🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, डिसेंबर ३१, २०२१

Self Help Group : बँकांनी स्वयंसहाय्यता समुहांना संवेदनशीलता ठेऊन आर्थिक पाठबळ द्यावे–एमएसआरएलएम सिईओ डॉ.हेमंत वसेकर

 


मुंबई, दि. 29 डिसेंबर : सर्व बँकर्सनी ग्रामीण भागातील बचतगटांना कर्ज वितरण करताना संवेदनशील दृष्टीकोन ठेवायला हवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी केले.

नवी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या राज्य कक्षातर्फे राज्यातील सर्व सार्वजनिक, खाजगी व सहकारी क्षेत्रातील बँकर्सच्या राज्यस्तरीय प्रमुखांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राज्यातील स्वयंसहायता समूहांना योग्यवेळी पतपुरवठा उपलब्ध करणे, खाते उघडणे, समूह सदस्यांना विमा सुरक्षा कवच उपलब्ध करणे हे विषय कार्यशाळेत चर्चिले गेले.

राज्यातील सर्व बँकर्स सोबत आयोजित चर्चासंवादात बँकांनी केलेल्या कामगिरीबाबत बँकनिहाय आढावा घेण्यात आला. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी सादरीकरण केले. रिझर्व बँकेच्या निर्देशांप्रमाणे बँकांनी प्राधान्य क्षेत्राला पतपुरवठा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे वंचित घटकांना उपजिविकेची साधने उपलब्ध होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रत्येक बँकेची उद्दिष्ट व साध्य, बँकांचा प्रादेशिक विभागनिहाय दृष्टीकोन, भविष्यातील नियोजन आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांसाठी प्रोत्साहन कार्यक्रम याविषयीची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

एचडीएफसी बँकेने पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल बँकेला अभियानाकडून गौरविण्यात आले. एचडीएफसी बँकेने त्यांनी अंगिकारलेल्या कार्यपद्धतीबद्दल अन्य बँक प्रमुखांना माहिती देण्यात आली.

याच कार्यशाळेत बँक ऑफ इंडियासोबत ग्रामीण बचत गटांना अल्पदराने पतपुरवठा करण्याबाबत सामंजस्य करारही करण्यात आला. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्यावतीने राजेश देशमुख यांनी राज्यातील सर्व बँका महिला स्वयंसहायता समुहांना सर्वप्रकारे सकारात्मक मदत करतील व महाराष्ट्र देशात सर्वात पुढे राहील यासाठी प्रयत्न करतील, असे प्रतिपादन केले.

राज्यातील सर्व प्रमुख बँकांचे अधिकारी प्रतिनिधी, अभियानाचे उपसंचालक डॉ.राजेश जोगदंड, अभियान व्यवस्थापक श्रीमती कावेरी पवार यावेळी उपस्थित होते.


Tags: स्वयंसहाय्यता समूह

गुरुवार, डिसेंबर ३०, २०२१

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

 


मुंबई, दि. २९ डिसेंबर २०२१ - राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. या अभियानादरम्यान कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
असंख्य अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ०३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच सदर अभियानाच्या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या अनुषंगाने शालेय स्तरावर दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. ३ आणि १२ जानेवारी रोजी अनुक्रमे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन, ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले आणि १२ जानेवारी रोजी वेशभूषा, ४ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्र, ५ जानेवारी रोजी विविध विषयांवर निबंधलेखन, ६ जानेवारी रोजी यशस्वी महिलांच्या यशोगाथा/ मुलाखती, ७ जानेवारी रोजी आनंदनगरी प्रदर्शन, ८ जानेवारी रोजी चित्रकला आणि किल्ले शिल्प, १० जानेवारी रोजी पोवाडागायन तसेच समूहगायन उपक्रम, ११ जानेवारी रोजी व्याख्याने व परिसंवादाचे आयोजन, तर १२ जानेवारी रोजी एकांकिका/ एकपात्री नाटिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/ कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाज-संपर्क माध्यमांवर (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम) #balikadivas2022, #mahilashikshandin2022, #misavitri2022, #mijijau2022 या हॅशटॅग (#) चा वापर करून अपलोड करण्यात यावा, असे यासंदर्भातील शासन निर्णयात म्हटले आहे. सदर कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालकांच्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित केल्या जातील.
Tags: जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण ) कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

 


नायगाव,दि.३० डिसेंबर २०२१ : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या चालू असलेल्या प्रभाग रचनेला २४ डिसेंबर २०२१ रोजी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण ) कार्यक्रमास स्थगिती देण्याचे आदेश दिले होते.निवडणूक आयोगाने परत सुधारित आदेश काढून नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण गटाला देण्यात येवून प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम पुढे चालू ठेण्याची परवानगी देली आहे.त्यामुळे जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २४ नोव्हेंबर २०२१ च्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण ) २०२१ च्या आदेशान्वये ग्रामपंचयात प्रभाग रचना व आरक्षणाबाबत सविस्तर कार्यपध्दती दिलेली आहे.
तसेच दिनांक २६/११/२०२१ च्या आदेशान्वये राज्यातील माहे जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच यापूर्वी दिनांक २९/११/२०१९ रोजी दिलेला प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम चुकीच्या पध्दतीने राबविल्यामुळे सर्व निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम दिलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ॥ दि.२३/०९/२०२१ अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १० (क) मध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींसाठी २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याची तसेच एकूण आरक्षण हे त्या ग्रामपंचायतीतील एकूण जागांच्या ५० टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही अशी तरतूद करण्यात आली. अध्यादेशातील या सुधारणेबाबत मा. सर्वोच्च न्यायालयामधील रिट याचिका क्र.८४१/२०२१, विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ व रिट याचिका क्र. १३१६/२०२१ मधील दि. १५/१२/२०२१ रोजी झालेल्या निर्णयास अनुसरुन जो पर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करत नाही तोपर्यंत आगामी सार्वत्रिक/पोटनिवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करुन निवडणूका घेण्याचे आदेशित केले आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक १५/१२/२०२१ चे आदेश विचारात घेता उक्त प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमानुसार केलेल्या ग्रामपंचायतीतील प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.
सबब सध्या सुरू असलेला प्रभाग रचना व आरक्षणचा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात यावा.असे राज्य निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२१ रोजी सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या आदेशात म्हटले होते.

धर्माबाद तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन होऊ शकते तर नायगावसह इतर तालुक्यांना काय अडचण आहे? ते कुणाच्या आदेशाची वाट पाहत बसले आहेत? गटशिक्षण अधिका-यांमध्ये त्यांच्या स्तरावर आदेश काढण्याची हिम्मत नाही का? की अधिकार नाहीत

 


नायगाव,दि.२९ डिसेंबर २०२१ : महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळा ०१ डिसेंबर पासून सुरू झाल्या आहेत.नांदेड जिल्ह्यात दुस-या पंधरवड्यात शाळांना सुरुवात करण्यात आली आहे.शाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह धर्माबाद तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन होत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येत आहेत.असे असताना नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या मुदत संपलेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडी विषयी कुठली चर्चा किंवा कुठला गाजावाजा पाहायला मिळत नाही.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियम २००९ मधील कलम (२१) अन्वये व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिकार नियम २०११ मधील नियम (१३) अन्वये शालेय व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघ यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.कोरोना महामारीमुळे जवळपास मागिल दोन वर्षांपूर्वी बंद झालेल्या शाळा डिसेंबर २०२१ मध्ये सुरुवात होऊन शाळेत मुले येऊ लागल्यामुळे शाळा गजबजू लागल्या आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वी समित्या नव्याने स्थापन करणे शक्य नसल्याने त्यांची कार्ये विनाअडथळा पार पाडणे आवश्यक असल्याने त्यांना शाळा सुरु होईपर्यंत ०४ जून २०२० च्या शासन निर्णयानुसार मुदतवाढ देण्यात आली होती.

शासनाने उपरोक्त परिपत्रकात मुद्दा क्रमांक ०५ मध्ये ज्यांची मुदत समाप्त झाली आहे अथवा शाळा सुरु होण्यापूर्वी समाप्त होणार आहे त्यांनाच फक्त वरील आदेश लागू राहील.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सुरु झाल्यानंतर उक्त समिती / संघ नियमाप्रमाणे नव्याने स्थापन करण्यात यावेत.असे स्पष्ट निर्देश दिले असताना जिल्हा परिषदेचे व तालुक्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी झोपेचं सोंग का घेतलं आहे,काही समजायला मार्ग नाही.एरवी निवडीचा विषय आला की गुडघ्याला बाशिंग बांधून बसणारे गाव पुढारी व पालक आता शाळा सुरू होऊनही समित्यांचे पुनर्गठन करण्याच्या मागणीसाठी गप्प का बसले आहेत.गाव पुढा-यांचे सोडा पण ज्या शाळेत आपला पाल्य शिकत आहे त्या पाल्यांच्या पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणाविषयी एवढा निष्काळजीपणा कसा.समितीचे पुनर्गठन झाले तर नवीन कार्यकारिणी शाळेकडे लक्ष केंद्रित करेल,कारण ब-याच शाळेत मुदतवाढ देण्यात आलेल्या कार्यकारिणीतील पालकांच्या पाल्यांनी शाळा सोडल्यामुळे हे पालक पुर्वीप्रमाणे शाळेकडे लक्ष देतीलच असं नाही.

