🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, एप्रिल ०२, २०२१

महा ई-सेवा केंद्राच्या लाचखोर केंद्र चालकाविरुद्ध तक्रार दिलेला तक्रारदार निघाला फितुर!मग काय?फितूर तक्रारदाराला न्यायालयाने दिली ०२ महीने सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा

 

जळगाव, : तक्रारदार विशाल पंडीत सोनवणे याला आधारकार्ड काढायचे असल्याने तो महा ई-सेवा केंद्र,जामनेर रोड, बोदवड येथे गेेला. तेंव्हा तेथील निलेश देशमुख व चंद्रकांत नामदेव महाजन,ऑपरेटर यांनी आधारकार्ड काढण्यासाठी १६० रुपये लाचेची मागणी केल्याने त्याने ला प्र.वि जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी वरुन सापळा कारवाई करण्यात आली.दोन्ही आरोपीतांवर अति. जिल्हा व सत्र न्यायालय, भुसावळ येथे स्पेशल केस नं १२/२०१५ अन्वये खटला दाखल करण्यात आला होता.

सदरच्या केस मध्ये तक्रारदार विशाल पडीत सोनवणे याची मा. न्यायालयात साक्ष घेण्यात आली. सदर केस मध्ये त्याने खोटी साक्ष दिल्याने सदरची केस ही दि.१३/०१/२०२० रोजी मा. न्यायालयाने निर्दोष केली आहे.


त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर केस मधील फितुर तक्रारदार याचेवर कार्यवाही होण्यासाठी विजय खडसे, सरकारी अभियोक्ता, भुसावळ यांना विनंती केली. त्यानुसार सदर गुन्हयातील तक्रारदार विशाल पंडीत सोनवणे रा, बोदवड याचेविरुध्द मा.न्यायालयात्त खोटी साक्ष दिल्यावरुन CRPC 344 प्रमाणे मा. न्यायालयात दि.११/०२/२०२० रोजी खटला दाखल करण्यात आला. सदरची केस मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. एस.बी.भंसाली यांचे न्यायालयात चालवून दि. २५/०३/२०२१ रोजी फितुर तक्रारदार विशाल पंडीत सोनवणे याला मा. न्यायालयाने दोषी ठरवून त्याला ०२ महीने सश्रम कारावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा दिली.

२५ - मार्च - २०२१ भुसावळ सेशन कोर्ट फिर्यादी फितूर झाल्याने फिर्यादीस शिक्षा जि. जळगाव

टोल फ्री क्रमांक : १०६४

www.acbmaharashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇 लेटेस्ट न्यूज अपडेट पाहण्यासाठी गुगलवर सर्च करा

www.nandednewsupdate.blogspot.com

सापळा कारवाई अहवालासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

👊1️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊2️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊3️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)




माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ई-ऑफिस प्रणालीचे सादरीकरण : ई-ऑफिस प्रणाली वापरण्यास सोपी आणि सुलभ असावी–मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माहिती तंत्रज्ञान विभागाने ई-ऑफिस प्रणाली अधिक सोपी, सुटसुटीत आणि वापरण्यास सुलभ करावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्यासमोर ई-ऑफिस प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, संचालक माहिती तंत्रज्ञान श्री. रणजित कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.
ज्या विभागात मोठ्या प्रमाणात नस्त्यांची निर्मिती होते त्या विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचना करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, ई-ऑफिस प्रणालीचे सर्व विभागांच्या सचिव आणि संबंधित मंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात यावे. त्यांच्या सूचनाही घेण्यात याव्यात. ई-ऑफिसच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयात येणारा पत्रव्यवहार हाताळताना संबंधितांना त्यासंबंधीच्या सूचना व त्यांनी पाठवलेल्या पत्रावरची कार्यवाही कळवली जावी. ही ई-ऑफिस प्रणाली सुरक्षित आणि परिपूर्ण असावी असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले.

विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी 15 शासकीय विभागांच्या 1500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई -ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती दिली.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇 लेटेस्ट न्यूज अपडेट पाहण्यासाठी गुगलवर सर्च करा

www.nandednewsupdate.blogspot.com

सापळा कारवाई अहवालासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

👊1️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊2️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊3️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)


Popular posts लोकप्रिय पोस्ट