🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, एप्रिल ०८, २०२१

शेती नियोजनात सरपंचांची भूमिका : 'पोक्रा'द्वारे विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित गावनिहाय खरीप हंगामातील पीक नियोजनासाठी दि.8 रोजी स.10 वा.ऑनलाईन कार्यशाळा ! नवनियुक्त सरपंच,उपसरपंच,तसेच ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्य,शेतकरी यांची उपस्थिती अनिवार्य_प्रकल्प संचालक

 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्फे 'विकेल ते पिकेल' संकल्पनेवर आधारित गावनिहाय खरीप हंगामातील पीक नियोजनासाठी पुढाकार.यासंदर्भातील मोफत कार्यशाळेत ८ एप्रिलला सकाळी १० वा. सहभागी होण्याचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांचे आवाहन


खरीप हंगामाच्या नियोजनासाठी ऑनलाईन कार्यशाळा

हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी ‘पोक्रा’चा पुढाकार

महाराष्ट्र शासन व वर्ल्ड बँक यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी तथा पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित गावनिहाय खरीप हंगामातील पीक नियोजनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या संदर्भात मोफत ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

गुरुवारी, 8 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 वाजता पोक्रा महाराष्ट्रच्या https://youtube.com/c/PoCRAMaharashtra या लिंकवरून या कार्यशाळेत सर्वांना थेट सहभागी होता येणार आहे. सर्व सरपंच, उपसरपंच व ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्य व शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन पोक्राचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी केले आहे.

‘शेती नियोजनात सरपंचांची भूमिका’ या विषयावर आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ हे समृद्ध गावासाठी शेतीचे नियोजन या विषयावर, तर आयआयटी मुंबईचे प्रा. मिलिंद सोहोनी हे पाण्याचा ताळेबंद या विषयावर आणि एकूण खरीप हंगाम नियोजनाबद्दल पोक्राचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी मार्गदर्शन करणार आहेत.

त्याचबरोबर ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित पिकांचे नियोजन या विषयावर डॉ.मेघना केळकर, ‘बदलत्या हवामानात शेतीची तंत्रे’ या विषयावर कृषिविद्यावेत्ता विजय कोळेकर बोलणार आहेत.

तरी, https://youtube.com/c/PoCRAMaharashtra या लिंकवरून सरपंच, पदाधिकारी व शेतकरी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी केले आहे.

हवामान बदलामुळे जागतिक पातळीवर येणाऱ्या विविध संकटांना शेतकऱ्यांनी सक्षमपणे सामोरे जाता यावे, तसेच शाश्वत अशा हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी खरीप हंगामाचे पूर्वनियोजन महत्त्वाचे ठरते.

Tags: खरीप हंगाम

इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीने कुष्णुर येथे शेतकऱ्याच्या कच्या हळद खरेदीने शेतकऱ्यांत दिलासा_अजय बाहेती

 

नायगाव : तालुक्यातील अद्योगिक वसाहती अंतर्गत असलेल्या इंडिया मेगा ऍग्रो अनाज लिमिटेड कंपणीत मोठया प्रमाणात कच्या हळदीची कंपनीने खरीदी चालू केली असल्यामुळे शेतकऱ्यानी थेट कंपनीला पूर्वी सोयाबीन, हरबरा,ज्वारी,गहू विक्री केली तर आता कची हळद कंपनी स्वीकारत असल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला असून मेघा बनला शेतकऱ्याच्या आदचणीचा आधार असे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे 

     जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केल्यामुळे शेतकरी मोठया अडचणीत सापडला असून सदरची अडचन दूर करण्यासाठी कंपनीने मोठे पाऊल उचलले आहे शेतकऱ्याची आर्थिक अडचण दूर करुन कच्या हळदीची कंपनीने जोरदार खरीदी चालू केल्याने मेघा शेतकरी वर्गाचा सच्चा मित्र बनला आहे तालुक्यातील कुष्णुर इंडिया मेगा ऍग्रो अनाज लिमिटेड कंपनी एम आय डी सी कृष्णुर ही लॉकडाऊनच्या काळात होत असलेली शेतकऱ्याची हेळसांड लक्षात घेऊन कंपनीने शेतकऱ्याला चांगलाच आधार दिला असल्याचे जिल्ह्यतुन जनतेसह शेतकरी वर्गातून व शेतकरी संघटनेतून ही बोलल्या जात असून कची हळद शेतकऱ्याची कंपनीला थेट घेत असल्यामुळे शेतकऱ्याचा मोठा फायदा होत आहे

शेतकरी राजा आपल्या शेतात सोने पिकावित असतो कंपनीने हळदीची कॉलेटी पाहून १६०० ते २००० रुपये प्रती क्विंटल दरा प्रमाणे कची हळद खरीदी करत असल्याने हळदीला चांगला भाव दिला जात आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे. 

     या मुळे कच्या हळदीची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे कची हळद कंपनीला शेतकऱ्यानी आणून दिल्याने शेतकऱ्याला मोठा फायदा झाला आहे दैनिक पुण्यनगरी ने वर्तमान पत्रातून इंडिया मेगा ऍग्रो अनाज लिमिटेड कंपनीत कची हळद खरीदी करण्यास सुरुवात या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आल्यामुळे सदरच्या कंपनीला महाराष्ट्रासह मराठवाड्यातुन व खेड्या पाड्यातुन हळदीची आवक मोठया प्रमाणात येत असल्याचे कंपनी मालक अजय सेठ बाहेती यांनी सांगितले.

      ते पुढे म्हणाले शेतकऱ्यानी कंपनीशी संपर्क साधूनच हळद द्यावीत शेतकऱ्यानी शेतातील हळद काढल्या नंतर त्या हळदीला शिजविने, कडक उन्हात वाळू घालणे, ढोल करणे, मार्केट मध्ये घेवून जाणे असी एका महिन्याची अतोनात मेहनत शेतकऱ्याची वाया जाते आणि मजुरा अभावी शेतकऱ्यांना उत्पन्न होऊन ही घट होते आणि तोटा सहन करावा लागत होता.हा विषय लक्षात घेऊन कंपनीने कची हळद खरीदी करन्याचा घेतळवला असल्याने शेतकऱ्यांचे जिवनमान प्रफुलीत झाल्याचे दिसून येत आहे

मांजरम ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या गावात विजेचा खेळखंडोबा

 

माजरम :  तालुक्यातील विज वितरण कंपनीच्या मांजरम येथील ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या गावात गेल्या काही दिवसांपासून विजेचा अगदी खेळखंडोबा सुरू आहे.एका तासात किमान दहा वेळा विज पुरवठा खंडित होतो आहेच.या प्रकाराने अंधाऱ्या रात्री व उन्हातान्हात शेतकऱ्यांना पिकाला पाणी देणे अत्यंत अवघड झाले आहे.याकडे एम एस इ बी च्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी व ग्राहकांनी केली आहे.

नायगाव तालुक्यातील मांजरम येथे विज वितरण कंपनीचे ३३केव्ही केंद्र आहे.केंद्राच्या अंतर्गत अठरा गावे येतात.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.लाॅकडाऊन मुळे अनेकजण घरातच आहेत परंतु शेतकरी मात्र या उन्हातान्हात आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात राबत आहे.पंरतु गेल्या काही दिवसांपासून मांजरम एम एस इ बी कार्यालयात म्हणावे तसे नियोजन नसल्याने येथील वीज केव्हा ही गुल होते व लगेच येते. विजेचा सारखा लपंडाव सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देणे अत्यंत अवघड झाले आहे.एका तासात किमान पाच-दहा वेळा विज जाते-येते या प्रकारामुळे विजेची उपकरणे जळून जात आहेत.

मार्च महीन्यात मार्च एण्डींग च्यानावाखाली वितरण कंपनीने घरगुती विज बिलाची वसुली कडकपणे केली मात्र लाॅकडाऊनमध्ये विजपुरवठा खंडित करण्याची समस्या निर्माण झाली आहे.विजेचा वापर जास्त वाढल्याने समस्या निर्माण झाली आहे असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.एका बाजूने सरकार लॉक डाऊन मध्ये सरकारने वीज बिल दिलेल्या वंचना प्रमाणे वीज बिल माफ करणे लांब च राहिले उलट वीज पुरवठा सुरळीत न देणे जोमाने चालू आहे.या मुळे येथील नागरिकांना एकच गाणे म्हणण्याची वेळ आली आहे.

    ति येतें आणिक जाते

       येताना प्रकाश आणते

 जाताना अंधकार करिते

  असे म्हणण्याची वेळ मांजरंम विभागातील प्रत्येकनागरिका वर आली आहे. अनेक जण लोकडाऊन मध्ये विजेच्या उपकरणाच्या वर आवलंबुन आहेत या मुळे वापर जास्त, वीज जाण्याचं प्रमाण ही जास्त अशी अवस्था झाली आहे. वैतागलेल्या शेतकरी पुत्रा कडून राग अनावर होत असून शेतकर्या च्या वतीने रुमने हातात घेऊन आंदोलन करण्याची भाषा सोशियल मीडिया च्या माध्यमातून भावणाचा उद्रेक व्यक्त होत आहे.

नायगावच्या कोवीड सेंटर येथील रुग्णांसाठी उद्योगपती आजय बाहेती यांच्याकडून 150 बिस्कीट बॉक्स चे वाटप डॉक्टर,रुग्णांकडू बाहेती यांचे कोतुक

 


नायगाव ,दि.7 एप्रिल :  तालुक्यातील अद्योगिक वसाहतीत असलेल्या व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनी एम आय डी सी  कृष्णूर या कंपनीचे मालक तथा चेअरमन अजय बाहेती यांच्या कडून नायागांवच्या कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी कंपनीच्या वतीने मोफत दिडशेएव्हरप्रेश बिस्कीटचे बॉक्स मंगळवारी वाटप करण्यात आले आहेत.या मुळे कोरोनाग्रस्त पालक,बालक व रुग्ण व  डाकटर यांनी या निर्णयाचे स्वागत व आभार व्यक्त केले आहे.

नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील कंपनीचे मालक अजय बाहेती यांच्या कडे तालुक्यातील जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे हे हळद विक्रीच्या सौदया च्या निमित्ताने गेले असता बाहेती यांच्या डोळस विचाराची जाणीव ठेवून कोव्हिडं सेंटर साठी काही तरी करावे असा प्रस्ताव पांडे यांनी ठेवला. बाहेती यांनी तात्काळ मान्यता दिल्या नंतर कोव्हिडं सेंटर प्रमुख डाँ देवणीकर साहेब यांचे बोलणे करून दिले.बाहेती यांनी तात्काळ मान्यता दिली.

या नुसार कोरोना ग्रस्त रुग्णाची तब्येत टवटवीत झाली पाहिजे या हेतूने एकूण १५० बिस्कीटचे बॉक्स वाटप करण्यात आले.रुग्णालयातील उपचार घेत असलेले रुग्णासह जनतेतून अजय बाहेती यांचे पाच दिवस पुरतील असे बिस्कीट डब्याचे वाटप केल्यामुळे कोरोना रुग्ण यांनी अतिशय समाधान व्यक्त केले असून नाश्ता, जेवण मागे पुढे झाले तर यांचे एव्हरप्रेश बिस्कीट ऊर्जा देत असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना समाधान व्यक्त करून बाहेती यांचे अभिनंदन केले आहे

कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ  हनुमंत.गुंटूरकर, डॉ नरेश देवनीकर,डॉ .अविनाश पांढरे कौठाळकर , यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून,डाँ पांढरे,डॉ वाघमारे,डॉ बिडवई,डॉ ताटे,डॉ गजले,डॉ त्रिपती बिराजदार,डॉ धनश्री शिंदे,डॉ अंजेली खंडगावकर,डॉ  वर्षा नारे,डॉ गजानन बोधने,डॉ शिल्ला पेंटे,डॉ नर्स रेखा खेटाळे, करुणा मोदलवाड, महानंदा कोंके, करुणा आडपलवाड, पूजा सूर्यकार, आदीची यावेळी उपस्थिती होती.

कामठा खु. उपकेंद्राअंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य ; आरोग्य कर्मचाऱ्यांचा ब्राम्हणवाडा येथे सत्कार

नांदेड ,दि 7 एप्रिल : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वडगांव अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कामठा (खु.) येथिल आरोग्य अधिकारी व कर्मचारी कोरोना काळात उत्कृष्टपणे काम करित असून आज त्यांच्या कार्यक्षेञातील मौजे ब्राम्हणवाडा येथील नागरिकांनी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कोरोना प्रतिबंधक लसीकरणादरम्यान त्यांचा सत्कार करुन त्यांच्या कार्यास प्रेरणा दिली.

   प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.विजय कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कामठा (खु.) अंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक जागृती व लसीकरण स्थानिक अधिकारी व कर्मचारी कर्तव्यतत्परतेने करित आहेत.उपकेंद्रात तसेच, कार्यक्षेञातील गांवात जाऊनही हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 लसीकरणाच्या सुरुवातीस आज जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ब्राम्हणवाडा येथील स्थानिक सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांकडून या कोरोना योद्धे असलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपकेंद्राच्या सिएचओ डाॅ.फराह तन्वीर,आरोग्य पर्यवेक्षक टि.एल. डोईबळे, कंञाटी ए.एन.एम.श्रीमती एस. यु. शेगावकर आदींसह उपस्थित आरोग्य अधिकारी,कर्मचारी, आशा स्वयंसेविका,अंगणवाडी कर्मचारी आदींचा सत्कार ब्राम्हणवाडावासीयांकडून करण्यात आला.

याप्रसंगी उपसरपंच एकनाथ ब्राम्हणवाडेकर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी कामठा उपकेंद्रांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी,आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी यांचेकडून सद्या कोरोना काळात यशस्वीपणे व कर्तव्यतत्परतेने होत असलेल्या कामाचे कौतुक केले.

   कामठा (खु.) आरोग्य उपकेंद्र अंतर्गतच्या ब्राम्हणवाडासह सर्वच गांवातील नागरिकांकडून शासन निर्देश व आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घेणे आणि मास्क- सॅनिटायझर, सामाजिक अंतर या ञिसूञी पालनाचे आवाहन उपस्थित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी केले.

Popular posts लोकप्रिय पोस्ट