![]() |
| अनोखा प्रेम विवाह |
गंगाखेड,(दि.२० फेब्रुवारी) :- प्रेम आंधळं असतं प्रेमाला भाषा सीमा यांच बंधन नसते हे अधोरेखित करणारी घटना गंगाखेड पोलीस ठाण्यात घडली.मुलगी यामीण लक्ष्मण सोनवने रा. मध्य प्रदेश आणि मुलगा अर्जुन माधव शिंदे रा गंगाखेड महाराष्ट्र यांचे फेसबुक वर ओळख आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात मागील सात आठ महीन्या पुर्वी झाले.मुलगी मध्ये प्रदेश मधून नागपूरला आली आणि मुलगा गंगाखेड मधून नागपुरला मुलीला भेटायला गेला भेट झाली. आणि नागपूर येथून मुलीला घेऊन गंगाखेड येथे आले. अचानक एक जोडपं ठाण्यात येतं आणी आम्हाला लग्न करायचं आहे आमच लग्न लावुन द्या म्हणतं पोलीस ठाण्यात . त्यांना पोलीस चौकशी करतात तुम्ही कुठले आणी कुठून आलात कुटुंबातुन कोणी सोबत आहे का.कोणासोबत पळुन आलस की आणलय याची चौकशी केली असता मुलगी मध्यप्रदेश मधील बर्हानपुर जिल्ह्य़ातील नेपानगरची असल्याचे कळताच पोलीसांनी बर्हानपुर पोलीसाना यामीनी या नावाची मुलीची मिसिंग आहे का याची चौकशी केली असता नेपानगर येथून मुलगी दुकानात जाते म्हणून घरातुन निघुन गेल्याची तक्रार दाखल असल्याचे कळताच गंगाखेड पोलीसांनी मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना गंगाखेड येथे बोलावुन घेतले. कुटुंबीयांनी मुलीला परत घरी नेण्यासाठी विनवनी केली पण आपल्या प्रेमाला सोडुन मी आता कुठेही जाणार नाही मला जबरदस्तीने पाठवले तर मी आत्महत्या करीन असी धमकी दिल्याने अखेर या जोडप्याला लग्नाच्या बेड्या ठोकण्याचा निर्णय पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी घेतला आणी सुरु झाली लग्नाची तयारी.
यामीनी लक्ष्मन सोनवने वय २० वर्ष नेपा नगर जिल्हा बह्रानपुर राज्य मध्येप्रदेश व अर्जुन माधव शिंदे वय २४ वर्षे राहणार मन्नाथ नगर गंगाखेड, ता.गंगाखेड जि.परभणी महाराष्ट्र यांचे लग्न शहरातील चिंतामणी मंदिरात ए. पी. आय. कोकाटे, बीटजमादार रंगनाथ देवकर, मेजर पो. का. सुग्रीव सावंत, पत्रकार भिमराव कांबळे, पत्रकार शिवाजी कांबळे, व मुलाचे मित्र आई वडील यांच्या उपस्थितीत लावुन तालुका संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत पुढील काही काळ या जोडप्यावर देखरेख असणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यानी दिली.
सोशल मिडीयामुळे अख्खे जग माणसाच्या मुठीत सामावले आहे.
एकंदरीत काय तर प्रेमाला वय. भाषा. प्रांत जात याचे बंधन नसते हेच खरे.
👇लग्नाचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇Explore live radio by rotating the globe
👇Radio Stations – Saptarang Creation Ned.
http://saptarangcreation.com/radio-stations/
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा