरी केली आहे. त्या...

वृत्त क्र.1232 - स्वामित्व योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप

इमेज
प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद साधतील   राज्याच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता By संजय चिखले मरवाळीकर नांदेड दि. 26 डिसेंबर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता मिळाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे या योजने अंतर्गत वितरण करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत उद्या दिनांक 27 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींना सनद वाटप होणार आहे.  लाभार्थ्यांना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार तुषार राठोड ,अन्य लोकप्रतिनिधींच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सनद वाटप करण्यात येईल. तसेच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी प्रधानमंत्री संवाद साधतील.  नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता स्वामित्व योजने अंतर्गत सनद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.  विभागात विशेष शिबिर घेवून सनद वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, महसूल, भूमीअभिलेख व अन्य विभागातील अधिकारी...

संघटन पर्व: भाजपा राष्ट्रीय सदस्यता अभियान - २०२४ अनुषंगाने भाजपा नांदेड दक्षिण ची जिल्हा कार्यशाळा संपन्न

इमेज
By संजय चिखले मरवाळीकर नांदेड,दि.२३ डिसेंबर: विष्णुपुरी, नांदेड येथील शैक्षणिक प्रतिष्ठान सहयोग कॅम्पस या ठिकाणी सोमवार, दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण जिल्हा च्या वतीने सदस्यता नोंदणी अभियानाचे जिल्हा संयोजक डॉ.माधवराव पाटील उच्चेकर यांच्या विनंतीवरून जिल्हाध्यक्ष मा.डॉ.संतुकराव हंबर्डे यांचे अध्यक्षतेखाली संघटन पर्व: भाजपा राष्ट्रीय सदस्यता नोंदणी अभियान - २०२४ अंतर्गत जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यशाळेला सुरुवात करण्या आधी दीपप्रज्वलन करून भारत माता, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारत माता की जय च्या जयघोषाने पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून विभाग संघटनमंत्री मा.संजयजी कौडगे होते, तसेच या कार्यशाळेस मा.खासदार,मा.आमदार,प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य,प्रदेश मोर्चा पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी,जिल्हा मोर्चा अध्यक्ष,आघाडी, प्रकोष्ठ, सेल जिल्हा संयोजक,मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस,माजी जि. प. सदस्य,सोशल मिडिया संयोजक,सदस...

शासन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल-डॉ हनुमंत भोपाळे

इमेज
  मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची सहविचार सभा संजय चिखले पाटील मरवाळीकर नायगाव बा.(जि:नांदेड), दि.१४ डिसें २०२४- काय गोड तर काम गोड असते. कामाला सुस्वभावाची जोड असेल आणि आपल्याकडे कौशल्य अन् क्षमता असेल तर नक्कीच भवितव्य आहे, त्यामुळे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये काम करत असलेल्या युवकांनी सकारात्मक राहून प्रशिक्षणकार्य पूर्ण करावे. नक्कीच शासन प्रशिक्षणार्थींना न्याय देईल असा आशावाद मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण संघटनेचे संस्थापक प्रोफेसर डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण राज्य संघटनेच्या वतीने नायगाव तालुक्यातील गंगणबीड येथील महादेव मंदिराच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्रातील शैक्षणिक पात्रताधारक युवक आणि युवतींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडून प्रशिक्षण घेण्याची संधी देण्यात आली आहे. बारावी पास, पदविका आणि पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा, आठ आणि दहा हजार रूपयांचे विद्यावेतन देण्याचे निश्चित केले, पण व...

रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर

इमेज
  प्रधानमंत्री फसल बीमा योजना संजय चिखले मुंबई, दि.१२ : राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्या. महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. गतवर्षी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये विमा योजनेत साधारणता ७१ लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते . स्त्रोत: महासंवाद