🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, मे २०, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर मुख्याध्यापक 400 रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने लाचखोराविरुद्ध केला गुन्हा दाखल



*== प्रेसनोट ==*

*लाचेची मागणीवरून गुन्हा दाखल केले अहवाल*

▶️ *युनिट -* पालघर

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-53 वर्षें,  

▶️ *आरोपी-* चंद्रकांत विष्णु जाधव, मुख्याध्यापक, मासवन हायस्कूल मासवन, ता.जि. पालघर             

▶️ *लाचेची मागणी-* ४००/- रुपये

▶️ *लाचेची मागणी -* ता.०८/०२/२०२१

▶️ *लाचेचे कारण -*. तक्रारदार हे पेशाने प्रयोगशाळा सहायक असून आलोसे यांनी तक्रारदार यांचे पगार बिल तयार करण्यासाठी तसेच सातव्या वेतन आयोगाचे फरकाचे बिल तयार करण्यासाठी ३५०/- रु. मागणी करत असल्याचे तक्रारीवरून पडताळणी करण्यासाठी दि.०८/०२/२०२१ रोजी तक्रारदार यांना पंच क्र 1 यांचेसोबत आलोसे यांचे कार्यालयात पाठवले असता आलोसे यांनी तक्रारदार यांना ४००/- रु. लाचेची मागणी केली. दि ०९/०२/२०२१ रोजी लाचेची रक्कम घेऊन आरोपी यांच्याकडे देण्यास गेले असता आरोपी यांनी लाचेचा स्वीकार केला नाही म्हणून मा.पोलीस अधीक्षक ठाणे याचे आदेशानुसार आज दि.२०/०५/२०२१ रोजी १४.१७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.                                 

▶️ *पडताळणी पथक -* भारत साळुंखे पोलीस निरीक्षक, मपोह/मांजरेकर, पोना/सुतार, पोना/ सुमडा, पोना/चव्हाण , पोशी/ उमतोल, चापोशि/ दोडे,                                           

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी -* 

शिक्षणाधिकारी पालघर 

----------------------------------------


*पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर 

*@ दुरध्वनी 02525-297297*

*पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप *मोबा.क्रं*9923346810*

*पोलिस निरीक्षक भारत साळुंखे मो.नं.9923699430*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

====================

ब्रेकिंग न्यूज-लाच प्रकरण : महा लाचखोर पोलीस उप-विभागीय अधिकारी (dysp) 5 लाख लाचेची मागणी करून 2 लाख लाच स्वीकारताना चतुर्भुज ! एसीबीच्या पथकाने महा लाचखोरासह लाचखोर पो.नाईक व लाचखोर पो.कॉन्सटेबल ला रंगेहात पकडून केले जेरबंद

 



➡ घटक :- पुणे

➡ तक्रारदार :- पुरुष वय-55 वर्ष.

➡ आरोपी लोकसेवक :- 1) सुधीर अशोक खिरडकर (डिवायएसपी) वय 45, पोलीस उपविभागीय अधिकारी. जालना, जि. जालना.रा.प्लॅट नं.सी 202, ॠषीपार्क, अंबडचौकी, जालना,वर्ग 3

2) संतोष निरंजन अंभोरे वय .45 वर्ष. 

पो.ना.246 नेम.कदिम पो.स्टे. जालना. रा.पोलीस लाईन जालना.

3) विठ्ठल पुंजाराम खार्डे

पो.काॅ./162 नेम.एस.डी.पी.ओ.जालना कार्यालय

रा. मु.पो. कडवंचीवाडी, ता. जि. जालना.

पडताळणी दिनांक :- 18/5/2021, 19/05/2021

➡️सापळा दिनांक :-

 20/5/2021       

➡️ लाच मागणी :- रु. 5,00,000/- 

तडजोडीअंती मागणी 3,00000/-  

➡️ लाच स्विकारली :- रु. 200,000/- 

➡ हकीकत :- तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी आलोसे यांनी 5,00,000 रु. लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 300,000 रु. लाच रक्कम मागणी करुन, प्रोत्साहन देवुन, 200000/- रुपये. लाच रक्कम आलोसे क्रं.2 यांनी स्वीकारले असता, त्यांना रंगेहाथ पकडले आहे. 

महा लाचखोर dysp

➡ सापळा पथक : -

पो उप अधीक्षक. श्रीमती. वर्षांराणी पाटील,

पोलीस निरीक्षक. 

सुनील क्षीरसागर, 

पो.हवा. नवनाथ वाळके,

पो.कॉ. किरण चिमटे

पो.काॅ. दिनेश माने, ला.प्र.वि. पुणे.


पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ला.प्र.विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, आपणास कोणी सरकारी नोकर अथवा खासगी इसम सरकारी कामाकरीता लाच मागितली तर अँटी करपशन ब्युरो पुणे येथे संपर्क साधावा.

लाच प्रकरण : महा लाचखोर वन परिमंडल अधिकारी,लाचखोर महिला वनरक्षकासह अन्य एका लाचखोर वनरक्षकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात, एकूण लाचखोरांची संख्या तीन


नाशिक, दि. 20 : वनक्षेत्रातून पाण्याची पाईपलाईन घेण्यासाठी खोदलेल्या चरीबाबत कारवाई न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वणी (ता. दिंडोरी) येथे कार्यरत वन विभागातील त्रिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

तक्रारदाराने त्याच्या चिंचखेड गावातील शेतजमिनीचे बाजूस असलेल्या वनक्षेत्रातून पाण्याची पाईपलाईन घेण्यासाठी चारी खोदली होती. त्याप्रकरणी तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी वन परिमंडल कार्यालयाकडून एक लाख रूपयांची लाच मागण्यात आली. तडजोडीअंती ही रक्कम पन्नास हजार ठरवण्यात आली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून सापळा रचण्यात येऊन वन परिमंडल अधिकारी अनिल चंद्रभान दळवी, वनरक्षक उस्मान गणी गणीमलंग सय्यद आणि वनरक्षक सुरेखा अश्रुबा खजे यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आला. या तिघांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे २००० रुपये तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत? येथे करा तक्रार...

 


By संजय ब्रम्हानंद पाटील चिखले
नवी दिल्ली,दि 20 मे 2021 : नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारत सरकारने शेतकर्‍यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील ६ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर २००० रुपये पाठविले आहेत. तथापि, जर या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू शकता. केंद्र सरकारने सुरू केलेली ही सर्वात मोठी शेतकरी संबंधित योजना आहे आणि प्रत्येक शेतकर्‍याचा फायदा व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, जेणेकरून शेती संकट संपेल.सर्व प्रथम  आपल्याला आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल.जर हे लोक आपले म्हणणे ऐकत नसतील तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता.

   सोमवार ते शुक्रवार या काळात पंतप्रधान-किसान हेल्प डेस्क (पीएम-किसान हेल्प डेस्क) वर ईमेल (ईमेल) pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधता येईल. तेथूनही  काही फरक पडत नसेल तर या सेलच्या फोन नंबर 011-23381092 (डायरेक्ट हेल्पलाइन) वर कॉल करा.

   केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे कोणत्याही शेतकऱ्याच्या बँक खात्यात पोहोचले नाहीत तर ते सोडले जातील. तसेच चौधरी म्हणतात की, जर पैसे शेतकर्‍याच्या खात्यावर पोहोचले नाहीत किंवा तांत्रिक अडचण आली असेल तर तो प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडविल्या जाईल. ते म्हणाले, 'आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा मिळाला पाहिजे, म्हणूनच सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत वचन दिल्याप्रमाणे या योजनेचा विस्तार केला."

शेतकरी सतत तक्रारी करीत आहेत

    गेल्या अनेक महिन्यांपासून किसान सन्मान निधी योजनेबाबत तक्रारी येत आहेत. नोंदणीकृत शेतकर्‍यांनाही पैसे मिळत नसल्याची तक्रार येत आहे. काही गावात दोन शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत, तर काही शेतकरी असे आहेत की ज्यांचा पहिला हप्ता अजूनही त्यांच्या खात्यावर पोहोचला नाही. काही लोकांना त्यांच्या खात्यात पहिला हप्ता मिळाला आहे आणि दुसरा हप्ता मिळालेला नाही. अशा लोकांनी प्रथम त्यांचे लेखापाल आणि कृषी अधिकारी यांना विचारावे की त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही. जर ते असेल तर मग पैसे का आले नाहीत ते त्यांना विचारा. आपणास उत्तर न मिळाल्यास योजनेच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा. देशातील सर्व १४.५ कोटी शेतकर्‍यांना सरकार पैसे देऊ इच्छित आहे. जर शासनाचा हा हेतू पूर्ण करण्यात एखादा अधिकारी अडथळा ठरत असेल तर त्याची माहिती द्या.
 
   आपण या योजनेच्या शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधू शकता. दिल्लीमधील त्याचा फोन नंबर 011-23382401 आहे, तर ईमेल आयडी (pmkisan-hqrs@gov.in) आहे.

Popular posts लोकप्रिय पोस्ट