बंडातात्या कराडकर पोहोचले देहूच्या वेशीवर
मात्र वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर तीन वाजल्यापासून आंदोलन सुरु करण्याची घोषणा केलीय.
ही घोषणा करताना त्यांनी वारकरी संप्रदायाची मुस्कटदाबी अशापद्धतीने किती दिवस करणार आहात?
असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे.
"यंदा देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे,”
असं बंडातात्या कराडकर यांनी दीड आठवड्यापूर्वी सातारा येथे म्हटलं होतं.
हीच भूमिका कायम असल्याचं बंडातात्यांनी स्पष्ट केलं आहे.
“आमच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत.
देहूकरांनी कोणती भूमिका घ्यावी त्याचं स्वातंत्र्य देहूकरांना आहे.
हा वैयक्तिक निर्णय आहे असं जेव्हा देहूकर म्हणतात तेव्हा या निर्णयाला महाराष्ट्राने पाठिंबा दिला.
आता नागपूर, वर्धा येथून सुद्धा वारकरी भावीक उन्हातान्हामध्ये उभे आहेत वैयक्तिक निर्णयाला एवढा प्रतिसाद कसा देतो.
हा वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषय असल्याने हा वैयक्तिक निर्णय आहे,
असं विधान देहूकर कसं काय करु शकतात?,”
असा प्रश्न बंडातात्यांनी उपस्थित केलाय.
व्यवस्थापन देहूच्या आत असून आम्ही देहूच्या वेशीवर आंदोलन करणार आहे
असंही बंडातात्यांनी स्पष्ट केलं आहे.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇 लेटेस्ट न्यूज अपडेट पाहण्यासाठी गुगलवर सर्च करा
www.nandednewsupdate.blogspot.com
सापळा कारवाई अहवालासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
👊1️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)