प्रतिक्रिया

शाळा पुर्ववत सुरु झाल्यावर शालेय व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनाचे पत्र निघालेलं नाही.साहेब एक दोन दिवसात आदेश काढतील.(२२/१२/२०२१ बुधवार)
०२ जानेवारीला जिल्हा परिषदेची बैठक आहे.त्याच्यानंतर ईओ पत्र काढतील.(२९/१२/२०२१ बुधवार)
प्रभारी गटशिक्षणाधिकारी,नायगाव

नायगाव च्या प्रभारी महिला गटशिक्षणाधिकारी यांना वारंवार विचारणा करुनही समितीच्या पुनर्गठनाविषयी समर्पक उत्तर मिळत नाही.उपरोक्त शासन निर्णयाच्या मुद्दा क्रमांक ०५ मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले असताना समित्यांच्या निवडी विषयी आपल्या स्तरावर लेखी आदेश देण्याचे अधिकार किंवा तशी हिम्मत त्यांच्यात नाही का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.हाच प्रश्न इतर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्याविषयी पण उपस्थित होतो.

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त होत असल्यामुळे परत शाळा बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत.आजून जर शाळा बंद करण्यात आल्या तर परत या निवडी लांबणीवर पडू शकतात.त्यामुळे लवकर याविषयी निर्णय होणे महत्त्वाचे आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांना शालेय व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही की,या विषयाचे त्यांना काही देणे घेणे नाही.संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये पुढील प्रमाणे असतील

अधिनियमातील कलम २२ अनुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्ये पार पाडावी लागतील.

१) शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.

२) आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करुन त्याची शिफारस करणे. (परिशिष्ट-अ प्रमाणे)

३) त्या शाळेस शासनाकडून / स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे,

४) बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक, शाळा,स्थानिक प्राधिकरण, राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे.

५) शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.

६) अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे संनियंत्रण करणे.

७) बालकांची १०० टक्के पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहील यासाठी दक्षता घेणे.

८) शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालनांचे संनियंत्रण करणे.

९) शाळाबाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.

१०) शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.

११) शाळेतील मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संनियंत्रण करणे.

१२) शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे.

१३) शाळा विकास आराखडयानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे.

(१४) मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.

१५) निरुपयोगी साहित्य रु.१,००० /- (रु. एक हजार मात्र ) किंमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे.

१६) शाळागृह, इतर शालेय बांधकाम, तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख करणे.

१७) शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करुन किंवा लेखीस्वरुपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे.

समितीच्या सदस्यांना प्रवासभत्ता, दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

संबंधित बातम्या

शाळा व्यवस्थापन समिती (SMC) व पालक शिक्षक संघ (PTA) यांना शाळा सुरू होईपर्यंत दिलेली मुदतवाढ संपुष्टात आणून नव्याने समित्या स्थापन कराव्यात...

मंगळवार, डिसेंबर २८, २०२१

आ.राजेश पवार यांच्या स्वखर्चाने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची निर्मिती; गावकऱ्यांनी केले आ.पवार दाम्पत्याच्या सामाजिक दायित्वाचे कौतुक

आ.राजेश पवार यांच्या स्वखर्चाने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची निर्मिती; गावकऱ्यांनी केले आ.पवार दाम्पत्याच्या सामाजिक दायित्वाचे कौतुक.


गडगा,दि. २८ डिसेंबर २०२१ : नायगाव तालुक्यातील गडगा येथील गेल्या वीस वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद होता.त्यामुळे मरणानंतरही मरणयातना सहन करण्याचे दुर्भाग्य गडगा गावकऱ्यांच्या नशीबी आले होते.दरम्यान, गावच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट गावातील गल्लीबोळात जावून ग्रामस्थांशी संवाद साधत लोकाभिमुख लोकप्रतिनिधी आमदार राजेश पवार यांनी समस्या ऐकून घेतल्या.स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता बंद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता स्वखर्चाने हा रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन आमदार महोदयांनी दिले.त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात झाली.११ दिवस हे काम चालले त्यानंतर एक की.मी.अंतराचा अतिशय दर्जेदार रस्ता निर्माण करण्यात आला.


नायगाव विधानसभा मतदारसंघातील तिनही तालुक्यातील अनेक गावात आमदार राजेश पवार तसेच मांजरम गटाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.पुनमताई राजेश पवार यांनी स्वखर्चाने स्व.संभाजीराव पवार प्रतिष्ठान आलूवडगाव मार्फत बळीराजा पाणंद रस्ता मोहीम सुरू केली आहे.याद्वारे शेत पाणंद रस्त्याची निर्मिती केली जात आहे.मांजरम सर्कलमधील मांजरमसह गडगा,कोलंबी, टेंभुर्णी, रातोळी,केदारवडगाव येथे अनुक्रमे दोन, चार,सहा याप्रमाणे पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.नायगाव तालुक्यातील प्रमुख गाव असलेल्या गडगा गावात सन २००१ पासून सार्वजनिक अग्नीकुंड स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता बंद होता.रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली होती.अग्नीअंत्यसंस्काराला प्रेत नेताना कुणाच्या तरी शेतकऱ्यांच्या शेतातून जावे लागत होते.पावसाळ्यात तर प्रचंड हाल व्हायचे.मरनानंतरही सरणावर पोहचविण्याचा मार्गही मरनयातना देणारा होता.ही समस्या पत्रकार वसंत जाधव यांनी आमदार राजेश पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.आमदार महोदयांनी हा रस्ता तयार करण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी पत्रकार वसंत जाधव यांच्यावर सोपवली.त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली.अन् गेल्या वीस वर्षांपासूनची गंभीर समस्या आ.पवार यांच्या तत्परतेने सुटली.आमदार राजेश पवार यांनी स्वखर्चाने निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल गडगा येथील नागरिक माजी चेअरमन माधवराव मारोतराव पा.जाधव, गावच्या सरपंच लक्ष्मीबाई देवीदास पवळे, उपसरपंच परमेश्वर पाटील, देवीदास पवळे, बालाजी अचिंतलवार, माधवराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भानूदास बंडेवाड,अमृतराव रानडे, बालाजी रानडे यांच्या सह ग्रामस्थांनी आमदार राजेश पवार यांचे आभार मानले आहेत.

सोमवार, डिसेंबर २७, २०२१

 नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या घुंगराळा येथील अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदमला तुर्तास निलंबित करु; डिईनंतर सेवेतून बडतर्फ केले जाईल-उप मुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे


पत्रकार संजय पाटील चिखले मरवाळीकर
नायगाव,दि.२७ डिसेंबर २०२१ : नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम सह फुलवाल्याला २५ हजार लाच स्वीकारताना ०३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.त्यानंतर नायगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधिक्षक ला.प्र.वि नांदेड यांचे द्वारे या प्रकरणी सक्षम अधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी, नांदेड यांना कारवाई नंतर एक दोन दिवसात पत्र पाठवून या घटनेची माहिती देण्यात आली असली तरी एसीबीच्या जाळ्यात अडकलेला अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम याला जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी अद्याप निलंबित केले नसल्याची बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या वेबसाइटवर सांख्यिकी सदरात प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केल्यावरुन स्पष्ट झाली आहे.
नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले घुंगराळा येथील अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदमला तुर्तास निलंबित करण्यात येईल विभागीय चौकशीनंतर सेवेतून बडतर्फ केले जाईल-उप मुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी सांगितले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे एखादा शासकीय अधिकारी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्याचेवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एसीबी कडून तसा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या अपचारी अधिकारी कर्मचारी याला तात्काळ निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे असे असतानाही सक्षम अधिकारी या गंभीर घटनेकडे गांभीर्याने लक्ष घालून त्या अपचारी अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे.पण अनेक केसमध्ये तसे होताना दिसत नाही.महिना महिना दोन दोन महिने निलंबन आदेश काढले जात नाहीत.याही प्रकरणात तसेच झाले आहे,अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम याचे निलंबनाचे आदेश आजून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या टेबलवर धुळखात असल्याचे समजले.खरेतर कुठल्याही घटनेत ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे अधिकार हे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हापरिषद यांना देण्यात आले आहेत.सर्वस्वी जबाबदारी ही उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांची असते.
दुसरे म्हणजे निलंबनाला जरी थोडा वेळ लागत असला तरी एसीबीच्या कारवाईत अशा अपचारी अधिकारी कर्मचारी याला त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्याच्याकडील पदभार काढून तो दुसऱ्या कर्चा-याकडे देणे अपेक्षित असताना जाणिवपूर्वक तसे केले जात नाही.याही प्रकरणी तसेच घडले आहे.घटनेला आज २४ दिवस झाले असुन अजूनही पदभार काढून घेतले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी तीन दिवसांपूर्वी कदम याच्याकडील पदभार काढून घेण्याचे आदेश काढले असल्याचे सांगितले आहे.तर दुसरीकडे विस्तार अधिकारी लतिफ शेख यांना म्हैसाजी कदमकडील पदभार काढून घेण्यात आला आहे का? असे विचारले असता  "त्याच्यावर कारवाई झाली नाही , वरुन आदेश आले नाहीत.त्याच्याकडून चार्ज सगळे काढलेत,तशी ऑर्डर काढली आहे.मी कुंटूरला दौऱ्यावर आहे, माझेकडे आदेश नाहीत.विस्तार अधिकारी कांबळे यांचेकडे ऑर्डर आहेत.त्यांनीच आदेश काढले आहेत. घुंगराळा व कोकलेगाव असे दोन आदेश काढले आहेत.निलंबनाची वगैरे काही ऑर्डर आली नाही, परंतु आपण त्याला घुंगराळ्याहून बदलून टाकल्या. विस्तार अधिकारी कांबळे यांचेकडे पदभार काढून घेण्याविषयीचा आदेश असावा त्यांना विचारा असे म्हटले"त्यानंतर विस्तार अधिकारी सुर्यकांत कांबळे यांना विचारले असता "म्हैसाजी कदमकडील चार्ज आजून काढून घेण्यात आले नाहीत, आदेश इथे काढत नाहीत, ऑर्डर सिईओकडून यावी लागते.चार्ज काढून घेतले आहे नाही काही माहिती नाही, आदेश माझ्याकडे नाहीत,मी आदेश काढले नाहीत." अशा प्रकारे दोन्ही विस्तार अधिकारी यांनी परस्परविरोधी, विसंगत, बेजबाबदार,बेतुकी, उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत.जे की घटनेला बिलकुल अभिप्रेत नाही.एका जबाबदार पदावरील कर्मचाऱ्यांना हे दिलेले बेतुकी, बेजबाबदार उत्तर शोभेनासे आहे.
एसीबी कडून आम्हाला लिखित स्वरूपात अहवाल यावा लागतो.तोपर्यंत मला डायरेक्ट निलंबित करता येत नाही.एसीबीचा अहवाल अजून आलेला नाही.(आज आलाय का पहिले खात्री करुन घेतो असे म्हणत जवळ असलेल्या कर्मचाऱ्याला विचारले की,एसीबीत गेलेल्या ग्रामसेवकाचा घुंगराळ्याचा अहवाल आला आहे का? अहवाल आला नसल्याची माहिती घेतल्यानंतर) आजूनही अहवाल आला नाही.एकदाचं एसीबीच्या ऑफिसला माणूस पाठवून देतो.त्यांनी अहवाल दिल्याशिवाय मला काहीच करता येईना.जनरली तीन-चार दिवसात एसीबी कडून अहवाल येतो पण यावेळेस आठ दिवस झाले तरी अहवाल आला नाही.तरीपण माझं माणूस पाठवतो आता आणि टपालात कुठं राहू नये म्हणून खात्री करून घेतो.अहवाल आल्याबरोबर आम्ही ठेवत नाही, आमच्या हातात कागद आल्यावर २४ तासात निलंबनाची ऑर्डर काढतो.सद्या निलंबन होते, आम्हाला त्याचा डिई (D.E) म्हणजे विभागीय चौकशी करावी लागते मग डिसमिस (सेवेतून बडतर्फ) करतो.(त्यानंतर थोड्यावेळाने लगेच त्यांनी सांगितले की) अहवाल आला आहे आणि फाईल मॅडमच्या टेबलवर आहे.

नामदेव रा.केंद्रे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद नांदेड.


असा झाला होता ट्रॅप
दिनांक ०२/१२/२०२१ रोजी यातील तक्ररदार यांनी तक्रार दिली की, "यातील लोकसेवक म्हैसाजी कदम हे तकारदार यांचे दोन प्लॉट ग्रामपंचयातचे नमुना न.-८ ला नोंद घेण्यासाठी २८,०००/ रू. लाचेची मागणी करीत आहेत".
तकारदार यांचे तकारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडुन दिनांक ०३/१२/२०२१ रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये लोकसेवक कदम यांनी तकारदार यांचेकडे त्यांचे उपरोक्त कामासाठी २८,०००/- रू. लाचेची मागणी करून तडजोडीअंती २५,०००/ रू. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून दिनांक ०३/१२/२०२१ रोजी हेडगेवार चौक, नायगांव परिसरात लावण्यात आलेल्या सापळया दरम्याण खाजगी इसम विठ्ठल माने यांनी तकारदार कडुन उपरोक्त कामासाठी २५,०००/- रू. लाचेची रक्कम स्विकारली आहे. म्हणुन लोकसेवक (१) म्हैसाजी आनंदराव कदम, वय ३९ वर्ष, व्यवसाय नोकरी ग्रामसेवक, ग्रामपंचायात कार्यालय घुंगराळा ता. नायगांव जि. नांदेड रा. पिपंळगाव, ता. नायगांव जि. नांदेड (२) खाजगी इसम विठ्ठल देविदास माने, वय ३२ वर्ष, व्यवसाय फुल विक्रेता, रा. पिपंळगाव ता. नायगांव जि. नांदेड यांचे विरूध्द पोलीस ठाणे नायगांव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद अतिरिक्त पद्भार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड पोलीस उप अधिक्षक श्री धरमसिंग चव्हाण, श्री राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दत्ता केंद्रे, पोहेकॉ किशन चिंतोरे, पोना हणमंत बोरकर, ईश्वर जाधव, शेख मुजीब यांनी पार पाडली होती.

शनिवार, डिसेंबर २५, २०२१

मराठा वधू-वर परिचय मेळावा हा मराठा सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम -माजी आ. वसंत चव्हाण

 


नायगाव,दि.२५ डिसेंबर २०२१ : मराठा सेवा संघ तालुका शाखा नायगाव च्या वतीने आयोजित  मराठा वधू-वर परिचय मेळावा हा स्तुत्य उपक्रम आहे. बदलत्या काळानुसार वधू-वर परिचय मेळावा घेणे गरजेचे होते. ती समाजाची गरज ओळखून सेवा संघाने आयोजित केला आहे.

यावेळी व्यासपीठावर माजी.आ.वसंतराव पाटील चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, संजय पाटील शेळगावकर, श्रावण पाटील भिलवंडे, भास्कर पा.भिलवंडे, डाॅ दत्तात्रय शिपांळे, प्रा संतोष देवराये, शे. रा. पाटील, जीवनराव पाटील वडजे, पंडीत पवळे, डाॅ विश्वास चव्हाण, सूर्यकांत कदम, बाबुराव आडकीणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी आ. चव्हाण म्हणाले की, सेवा संघाने यापुढे वैयक्तिक खर्चातून मेळाव्याचे आयोजन न करता समाजातील दाते यांचे सहकार्य घ्यावे त्यासाठी मी ही एक समाजातील घटक म्हणून आपल्या सोबत सदैव राहील. यापुढे ही जाऊन या मेळाव्याच्या माध्यमातून जेवढी विवाह जुळून येतील त्या सर्वांची सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून विवाह संपन्न करण्यासाठी तालुक्यातील सर्वच मराठा राजकीय मंडळी व समाजातील सर्व समाज घटकांचे सहकार्य घेऊन विवाह संपन्न करण्यासाठी माझा ही आपल्या सोबत पुढाकार असेल असे प्रतिपादन ही त्यांनी केले. 
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक अशोक पवळे, संतोष कल्याण, देवीदास जाधव, प्रा. यादव पा. शिंदे, प्रा. जे.डी. पाटील रातोळीकर, नारायण शिंदे, नागेश कल्याण, जाधव व्ही. सी,नागनाथ वाढवणे,गंगाधर चव्हाण, शिंदे जी एम,शिंदे डी बीड,उध्दव ढगे,उत्तम शिंदे, दत्ता पाटील, भोसले पी ए, मुख्याध्यापक एकनाथ कल्याण सर, पत्रकार माधव पाटील चव्हाण, विजय नरवाडे,आनंद पवार, कदम एम जे,शिवराज काठेवाड, राजु बावणे,हानमंत जाधव, केशव पवळे,टी जी रातोळीकर, विजय पाटील प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे नायगाव तालुकाध्यक्ष अशोक पवळे यांनी व्यक्त केले. या विषयी सखोल व्याख्यानातून मराठा समाजाने मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्यावे असे प्रखर मत संतोष जी देवराये यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव ढगे सर यांनी केले.

शुक्रवार, डिसेंबर २४, २०२१

मराठा सेवा संघ नायगाव च्या वतीने 25 रोजी मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

 


🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

नायगाव,दि.24 डिसेंबर 2021 : मराठा सेवा संघ नायगांव च्या वतीने मराठा समाजातील बांधवासाठी वधू आणि वर यांची ओळख व्हावी यातून ऋणानुबंधाच्या गाठी बांधल्या जाव्यात या उद्देशाने "मराठा वधू-वर परिचय मेळावा" दिनांक २५/१२/२१ रोजी साईतीर्थ मंगल कार्यालय शेळगाव रोड नायगाव बा. येथे सकाळी ठिक 11:00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.तरी पंचक्रोशीतील मराठा वधू-वर पित्यांनी आपल्या एकविस वर्षांवरील मुलांचा व अठरा वर्षावरील मुलींचा बायोडाटा देवून नोंदणी फाॅर्म भरुन निःशुल्क नोंदणी करावी.

