नायगाव,दि २६ ऑगस्ट २०२१ : तालुक्यातील मौजे बरबडा येथे नायागांव तालुका मराठी पत्रकार संघाची मंगळवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी साडेअकरा वाजता बैठकीचे आयोजन केंद्रीय प्राथमिक शाळा बरबडा येथील सभागृहात करण्यात आले आहे .तरी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन बरबड्यातील पत्रकार बांधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील पत्रकार बांधव यांची ग्रामीण पत्रकार बांधवाशी नाळ बांधली जावी व ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांचा उलगडा व्हावा या उद्देशाने बरबडा या ठिकाणी मराठी पत्रकार संघांचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांच्या मार्गदर्शना खाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, जेष्ठ पत्रकार माधव मामा कोकुर्ले, भूषणजी पारळकर, एस एम मुदखेडकर , बालाजी नागठाणे, माधव चव्हाण, विठ्ठल अण्णा वडपत्रे, विकास भुरे, बी.आय.बडुरे सर,तालुका मराठी पत्रकार संघाचे नूतन विद्यमान अध्यक्ष नागेश पाटील कल्याण व सर्व पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती बैठकीस राहणार आहे
बैठकीत पहिल्या सत्रात मान्यवरांचे नूतन पदाधिकारी यांचे स्वागत व ओळख पत्र वाटप करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात संघटनात्मक बांधणी विषयी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन होणार असून , ग्रामीण पत्रकारां समोरील आवाहने या विशेष विषयावर विशेष चर्चा करण्यात येणार आहे. शेवटच्या सत्रात समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
तरी या बैठकीला उपस्थित राहण्याचे, ता.उपाध्यक्ष गंगाधर ढवळे, बरबडा सर्कल प्रमुख चंद्रकांत सूर्यतळ,व सर्व पत्रकार बांधव बरबडा यांच्या कडून आवाहन करण्यात आले आहे सर्व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी वेळेवर उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे.असे ता प्रसिद्धी प्रमुख संजय चिखले यांनी कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा