🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, जून ०५, २०२१

आळंदी येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण


बिलोली,दि 5 जून : तालुक्यातील आळंदी येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्राम पंचायत कार्यालयासमोर आणि जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षलागवड करण्यात आली.

      दि 5 जून रोजी आळंदी येथे ग्राम पंचायत कार्यालयासमोर सरपंच प्र.श्री मारोती धर्मकरे, उपसरपंच प्र. बाळासाहेब चट्टे, ग्राम पंचायत सदस्य विश्वनाथ अब्दागिरे, राजेंद्र चट्टे, आनंदराव नायगावे, उज्वल चट्टे, संतोष जुकरे, नामदेव चिदमलवाड, बाबूसाब शेख, ग्रामसेवक श्री नागेश पाटील चोंडे, आळंदीकर एच एल. नर्सिंग बळते, विठ्ठल झेले, पांडुरंग वजरगे आदी उपस्थित होते. 

     जिल्हा परिषद प्रा शाळेच्या आवारात मुख्याध्यापक सलीम शेख व सहशिक्षक चंद्रकांत दुडकावार, व मनोहर जोगे आदींनी वृक्षारोपण केले.






जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मरवाळी ग्रामपंचायत अंतर्गत वृक्षारोपण




नायगाव,दि 5 जून : तालुक्यातील मरवाळी येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षलागवड करण्यात आली आहे.
आज जागतिक पर्यावरण दिवस आहे,आज दिनांक 5/6/2021 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रा.पं कार्यालय मरवाळी अंतर्गत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा,समाजमंदीर व आवास योजना घरकुल लाभार्थ्याच्या घरासमोर वृक्षारोपण करण्यात आले

     जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात केंद्रप्रमुख अशोक पवळे,मुख्याध्यापक मधूकर एच पवळे, सहशिक्षक जाधव सर, पवार सर,गिरी सर, नामदेव लोहकरे तसेच ग्रामसेवक निलेश एच कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले आहे.
तसेच समाजमंदिर परिसरात व प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांच्या घरासमोर ग्रामसेवक निलेश एच कुलकर्णी,रोजगार सेवक राजेश वाघमारे व पंप ऑपरेटर बालाजी मुदखेडे यांच्या द्वारे वृक्ष लागवड करण्यात आली





जिल्ह्यात दहा हजार वृक्षरोपन करण्याचा संकल्प ऑल इंडीया तन्जीम ए इन्साफ चा स्तुत्य उपक्रम

 


नांदेड,दि 5 जून : नांदेड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी सामाजिक संघटना ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ नांदेड च्या वतीने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने व वृक्षसंगोपणासाठी नांदेड येथील ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ चे नांदेड जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण नांदेड जिल्ह्यात १० हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प केले असल्याची माहिती दिली आहे.

       या सामाजिक संघटनेचे जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी व प्रशासनास सहकार्य करण्याचे अनेक कामे हाती घेवून यशस्विरीत्या पार पाडले आहेत विशेष करुन कोरोना संकटसमयी काळात रक्ताचा तूटवडा भासू नये म्हणून जिल्हास्तरीय व देगलूर येथे रक्तदान शिबिर राबवून कौतुकास्पद कार्य केले आहेत.

दरम्यान आज संघटनेतर्फे संपुर्ण नांदेड जिल्ह्यात दहा हजार वृक्षरोपण करण्याचा संकल्प केला असून वृक्षरोपणास वृक्षसंगोपनही काळजीपुर्वक करणार असल्याची माहिती दिली आहे.

'शिवस्वराज्य दिन' जाहीर निमंत्रण ! ६ जून रोजी स.९:०० वा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन उभारण्यात येणार "स्वराज्यगुढी" या मंगलमय प्रसंगी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय

 

स्वराज्यगुढी

दिनांक 5/6/2021


'शिवस्वराज्य दिन' जाहीर निमंत्रण


मौजे मरवाळी येथील सर्व जनतेस कळविण्यात येते की, शासन परीपत्रक क्रमांक संकीर्ण - 2020 / प्र.क्र. 100 / आस्था - 5 बांधकाम भवन, मुंबई दिनांक 1 जानेवारी 2021 अन्वये ग्रामपंचायत कार्यालय मरवाळी ता. नायगाव जि. नांदेड येथे दिनांक 6/6/2021 रोजी सकाळी ठीक 9 वाजता "शिवस्वराज्य दिन" साजरा करावयाचा असून या मंगल प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन 'स्वराज्यगुढी' उभारण्यात येणार आहे.

तरी या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

ग्रामसेवक

ग्रामपंचायत कार्यालय मारवाळी/कोपरा

ता:नायगाव, जि:नांदेड

सूचना : सदर कार्यक्रमास उपस्थित राहताना कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे ही विनंती.



स्वराज्य म्हणजेच रयतेचे राज्य हा मुलमंत्र


प्रामाणिकपणे अंमलात आणण्याची गरज

- पालकमंत्री अशोक चव्हाण  

जिल्हा परिषदेत उभारली भगव्या स्वराज्य ध्वजासह

 शिवशक राजदंड स्वराज्यगुढी




नांदेड, दि. 6 (जिमाका,नांदेड):- छत्रपती शिवाजी महाराजाची स्वराज्याची संकल्पना आणि त्यांची दूरदृष्टी ही युगानुयुगासाठी प्रेरणादायी आहे. स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य हा लोककल्याणकारी वारसा त्यांनी आपल्याला दिला आहे. हाच त्यांचा मुलमंत्र होता. स्वराज्यातील शेतकरी, मजूर आणि गोरगरिब आणि बहुजनांना न्याय मिळावा याची त्यांनी सदैव दक्षता घेतली. जाती-पातीवरुन, धर्मावरुन त्यांनी भेदभाव केला नाही. 18 पगड जाती आणि सर्वच धर्मातील शिलेदार यांना सोबत घेवून त्यांनी स्वराज्य उभारले. स्वराज्याचे हे मूलतत्त्व आजही मोलाचे असून यातूनच सर्वांच्या सर्वांगिण विकासाचा मार्ग अधिक दृढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
शिवस्वराज्य दिनानिमित्त त्यांनी आज जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून शुभेच्छा दिल्या.

शिवस्वराज्य दिनाचा मुख्य समारंभ आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी यवनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, शिक्षण सभापती संजय बेळगे, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाबाई बेटमोगरेकर, माजी आमदार हणमंराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे आदि विभाग प्रमुख उपस्थित होते.

मागील 14-15 महिन्यांपासून आपण सर्व कोरोनाशी लढत आहोत. सुरुवातीला काही काळ आपण नांदेड जिल्ह्यात याचा शिरकाव होवू दिला नाही. नंतर मात्र याचा महाभयंकर प्रकोप अनुभवला जिल्हा मुख्यालयातील प्रशासकीय यंत्रणेपासून आपल्या ग्रामपंचायत पातळीपर्यंत एकत्र होवून सर्व विभाग व विशेषत: आरोग्य विभागाने कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याचे काम केले आहे. यात अनेक ग्रामपंचायती स्वत:हून पुढे येत त्यांनी त्यांचे व्यवस्थापन पणाला लावले. जवळपास 1 हजार 900 लोकांनी यात प्राण गमावले आहेत. अशा या आव्हानात्मक काळात शिवस्वराज्यातील दक्षतेचा आणि खबरदारीचा मंत्रही आपल्याला यापुढील काळात अधिक जबाबदारीने जपावा लागणार असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील अनेक व्यवस्थापनांना शासनाच्या निर्देशानुसार अनलॉक करित असतांना आता प्रत्येकाची जबाबदारी वाढली असून ग्रामीण भागासह महानगरातील नागरिक यात खबरदारी घेवून सहकार्य देतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Popular posts लोकप्रिय पोस्ट