अमरावती, दि 6/8/21 : महाराष्ट्र राज्य .अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 जिल्हा -शाखा अमरावतीच्या वतीने मा.आयुक्त मा.प्रशांत रोंडे महानगर पालिका यांना दिव्यांग कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र दीक्षित, जिल्हासचिव श्री किशोर मालोकार, जिल्हाउपाध्यक्ष सौ शालिनी बोरखडे, श्री कपिल हडाले, कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत मामनकर,अमरावती तालुकाध्यक्ष श्री विशाल धोटे,अमरावती तालुकासचिव श्री मंगेश खंडारे आदी संघटनेचे म.न पा सदस्य श्रीधर हिवराळे , अमोल साकुरे, रवि खडसे ,इरशाद खान रऊफखान , साजीद हुसैन , गुणसागर गवई , अजय चव्हाण , धिरज धोरधळे, हरजेश बांबल, रणजित नरोडे , रमेश पातुडैकर , मंगेश भावे , अजय वाढोणकर यावेळी उपस्थित होते.
यावेळी दिव्यांग कर्मचारी पदोन्नती दिव्यांग कर्मचारी यांना सहायक तंत्रज्ञान साधने व उपकरणे त्वरित उपलब्ध करून द्यावीत, दिव्यांग कर्मचारी यांची विभागनिहाय स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी दरवर्षी प्रत्येक आस्थापना मध्ये प्रसिद्ध करण्यात यावी,दिव्यांग कर्मचारी 2005 पुर्वी चा असो किंवा नंतर असो त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. दिव्यांग कर्मचारी यांना चार टक्के प्रमाणे पदोन्नती देण्यात यावी, प्रत्येक आस्थापना चा कार्यालयात दिव्यांग अधिनियम2016 चा फलक लावण्यात यावा .महानगर पालिका चा अंतयेणारे राखीव भुखंड साठी दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रस्ताव मागविण्यात यावे आदी विषयावरील प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले. यावर अमरावती महानगर पालिका प्रशांत रोडे मा. आयुक्त यांनी सकारात्मकता प्रतिक्रिया दाखविली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा