🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, डिसेंबर ०८, २०२१

भीषण अपघात : सिडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश;11 जणांचा मृत्यू

सीडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश, सोबत होते पत्नी सह 14 जण;11 जणांचा मृत्यू.

  • मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडला. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत आणि त्यांची पत्नीही होती.
  • संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना संपूर्ण घडामोडींची माहिती दिली असून मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.
  • संरक्षण मंत्री राजनाथसिंह सिडीएस बिपिन रावत यांच्या घरी दाखल.

तामिळनाडू,दि.08 डिसेंबर 2021 : तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सांगण्यात येते, की सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते.जखमींना वेलिंग्टन बेसमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते.या अपघातात 3 जण जखमी झाल्याची माहिती होती.परंतु आताच मिळालेल्या माहितीनुसार 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
खराब हवामानामुळे हा अपघात घडला आहे की हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने ही भीषण दुर्घटना घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.वायुदल प्रमुख दुर्घटने स्थळी रवाना झाले आहेत.दरम्यान, या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत निवेदन देणार आहेत.
तसेच,संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना संपूर्ण घडामोडींची माहिती दिली असून मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.

Mi-17V5 हेलिकॉप्टरमधील सर्व जखमींना अपघातस्थळावरून बाहेर काढण्यात आले आहे. सीडीएस रावत हे वेलिंग्टनमधील डिफेन्स स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. जनरल रावत यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले. 
मिळालेल्या माहितीनुसार, स्टाफ कॉलेज वेलिंग्टनमध्ये सीडीएस बिपिन रावत यांचे दुपारी 2.45 वाजता व्याख्यान होते. ते दिल्लीहून सुलूर फिक्स्ड विंगमध्ये गेले. सुलूर ते वेलिंग्टन हे अंतर 53 किलोमीटर होते. त्याचवेळी कुन्नूर ते वेलिंग्टन हे अंतर केवळ तीन किलोमीटर होते आणि निलगिरीच्या जंगलात हेलिकॉप्टर लँडिंगपूर्वीच कोसळले.


 

भास्करराव धर्माधिकारी आगामी काळातील बरबडा जिल्हा परिषदच्या निवडणुकीत संधी मिळाल्यास इच्छुक


रुई वार्ताहर (माधव पवार)

रुई बु. नायगाव,दि.०८ डिसेंबर २०२१ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकररावजी चव्हाण यांच्या काळापासून महोनराव गंगाजीराव धर्मधिकारी बरबडेकर यांचे अतिशय निकटचे संबंध होते आणि गेल्या पन्नास वर्षाखाली महोनराव धर्माधिकारी यांनी दिवंगत शंकरराव चव्हाण यांना काहाळा येथून बरबडा येथे घोड्यावर बसून आणले होते आणि गावांत बैलगाडीवर चव्हाण यांची मिरवणूक ही काढण्यात आली होती बरबड्याचे दिवंगत महोनराव गंगाजीराव धर्माधिकारी यांचे चिरंजीव भास्करराव महोनराव धर्माधिकारी यांनी आगामी काळातील बरबडा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जर सर्वसाधारण पुरुषासाठी सुटल्यास काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास भास्करराव धर्माधिकारी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे
तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले भास्करराव महोनराव धर्माधिकारी यांचे वडील मोहनराव धर्माधिकारी हे दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या सानिध्यात राहून गावच्या विकासासाठी प्रयत्न केले असल्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विचाराने नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे काँग्रेस पक्षाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करीत असल्यामुळे व माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी मदेवाड बरोबर एकनिष्टीने काँग्रेस पक्षाचे कान करत असल्यामुळे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची संधी दिल्यास निवडणूक लढवू असे ही भास्करराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी सांगितले आहे

Popular posts लोकप्रिय पोस्ट