मराठा सेवा संघ, नायगांव च्या वतीने एक सामाजिक बांधिलकी च्या नात्याने वधू-वर यांचा एकाच ठिकाणी परिचय व्हावा व यातून समाजातील मुलांच्या व मुलींच्या लग्नाच्या रेशीम गाठी बांधल्या जाव्यात या उद्देशाने निशुल्क परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
यामध्ये शिक्षीत व उच्चशिक्षीत अशा अनेक स्थळांची माहिती उपलब्ध होणार आहे. तेंव्हा आपल्या १८ वर्षावरील मुलींचे व २१ वर्षावरील मुलांची निःशुल्क नोंदणी करा व हवे तसे स्थळ मिळवा.

 तसेच त्या दिवशी मुलांना व मुलींना परिचयासाठी घेऊन यावे.अशी कळकळीची नम्र विनंती मराठा सेवा संघ नायगाव च्या वतीने करण्यात आली आहे.

दिनांक-२५-१२-२०२१ रोज शनिवार वेळ सकाळी ११ वा. 

स्थळ : साईतीर्थ मंगल कार्यालय, शेळगांव रोड, नायगांव
मराठा सेवा संघ नायगाव





गुरुवार, डिसेंबर २३, २०२१

शाळा व्यवस्थापन समिती (SMC) व पालक शिक्षक संघ (PTA) यांना शाळा सुरू होईपर्यंत दिलेली मुदतवाढ संपुष्टात आणून नव्याने समित्या  स्थापन कराव्यात 


नायगाव,दि.23 डिसेंबर 2021 : बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियम २००९ मधील कलम ३८ (२)(१) अन्वये, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क अधिनियम २०११ मधील कलम (२१) अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम (२६)(i)() अन्वये प्राप्त अधिकारान्वये शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 04 जून 2020 च्या शासन निर्णयानुसार शालेय व्यवस्थापन समिती,पालक शिक्षक संघ व कार्यकारी समितीस  मुदतवाढ देण्याकरीता पुढील प्रमाणे निर्णय घेतला होता.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणू (Covid-१९) या आजारास जागतिक महामारी म्हणून घोषित केलेले आहे. या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 13 मार्च 2020 च्या अधिसूचने अन्वये राज्यात साथरोग अधिनियम १८१९ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अमंलबजावणी सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. दरम्यानच्या काळात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम २१ व  महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2011 मधील नियम क्र. १३ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समिती तसेच महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम 2011 च्या कलम ४ अन्वये व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) नियम 2016 च्या नियम क्र.६ अन्वये स्थापन झालेल्या पालक शिक्षक संघ व कार्यकारी समिती यांची मुदत समाप्त होत असल्यास व शाळा सुरु होण्यापूर्वी त्या नव्याने स्थापन करणे शक्य नसल्याने त्यांची कार्ये विनाअडथळा पार पाडणे आवश्यक असल्याने त्यांना शाळा सुरु होईपर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती असे म्हटले होते.

खालील अटींवर देण्यात आली होती मुदतवाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियम २००९ मधील कलम (२१) अन्वये व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिकार नियम २०११ मधील नियम (१३) अन्वये स्थापन झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीस शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शाळा सुरु होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११मधील कलम (४) अन्वये स्थापन करण्यात आलेल्या पालक शिक्षक संघ व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) नियम २०१६ मधील नियम (६) अन्वये स्थापन करण्यात आलेल्या कार्यकारी समितीस शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शाळा सुरु होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

ज्यांची मुदत समाप्त झाली आहे अथवा शाळा सुरु होण्यापूर्वी समाप्त होणार आहे त्यांनाच फक्त वरील आदेश लागू राहील.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सुरु झाल्यानंतर उक्त समिती / संघ नियमाप्रमाणे नव्याने स्थापन करण्यात यावेत.उक्त समिती/संघास पूर्वीप्रमाणेच सर्व अधिकार असतील असे म्हटले होते.

शाळा सुरू झाल्या तरी नव्याने समिती स्थापन्याचा निर्णय नाही

शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये सुद्धा शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती ,पालक शिक्षक संघ व कार्यकारी समितीची नव्याने स्थापना करण्यात आली नाही. शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या 01 डिसेंबर पासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत मांडला होता. त्याला आरोग्य विभाग तसेच बालरोग तज्ज्ञांच्या कृती दलाने परवानगी दिली.कोरोनामुळे मागील २० महिन्यांहून अधिक काळ शाळा न पाहिलेली मुले शाळेत जायला लागली. ग्रामीण भागांतील पाचवी ते बारावी आणि शहरी भागांतल्या आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. मात्र पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत अनेक मतमतांतरे होती. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा वेळेत सुरू होणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत होते. यानंतर या प्रस्तावाबाबत आरोग्य विभागाचा अभिप्राय घेऊन कृती दलाच्या तज्ज्ञांशीही चर्चा करुन ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागांत पहिली ते सातवीचे वर्गही ऑफलाइन सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
आता शाळा सुरू होऊन 23 दिवस झाले तरी शालेय व्यवस्थापन समिती ,पालक शिक्षक संघ व कार्यकारी समितीची नव्याने स्थापना करण्याचा कुठलाही निर्णय जिल्हास्तरावर अद्याप घेण्यात आला नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडी झालेल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसारित होत आहेत. नांदेड जिल्ह्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे की, वरिष्ठांकडून तसे कुठलेही आदेश आले नाहीत.जोपर्यंत तसे आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्हाला काही करता येत नाही. दुसरीकडे या समित्यांची नव्याने स्थापना लवकरात लवकर करावी अशी मागणी पालकांमधून होत आहे.

शालेय व्यवस्थापन समितीची सुरुवात

केंद्र सरकारने सन २००२ च्या ८६ व्या संविधान विशोधन अधिनियमान्वये अनुच्छेद २१ (अ) मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केला आहे. त्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम, Right of Children to Free and Compulsory Education Act, २००९ (No. ३५. २००९), केंद्र शासनाने पारित करून तो भारत सरकारच्या २७/०८/२००९ च्या राजपत्रात प्रसिद्ध केला आहे. तसेच, भारत सरकारच्या दिनांक १६/०२/२०१० च्या राजपत्रात सदर अधिनियम दिनांक ०१/०४/२०१० पासून संपूर्ण भारतात (जम्मू व काश्मिर वगळता) लागू केला असल्याचे नमूद केले आहे.
समता, सामाजिक न्याय, लोकशाही आणि मानवी समाजामध्ये न्यायाची प्रस्थापन ही मूल्ये, सर्व मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून साधली जाऊ शकतात. यादृष्टीने हा अधिनियम अंमलात आणला आहे. त्यामुळे सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची उपस्थितीची आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे.
शिक्षणाच्या विकासात लोकसहभाग रहावा यादृष्टीने राज्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेकरिता व्यवस्थापनपरत्वे ग्राम शिक्षण समिती, वार्ड शिक्षण समिती अथवा खाजगी शाळांच्या बाबतीत शाळा समिती गठीत करण्यात येते. या समित्या शाळांच्या भौतिक,शैक्षणिक विकासाच्या बाबतीत महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यासाठी संबंधित शाळा समित्यांना शासनाने काही आर्थिक अधिकार कर्तव्ये तसेच काही उत्तरदायित्वे प्रदान केलेली आहेत. समित्यांची कार्ये बऱ्याच प्रमाणात शाळांच्या विकासासाठी उपयुक्त आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अनुसार विनाअनुदानित शाळा वगळता उर्वरित सर्व शाळांसाठी शाळा व्यवस्थापन समिती ३० सप्टेंबर, २०१० पूर्वी गठीत करणे अनिवार्य करण्यात आले होते. उक्त अधिनियमान्वये सदर समितीकडे शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण सोपविण्यात आले असल्याने ग्राम शिक्षण समिती, वॉर्ड शिक्षण समिती व शालेय समितीच्या रचना व कार्यामध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.17 जून 2010 च्या शासन निर्णयानुसार त्यात बदल करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे असतील
१. सदर समिती किमान १२ ते १६ लोकांची राहील ( सदस्य सचिव वगळून),
२. यापैकी किमान ७५ टक्के सदस्य बालकांचे आईवडील / पालक यामधून असतील.

अ) पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल.
ब) उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या माता-पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल.
क) साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल असे पहावे.
३. उर्वरित २५ टक्के सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील.
अ) स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी एक. (स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करील)
ब) शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक एक.
क) पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ / बालविकास तज्ञ एक.
४. वरील अ.क्र. २ मधील बालकांचे आईवडील / पालक सदस्यांमधून सदर समिती, अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करील.
५. शाळेचे मुख्याध्यापक / प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
या समितीतील एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य महिला राहतील.


शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये पुढील प्रमाणे असतील

अधिनियमातील कलम २२ अनुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्ये पार पाडावी लागतील.
१) शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.
२) आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करुन त्याची शिफारस करणे. (परिशिष्ट-अ प्रमाणे)
३) त्या शाळेस शासनाकडून / स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही
मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे,
४) बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक, शाळा,
स्थानिक प्राधिकरण, राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे.
५) शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.

६) अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे संनियंत्रण करणे.
७) बालकांची १०० टक्के पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहील
यासाठी दक्षता घेणे.

८) शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालनांचे संनियंत्रण
करणे.
९) शाळाबाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
१०) शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
११) शाळेतील मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संनियंत्रण करणे.
१२) शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे.
१३) शाळा विकास आराखडयानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे.
(१४) मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.
१५) निरुपयोगी साहित्य रु.१,००० /- (रु. एक हजार मात्र ) किंमतीपर्यंतच्या
साहित्याचा लिलाव करणे.

१६) शाळागृह, इतर शालेय बांधकाम, तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख
करणे.
१७) शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करुन किंवा लेखीस्वरुपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे.
समितीच्या सदस्यांना प्रवासभत्ता, दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुज्ञेय असणार
नाही.
सदर शाळा व्यवस्थापन समितीस आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील.

बुधवार, डिसेंबर २२, २०२१

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, माहूर, नायगाव नगरपंचायत निवडणुकीसाठीच्या मतदानाकरीता मतदारांचा पुढाकार

 अर्धापूर 77.59 टक्के, माहूर 76.09 टक्के, नायगाव 79.06 टक्के 



नांदेड,दि. 21 डिसेंबर 2021 :- नांदेड जिल्ह्यात दिनांक 21 डिसेंबर रोजी अर्धापूर, माहूर,  नायगाव या तीन नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी चांगला सहभाग घेत मतदानाची टक्केवारी वाढविली. तीनही नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रत्येकी 17 प्रभाग होते. यातील अर्धापूर नगरपंचायतीसाठी 13 प्रभागाची, नायगाव नगरपंचायतीसाठी 14 प्रभागाची तर माहूर नगरपंचायतीसाठी 13 प्रभागाची संख्या होती. अर्धापूरमध्ये 57 उमेदवार, नायगावसाठी 27 उमेदवार तर माहूरमध्ये 63 उमेदवार उभे होते. 

अर्धापूर नगरपंचायतीसाठी एकुण 17 हजार 104 मतदारांपैकी 13 हजार 271 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नायगाव निवडणुकीसाठी एकुण 8 हजार 93 मतदारांपैकी 6 हजार 398 तर माहूर नगरपंचायतीसाठी एकुण 7 हजार 101 मतदारांपैकी 5 हजार 403 मतदारांनी आपला हक्क बजावला. अर्धापूरसाठी मतदानाची एकुण टक्केवारी 77.59, नायगावसाठी 79.06 तर माहूरसाठी 76.09 एवढी मतदानाची टक्केवारी झाली. सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत मतदान झाल्याची ही टक्केवारी आहे.

रविवार, डिसेंबर १९, २०२१

 धक्कादायक : मरवाळी तांडा येथील ग्रामसेवक पचलिंगने ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या नोव्हेंबर मधील ग्रामसभेचे आयोजन केलेच नाही


नायगाव,दि.१९ डिसेंबर : कोरोना-१९ च्या महामारीमुळे राज्यात दोन वर्षांत एकही ग्रामसभा झाली नाही.ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या दृष्टीने नोव्हेंबर मधील ग्रामसभेचे आयोजन करणे आवश्यक असताना मरवाळी तांडा येथील ग्रामसेवक पचलिंगने या ग्रामसभेचे आयोजन केले नसून अद्याप ग्रामसभा झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की,मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात,राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले.मे महिन्यातील आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेसह अन्य ग्रामसभांना राज्य शासनाने पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली होती.मुदत संपलेल्या कोरोना महामारीमुळे निवडणूका पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूका जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आल्या व आखरी टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूका लांबणीवर टाकण्यात आल्या.त्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली.नायगाव तालुक्यातही मरवाळी तांडा येथे ११ महिन्यांपूर्वी प्रशासक नेमण्यात आले होते.आता निवडणूक आयोगाने उर्वरित  ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेची नोटीस काढली आहे.या ग्रामपंचायतीची ग्रामसभा आता झाली नाही तर काही दिवसात आचारसंहिता लागू होईल.त्यानंतर येथे ग्रामसभा घेणे शक्य नाही.ग्रामसेवकाने एवढी महत्वाची समजली जाणारी ग्रामसभा का घेतली नाही हा प्रश्न आहे.

ग्रामसभेच्या मंजुरीअभावी मागिल सभेचा सभावृत्तांत वाचून कायम करणे,पंधरावा वित्त आयोग  सन २०२०-२१ व २०२१-२२ आराखड्यास कार्योत्तर मान्यता प्रदान करणे,पंधरावा वित्त आयोग सन २०२२-२३ चा वार्षिक आराखडा तयार करून ग्रामसभेची मान्यता घेणे, मागिल जमा-खर्चास मान्यता घेणे,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत समृद्धी लेबर बजेट सन २०२१-२२ व २०२२-२३ तयार करून मान्यता घेणे, ग्रामपंचायत मरवाळी तांडाच्या सन २०२२-२३ च्या अंदाज पत्रकास मान्यता घेणे, ग्रामपंचायत कर वसुली १००% करणे,माझी वसुंधरा अभियानात सहभाग घेऊन शासन निर्णयानुसार काम करणे,वृक्ष लागवड सन २०२१-२२ अंतर्गत प्रत्येक व्यक्तीने किमान ५ झाडे लावून वृक्ष संवर्धन करणे,आयत्यावेळी येणा-या विषयावर चर्चा करणे.शासनाच्या विविध योजनांतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांची यादी, चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे, अशा अनेक बाबी प्रलंबित राहिलेल्या आहेत.

विहीत कालावधीत ग्रामसभा घेण्यात कसूर करणाऱ्या या ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.या ग्रामसभा न घेतल्यास सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरुन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे.या ठिकाणी प्रशासक असल्याकारणाने ग्रामसभेची नोटीस बजावण्याची सर्वस्वी जबाबदारी येथील ग्रामसेवकावर येते.

ग्रामसभांना शासनाची परवानगी तरी प्रशासनात संभ्रम व ग्रामसेवकाकडून आदेशाला केराची टोपली.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक आणि संरपंच निवडीनंतर कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारनं ग्रामसभांवर घातलेली बंदी फेब्रुवारी २०२१ मध्ये उठवली.सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 च्या अनुषंगानं राज्य सरकारनं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन ग्रामसभांचे आयोजन करण्यास पुन्हा परवानगी दिली.तरीही मे २०२१ व त्यापुढील ग्रामसभा आयोजित करण्याकरिता प्रशासनाच्या संभ्रमावस्थेमुळे ग्रामसभा घेण्यात आल्या नाहीत.काही जिल्ह्याच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी कोवीड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर सदर ग्रामसभा आयोजित करावी किंवा कसे अशी शासनाकडे विचारणा केली.त्यावर ०२ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे असे पत्र ग्रामविकास विभागाचे अवर सचिव सुहास जाधवर यांनी २३ सप्टेंबर रोजी काढून ०२ ऑक्टोबर रोजी कोरोना नियमांचे पालन करुन ऑनलाईन/ऑफलाईन ग्रामसभा आयोजित कराव्यात अशी परवानगी दिली.या पत्राच्या आधारे राज्यातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्या.परंतु भारत निवडणूक आयोगाने २८ सप्टेंबर च्या परिपत्रकान्वये अंतापूरकर यांच्या ०९ एप्रिल रोजी झालेल्या निधनामुळे रिक्त झालेल्या ९०-देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या एका जागेकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.सदर निवडणुकीसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू केली.त्यामुळे परत एकदा नांदेड जिल्ह्यातील ०२ ऑक्टोबर रोजी ठरलेल्या ग्रामसभा पुढे ढकलण्यात आल्या.त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे असे परिपत्रक २५ ऑक्टोबर रोजी शासनाने काढले याही परिपत्रकाला मरवाळी तांड्याच्या ग्रामसेवकाने केराची टोपली दाखवली.तसेच मनमानी कारभार करत नोव्हेंबर महिन्यात घ्यायची ग्रामसभा देखील अद्याप घेतली नाही.

ग्रामसभेबाबत अधिनियम,परिपत्रक काय सांगते

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ मध्ये ग्रामसभेबाबत तरतूद करण्यात आली आहे.कलम ७ मधील पोट कलम (१) मध्ये प्रत्येक वित्तीय वर्षात चार बैठकी (सभा) घेणे बंधनकारक आहे.सर्वसाधारणपणे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एका वित्तीय वर्षात राष्ट्रीय/राज्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दिन,स्वातंत्र्य दिन,महात्मा गांधी जयंती,प्रजासत्ताक दिन या महत्त्वाच्या दिनांचे औचित्य साधून ग्रामसभा आयोजित करण्यात येत होत्या.मुंबई ग्रामपंचायत(ग्रामसभेच्या बैठकी) नियम,१९५९ च्या नियम ३(१) नुसार प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली सभा ही त्या वर्षाच्या सुरुवातीनंतर दोन महिन्याच्या आत भरविण्यात आली पाहिजे.आणि दुसरी ग्रामसभा १५ ऑगस्ट ला,तिसरी ग्रामसभा ०२ ऑक्टोबर रोजी,चौथी ग्रामसभा २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येत होत्या.
परंतु २७ एप्रिल २०१८ रोजी च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय/राज्याच्या महत्त्वाच्या तसेच फ्लॅगशिप योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याकरिता व ग्रामसभेच्या विषय सूचीतील विषयांवर सर्वकष चर्चा घडवून आणण्याकरिता ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग व त्यांचा चांगला प्रतिसाद मिळण्याकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ नुसार नियमितपणे विहीत कालावधीमध्ये चार ग्रामसभांचे आयोजन मे, ऑगस्ट, नोव्हेंबर या महिन्यांमध्ये व २६ जानेवारी रोजी करण्यात यावे असा बदल करण्यात आला आहे.आता या परिपत्रकानुसाार ०२  ऑक्टोबर मधील ग्रामसभा नोव्हेंबर महिन्यात घ्यावी लागणार आहे.


Tags:#ग्रामसभा#ग्रामपंचायत

बुधवार, डिसेंबर १५, २०२१

नायगाव विधानसभेच्या आमदाराचे माहेर घर भाजपा तर दिलेले घर रिपाई...नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे तीन उमेदवार बिरोध ! माजी आमदार वसंतराव चव्हाण म्हणतात खेल और बाकी है

माधव पवार

नायगाव/रुई प्रतिनिधी : राज्यातले राजकारण असो की जिल्ह्यासह तालुक्याचे राजकारण असो राजकीय वर्तुगळात कोणत्या पक्षाचा खेळखंडोबा होईल हे निश्चित नसते परंतु नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळीचे लक्ष लागून असलेल्या नायागांव नगरपंचायत निवडणूकीत एक वेगळेच चित्र पाहावयास मिळाले असून या निवडणूकी दरम्यान भाजपाचे तीन उमेदवार उडून काँग्रेस पक्षाच्या  घर्ट्यात गेल्यामुळे काँग्रेस पक्षाचे तीन बिनविरोध निघाल्याने नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी विद्यमान आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण ये तो सुरुवात है और खेल तो बाकी है अशी प्रतिक्रिया देत म्हणाले की नायागांवच्या आमदाराचे भाजपा माहेर घर तर दिलेले रिपाईचे घर असल्यामुळे आमदार राजेश पवारची बोलती बंद झाली आहे
जिल्ह्यातील नायगाव नगरपंचायत निवडणुकीची रचना १७ वार्डाची असल्यामुळे येथील तीन वार्डाची निवडणूक ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्यामुळे १४ वार्डाचे मतदान होणार होते परंतु निवडणुकीचा रंग भरण्या पूर्वीच भाजपा रिपाईच्या आमदाराचे तीन उमेदवार भाजपाचे घरटे गळू लागल्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या घर्ट्यात उडाले आता राहिला प्रश्न दहा उमदेवाराचा कोणत्या ही परिस्थितीत काबीज करून दाखविणार असल्याचे वसंतराव चव्हाण यांनी सांगितले असून एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन भाजपा उमेदवाराचे बीफार्म असताना सुद्धा काँग्रेसच्या गळाला लागले असल्यामुळे नायगावचे भाजपा रिपाईचे आमदार राजेश पवार मात्र निवडणुकीचा रणसंग्राम लढाविण्या ऐवजी खंडोबाच्या यात्रेत डफ व तुणतुणं वाजविण्यात तलीन झाल्याचे दिसून आले आहे
नायगाव विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पवार यांना सदरच्या निवडणुकीत शेकडो कार्यकर्त्यानी जीवाची पर्वा न करता अंदाजे सत्तर हजाराच्या मतांधिक्यानी निवडून आणले होते सदरच्या आमदारानी विकासाचा आराखडा तयार न करता वेगवेगळ्या कलेत कधी डफ तर तुणतुणं वाजवून नायगाव नगरपंचायतच्या निवडणूकीकडे खुशाल दुर्लक्ष केल्यामुळे भाजपाचे तीन उमदेवार काँग्रेसच्या गळाला लागले असल्यामुळे आमदार राजेश पवार यांचे नेतृत्व संपूष्ठात येत असल्याची चर्चा आता नायागांव मतदार सांगत चांगलीच रंगली असून असली तरी नायगावच्या नगर पंचायतच्या निवडणुकीकडे लक्ष घालणार कोण असा प्रश्न पडला असला तरी भाजपाच्या नेते मंडळीचे लक्ष उमेदवाराच्या विजयाकडे नसल्यामुळे उमदेवार स्वतःच्या  कर्तृत्वासह त्यांच्या बळावर निवडून येणार का असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात आहे
नायगाव मतदार संघात भाजपाची फळी मजबूत नसल्यामुळे व भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याना बाजूला सारून आपले वजन राजकीय वर्तुळात टिकून राहण्याचा हेतू आमदार राजेश पवार यांचा असल्यामुळे आमदाराच्या नेतृत्वाला धुडकावू भाजपाचे तीन उमदेवार काँग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाकडे धडकले असल्यामुळे नायगाव तालुक्यात भाजपाची खुलेआम पोकळी निर्माण झाल्याचे सरळ सरळ नायगावच्या नगरपंचायतच्या निवडणूकीं वरून दिसून येत असले तरी 
नायगाव मतदार संघातील भाजपाचे दोन आमदार, दिग्गज स्थानिक चार नेते त्यात राजेश देशमुख कुंटूरकर, श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, बालाजी बच्चेवार यासह जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य माणिकराव लोहगावे, सौ पुनम राजेश पवार यांनी मात्र निवडणुकीच्या प्रचाराची यंत्रणा हातात घेतली नसल्यामुळे भाजपावर मात काँग्रेस पक्ष करील असे संकेत असल्याचे ही दिसून येत आहे

मंगळवार, डिसेंबर १४, २०२१

राजकारणातील राजकीय सोंगाड्याांनी ग्रामीण भागात यात्रेसह कुस्त्यावर बंदी घातली असल्यामुळे प्रशासनावर नामांकित पैलवान चक्रधर शिंदे यांची घोर नाराजी

By : Admin

रुई प्रतिनिधी माधव पवार 

नायगाव,दि.14 डिसेंबर 2021 :  महाराष्ट्र राज्यातल्या राजकीय नेते मंडळीना मोठ्या प्रमाणात राजकारणाचा छंद झडला असल्यामुळे राजकारणी फक्त कोणत्याही निवडणूका असो लोकसभेच्या असो विधानसभेच्या असो अथवा नगरपंचायतीच्या निवडणूका असो त्याच बरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, असो आमदार असो यांनी निवडणुकीकडे जास्तीचे लक्ष घालून निवडणुकीचा रणसंग्राम घडवून आणतात परंतु अतिशय महत्वाचा खेळ  म्हणजे यात्रेतील कुस्त्याचा फडासाठी व यात्रेसाठी परवानगी नाकारून सदरच्या यात्रेवर बंदी घातली असल्यामुळे राजकारणातील राजकीय सोंगाड्यासह प्रशासनावर बरबड्याचे नामांकित पैलवान चक्रधर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे 
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात गावच्या राजकारणात सार्वजनिक उत्सोव म्हणजे गावातील अनेक वर्षा पासून चालत आलेली परंपरा ही आज घडीला नष्ट होत असताना दिसून येत असले तरी समस्त गावकऱ्यानी एकत्र येऊन जत्रा असो कुस्त्या व महापुरुषाच्या जयंत्या असो सार्वजनिक पद्धतीने असे उत्सोव साजरे करण्या ऐवजी गावाच्या राजकारणात जत्रे बोरोबर कुत्याचा फड व रात्रीला वाघ्या मुरळीचा कार्यक्रम खलास होण्याच्या मार्गावर असल्यामुळे सदरचे सार्वजनिक उत्सोव जिवंत ठेवण्यासाठी व पैलवानाच्या कुस्त्याची दंगल पाहण्यासाठी गावकऱ्यानी एकत्र येण्याची गरज ग्रामीण भागात भासत असली तरी प्रशसनावर बरबडा येथील नामांकित पैलवान चक्रधर शिंदे यांनी शासनावर घोर नाराजी व्यक्त केली आहे 
राज्यातल्या राजकीय राज्यकर्त्याना कोणत्याही निवडणुका आल्या की उमेदवाराची जुळवा जुळव केल्या शिवाय एकापेक्षा एक चढ सभा घेतात, भाषणे ठोकून राजकीय पुढारी रात्रदिवस झोप नसतात परंतु राज्यकर्त्यांनी फक्त यात्रेवर, कुस्त्यावर बंदी घालून मोकळे होतात तालुक्यातील खेड्यापाड्यात गेल्या दोन वर्षा पासून अशीच बोबं होताना दिसून येत असून प्रशासनाने कोरोना महामारीच्या नावाखाली सार्वजनिक कार्यक्रम व उत्सवाला गेल्या दोन ते पावणे दोन वर्षा पासून परवानगी नाकारली तर ग्रामीण भागातील सध्याची परिस्थिती पाहिली तर गावाच्या राजकारणात कुस्त्या बरोबर यात्रा खलास होताना दिसून येत असून सरपंच व उपसरपंचाचा राजकारणातील खेळ शिगेला निघत असल्यामुळे कुठे तरी राजकारण थांबवून गावच्या कुत्या बरोबर जत्रा वाघ्या मुरळीचे संस्कृतीक कार्यक्रम पार पाडले तर योग्यच परंतु गावची दिशा वळविने हे अत्यंत महत्वाचे आहे
ग्रामीण भागातील यात्रा जवळ आल्या की महिला मंडळासह छोटया छोटया मुलांना अतिशय आनंद वाटत होता व भव्य यात्रेतील कुस्त्याचा जंगी सामना असला की मोठं मोठे पैलवान कुस्त्याच्या फडात लंगोट घालून दंड मारत होते परंतु कुस्त्या व जत्रा वरचेवर हादपार होत असल्यामुळे तब्बल वर्षभर दूध,खारीख, खोबर, तूप, बदाम स्वतःच्या पैशाने खावून गोरगरीब कुटूंबातील छोटे मोठे कुस्तीगीर कुस्तीचा फड रंगाविण्यासाठी जसे शाळेतील विध्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करून परीक्षा केंद्रावर परीक्षा देतात तशाच पद्धतीने पैलवान सुद्धा वर्ष पक्कड करुन कुस्त्याच्या जंगी फडात जय हनुमाना सारखे दंड मारून उतरत होते परंतु गावची दिशाच बदल्यामुळे पैलवानाची हिरामोड होताना दिसून येत आहे 
महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमाला व यात्रा म्हटल्या की गावकऱ्यानी भरविलेली कुस्त्याची दंगल गावकऱ्याच्या स्वाभिमानाची बाब म्हणजे जत्रा व कुस्त्या आणि वाघ्या मुरळीचे संस्कृती कार्यक्रम हे गावाच्या करमणूकीचे साधन ग्रामीण भागातील जत्रा व कुस्त्या पाहण्यासाठी अनेक जिल्ह्यासह तालुक्यातुन नागरिक व पैलवान येत होते आणि गावच्या राजकारणात अनेक गावाचं यात्रे बरोबर कुस्त्या ही खलास होताना दिसून येत असल्या तरी महिला वर्गासाठी यात्रेत दुकाने थाटत असून यात बांगडया, खेळण्या, फुगेवाले, पुंग्यावाले, आदी साहित्य घेऊन येऊन व्यापारी वर्ग दुकाने थाटलेले दिसून आले असले तरी जत्रा खलास होत असल्यामुळे पैलवानावर प्रशासना कडून अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया देत
बरबडा येथील रहिवासी असलेले नामांकित पैलवान यांनी नाराजी व्यक्त केली आहेे



गुरुवार, डिसेंबर ०९, २०२१

 नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर इंटर सॉफ्टवेअर वाहनाद्वारे वाहने कॅच ; कंट्रोल स्पीड वाहन धारकानो सावधान सावकाश वाहने चालवा.


रुई बु. (माधव पवार)

नायगाव ,दि.१० डिसेंबर : नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या रस्त्यावर व जिल्ह्यातील अनेक मार्गावर मोठ्या वेगाने वाहन चालकांनी चारचाकी वाहन तीनचाकी वाहन दुचाकी वाहने सदर चालकांनी शासनाने दिलेल्या नियमाचे कसल्याच प्रकारचे काटेकोरपणे कायद्याचे पालन करण्या ऐवजी त्या नियमाचे उल्लंघन करून वाहन स्पीडने चालवित असल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यामुळे जिल्ह्यात इंटरसॉफ्टवेअर वाहनाच्याद्वारे वाहन धारका कडून दंड आकारला जात असल्यामुळे वाहन धारकानो कंट्रोल स्पीड सावधपणे आपले वाहने कमी स्पीडने चालविने गरजेचे असून पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार इंटर सॉफ्टवेअर वहानाच्या द्वारे पि एस आय शिवानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पॉका महेंद्रसिंग कोठीतीर्थवाले, पॉका अतुल नागरगोजे, पॉका राजेश झुंबाड यांनी मशीनचे नियंत्रन ठेवले असल्यामुळे वाहन धारकानो आता सावधान स्पीडवर ताबा लावा असे सांगण्यात येत आहे 
जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर म्हणजे नांदेड ते नरसी चारचाकी वाहनांसाठी ९५ किमी बस ८४ किमी टेम्पो
ट्रक ८४ दुचाकी ७४ किमी तीनचाकी ६३ नांदेड ते
हादगाव चारचाकी ९५ किमी बस ८४ टेम्पो ट्रक ८४ दुचाकी ७४ किमी तीनचाकी ६३ किमी नांदेड ते लोहा चारचाकी ७४ किमी बस ६३किमी ट्रक टेम्पो ६३, दुचाकी ६३, तीन चाकी ५३,नांदेड ते पूर्णा चारचाकी ७४ किमी बस ६३ ट्रक टेम्पो ६३, दुचाकी ६३ तीनचाकी ५३ किमी 
नांदेड ते मालेगाव चारचाकी कार ७४, बस ६३, टेम्पो ट्रक ६३, दुचाकी ६३, तीनचाकी ५३ किमी नांदेड ते मुदखेड चारचाकी कार ७४ बस ६३,टेम्पो ६३ दुचाकी ६३, तीनचाकी ५३,भोकर ते किनवट चारचाकी कार ७४,बस ६३ टेम्पो ट्रक ६३, दुचाकी ६३, तीनचाकी ५३,
नरसी ते बिलोली चारचाकी कार ७४ बस ६३, ट्रक टेम्पो ६३, दुचाकी ६३,तीनचाकी ५३,नरसी ते देगलूर चारचाकी ७४ किमी बस ६३ किमी,टेम्पो ६३ किमी, दुचाकी ६३, किमी तीनचाकी ५३ किमी,नरसी ते मुखेड चारचाकी कार ७३ किमी बस ६३,किमी ट्रक टेम्पो ६३, किमी दुचाकी ६३ किमी,तीनचाकी ५३ किमी,नांदेड ते कंधार चारचाकी कार ७४,बस ६३ किमी, ट्रक टेम्पो ६३,दुचाकी ६३ किमी तीन चाकी ५३ किमी अशा प्रकारचा शासनाचा उद्देश असल्यामुळे अपघाताचे ही प्रमाण वाढणार नाही दिलेल्या स्पीडची मर्यादा लक्षात वाहने सावकाश चालविणे गरजेचे असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे

बुधवार, डिसेंबर ०८, २०२१

भीषण अपघात : सिडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश;11 जणांचा मृत्यू

सीडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश, सोबत होते पत्नी सह 14 जण;11 जणांचा मृत्यू.

  • मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडला. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत आणि त्यांची पत्नीही होती.
  • संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना संपूर्ण घडामोडींची माहिती दिली असून मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.
  • संरक्षण मंत्री राजनाथसिंह सिडीएस बिपिन रावत यांच्या घरी दाखल.

तामिळनाडू,दि.08 डिसेंबर 2021 : तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सांगण्यात येते, की सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते.जखमींना वेलिंग्टन बेसमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते.या अपघातात 3 जण जखमी झाल्याची माहिती होती.परंतु आताच मिळालेल्या माहितीनुसार 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
खराब हवामानामुळे हा अपघात घडला आहे की हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने ही भीषण दुर्घटना घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.वायुदल प्रमुख दुर्घटने स्थळी रवाना झाले आहेत.दरम्यान, या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत निवेदन देणार आहेत.
तसेच,संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना संपूर्ण घडामोडींची माहिती दिली असून मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.

Mi-17V5 हेलिकॉप्टरमधील सर्व जखमींना अपघातस्थळावरून बाहेर काढण्यात आले आहे. सीडीएस रावत हे वेलिंग्टनमधील डिफेन्स स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. जनरल रावत यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले. 
मिळालेल्या माहितीनुसार, स्टाफ कॉलेज वेलिंग्टनमध्ये सीडीएस बिपिन रावत यांचे दुपारी 2.45 वाजता व्याख्यान होते. ते दिल्लीहून सुलूर फिक्स्ड विंगमध्ये गेले. सुलूर ते वेलिंग्टन हे अंतर 53 किलोमीटर होते. त्याचवेळी कुन्नूर ते वेलिंग्टन हे अंतर केवळ तीन किलोमीटर होते आणि निलगिरीच्या जंगलात हेलिकॉप्टर लँडिंगपूर्वीच कोसळले.


 

भास्करराव धर्माधिकारी आगामी काळातील बरबडा जिल्हा परिषदच्या निवडणुकीत संधी मिळाल्यास इच्छुक


रुई वार्ताहर (माधव पवार)

रुई बु. नायगाव,दि.०८ डिसेंबर २०२१ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकररावजी चव्हाण यांच्या काळापासून महोनराव गंगाजीराव धर्मधिकारी बरबडेकर यांचे अतिशय निकटचे संबंध होते आणि गेल्या पन्नास वर्षाखाली महोनराव धर्माधिकारी यांनी दिवंगत शंकरराव चव्हाण यांना काहाळा येथून बरबडा येथे घोड्यावर बसून आणले होते आणि गावांत बैलगाडीवर चव्हाण यांची मिरवणूक ही काढण्यात आली होती बरबड्याचे दिवंगत महोनराव गंगाजीराव धर्माधिकारी यांचे चिरंजीव भास्करराव महोनराव धर्माधिकारी यांनी आगामी काळातील बरबडा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जर सर्वसाधारण पुरुषासाठी सुटल्यास काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास भास्करराव धर्माधिकारी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे
तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले भास्करराव महोनराव धर्माधिकारी यांचे वडील मोहनराव धर्माधिकारी हे दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या सानिध्यात राहून गावच्या विकासासाठी प्रयत्न केले असल्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विचाराने नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे काँग्रेस पक्षाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करीत असल्यामुळे व माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी मदेवाड बरोबर एकनिष्टीने काँग्रेस पक्षाचे कान करत असल्यामुळे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची संधी दिल्यास निवडणूक लढवू असे ही भास्करराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी सांगितले आहे

मंगळवार, डिसेंबर ०७, २०२१

 महालाचखोर लोकसेवक मंडळ अधिकारी गब्बरसिंग गारळे याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मुसक्या आवळल्या; तलाठ्याविरुद्धच्या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल बाजूने देण्यासाठी मागितली होती लाच


@७५ : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे

  • कारवाई होतेय हे लक्षात येताच तासगावच्या 'मंडलाधिकाऱ्या'ने ठोकली धूम, 'एसीबी'ने पाठलाग करून केले जेरबंद

पुणे,दि.०७ डिसेंबर २०२१ : लोकसेवक गब्बरसिंग तुकाराम गारळे वय ३७ वर्ष मंडल अधिकारी तासगांव, मंडल अधिकारी कार्यालय तासगांव ता. तासगांव जि. सांगली रा. मु.पो. वासुंबे ता. तासगांव जि. सांगली याचे विरूध्द लाच स्विकारले बाबत कारवाई सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.
तक्रारदार यांनी त्यांचे गावातील सोसायटीमध्ये जमीनीवर कर्ज मिळणेबाबत अर्ज केला आहे. सदर कर्जासाठी जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर ई कराराची नोंद होणे आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी ई करार नोंद होणे बाबत तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. सदर अर्जावर ई करार न होण्यासाठी मंडल अधिकारी कार्यालय तासगांव या ठिकाणी तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची सुनावणी गारळे, मंडल अधिकारी तासगांव यांचे समक्ष सुरू होती. सदर तक्रारीचा निकाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी गारळे, मंडल अधिकारी तासगांव याने तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रूपयाची लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि.०६.१२.२०२१ रोजी दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज दि.०७.१२.२०२१ रोजी लाचलुचपत ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लाचखोर लोकसेवक गारळे याने तक्रारदार यांचे विरूध्द सुरू असलेल्या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे प्रथम १०,०००/- रूपये लोचेची मागणी करून चर्चेअंती ८०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचखोर लोकसेवक गारळे यांनी तक्रारदार यांना सांगीतले प्रमाणे कॉलेज चौक तासगांव या ठिकाणी सापळा लावला असता लोकसेवक गब्बरसिंग तुकाराम गारळे वय ३७ वर्ष मंडल अधिकारी तासगांव, मंडल अधिकारी कार्यालय तासगांव ता. तासगांव जि. सांगली रा. मु.पो. वासुंबे ता. तासगांव जि. सांगली याने तक्रारदार यांचकडे लाचेची मागणी करून तक्रारदार यांचेकडून ८०००/- रूपये स्विकारलेनंतर त्याला पकडण्यात आले आहे.
लाचखोर लोकसेवक गब्बरसिंग तुकाराम गारळे वय ३७ वर्ष मंडल अधिकारी तासगांव, मंडल अधिकारी कार्यालय तासगांव ता. तासगांव जि. सांगली रा. मु.पो. वासुंबे ता. तासगांव जि. सांगली याचे विरुध्द तासगांव पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, श्री. सुरज गुरव, अपर पोलीस उप आयुक्त/ अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, श्री सुहास नाडगौडा, श्री. अपर पोलीस उप आयुक्त/ अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुजय घाटगे पोलीस उप अधीक्षक, गुरूदत्त मोरे पोलीस निरीक्षक, प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सलिम मकानदार, अविनाश सागर, संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ, सिमा माने, प्रितम चौगुले यांनी केली आहे..
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३ / २३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.
संपर्क :१) मोबाईल अॅप www.acbmaharashtra.net
२) फेसबुक पेज www.facebook.com-maharashtraACB ३) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in

रविवार, डिसेंबर ०५, २०२१

 प्रशासनातील लाचखोर लोकसेवकांना लागलेली लाचखोरीची सवय समाजासाठी वाळवी आहे

पत्रकार संजय ब्रम्हानंद पाटील चिखले यांचे प्रतिपादन


लाच या विषयावर विशेष लेख

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे.
शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल.
समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतीसाठी सज्ज आहे.
प्रशासनाला लाचखोरीची कशी वाळवी लागली आहे,त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे रोज एसीबीच्या होत असलेल्या कारवाया.लाचखोरीला वाव मिळायला सामान्यातील सामान्य माणूस जबाबदार आहे.भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र हे गोरगरीबांकरीता कायद्याचे एक सोपे हत्यार आहे,या कायद्याचा बडगा उगारुन गरिबातला गरीब लाचखोरांकडून होणारी आपली लुट थांबवू शकतो,बंद करु शकतो.फक्त गरज आहे ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल करण्याची.लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर लाचखोरांकडून तक्रारदाराच्या केसालाही धक्का लागत नाही,ही ताकद या कायद्यात आहे.
आपण एखाद्याच्या बायका पोरांना रान का लावायचे हे विचार आता सोडून दिले पाहिजेत.लाचखोर रक्ताचे पाणी करून आपल्या संसाराचा गाडा कसाबसा हाकणाऱ्या मजूरांना,दिवस रात्र एक करुन कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना सोडत नाहीत, त्यांच्या लेकरा बाळांचा विचार करत नाहीत तर दुस-यांनी त्यांचे कुटुंबीय भिकेला लागतील याचा काय म्हणून विचार करायचा.हे बुरसटलेले विचार आता सोडून दिले पाहिजेत.पुर्वी फक्त पावडरचे पैसे एवढच ऐकून होतो,आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एका फोनवर लाचखोरांविरुद्ध तक्रारदारांच्या मदतीला,हाकेला तयार असतात.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तक्रारदाराच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. गरज आहे फक्त मानसिकता बदलण्याची,आपल्यातील न्यूनगंड पणा,मनातील भिती काढून टाकण्याची आहे.आपल्यासाठी तयार केलेल्या शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण पात्र असल्यास लाच काय म्हणून द्यायची.
छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या नातलगांना दुखवत असतो,शेतकरी धु-यासाठी आपल्याच भावाला भांडत असतो,भावकीचा काटा काढण्याच्या गोष्टी करुन मनं कलुषीत करुन कटूता निर्माण करत असतो.मग प्रशासनातील लाचखोरांचे कुठलेही नाते नसताना त्यांची भिती का बाळगतो? हक्कासाठी कुठल्याही प्रकारची भिती मनात बाळगण्याची गरज नाही.योजनेचा लाभ मिळाला काय न मिळाला काय लाचखोरांचे मनसुबे उधळून लावले पाहिजेत.आपल्या हक्कासाठी लाच का द्यायची? याचा विचार करण्याची गरज आहे.आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित आहोत,पुर्वी भ्रष्टाचारी नेत्यांनी,महा लाचखोरांनी घरे भरुन घेतली,आतातरी हे कमी व्हायला हवे.हरामाचा पैसा जमा करणा-यांची लेकरं बापाच्या पैशावर ऐश करत आहेत, प्रशासनातून रिटायर्ड झालेल्या काहीजणांची लेकरं तर माय बापाला पोहायला तयार नाहीत.हे कटू सत्य आहे,कुणी नाकारू शकत नाही.या लालचीखोरांमुळे तुमच्या संसाराचे मात्र करुन घेऊ नका.


   जय हिंद! जय महाराष्ट्र!


✍✍✍

पत्रकार

संजय ब्रम्हानंद पाटील चिखले

मरवाळीकर,ता: नायगाव,जि: नांदेड

प्रसिद्धी प्रमुख_अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ नायगाव.

7767912933

Popular posts लोकप्रिय पोस्ट