🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, जून ०१, २०२१

लाचेचा अहवाल : महा लाचखोर जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, PMEGS अंतर्गत बॅंक कर्ज मंजूर करण्यासाठी पंचासमक्ष 5 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

 अशा महा लाचखोरांमुळे सुशिक्षित बेकारांना स्वतःचा  व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळत नाही


*लाचेचा यशस्वी सापळा कारवाई अहवाल** 

▶️ *युनिट -* अहमदनगर

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय- 27 वर्ष. रा-हंगेवाडी  ता- श्रीगोंदा

जि.अहमदनगर

▶️ *आरोपी =*

१) रमेश श्रीहरी सुरुंग,  वय  वर्ष, 45  जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, वर्ग 2, खादी ग्रामोद्योग कार्यालय, अहमदनगर. मूळ रा.फ्लॅट न 103, साई नगरी को ऑप हौसिंग सोसायटी वडमुखवडी, दिघी, जिल्हा पुणे

 ▶️ *लाचेची मागणी दिनांक* 31/05/2021

 ▶️ *लाच मागितली**  5,000/-₹ 

▶️ **लाच स्विकारली दिनांक* * 31/05/2021

▶️ *लाच स्वीकारली* 5000/- ₹

▶️ *हस्तगत रक्कम** 5000/- ₹

▶️  *लाचेचे कारण**तक्रारदार यांनी जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालय अहमदनगर मार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने अंतर्गत पेव्हर ब्लॉक व्यवसाय सुरु करण्यासाठी ₹ 25,00,000/-चे कर्ज प्रकरण सहा महिन्यापुर्वी महाराष्ट्र बँक, शाखा हंगेवाडी ता. श्रीगोंदा य़ेथे दाखल केले आहे. सदर प्रकरण अद्याप प्रलंबित असुन, ते संबंधित बँक मॅनेजर कडुन‌ लवकर मंजुर करुन घेऊन सदर प्रकरणाची सबसीडी लवकर मिळवून देणेकरिता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे  5,000/- रु लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारी वरुन आज दि.31/05/2021 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीत यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 5000/- रु लाचेची मागणी पंचा समक्ष केल्याचे निष्पन्न झाले त्यावरून आज दि.31/05/2021 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक यांनी 5000/- रु लाचेची रक्कम पंचा समक्ष स्विकारली असता आरोपी लोकसेवक यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

▶️ *सापळा अधिकारी* =

हरिष खेडकर,  पोलिस उपअधीक्षक

 ला.प्र.वि, अहमदनगर

▶️ *सहा सापळाअधिकारी** - शाम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.अहमदनगर

▶  *सापळा पथक* - पोलीस निरीक्षक श्री करांडे, पोना विजय गंगूल, पो.अंमलदार रविंद्र निमसे, मपोशी राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पोलीस अंमलदार राहुल सपट

▶ **मार्गदर्शक* -*1)मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

2)मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

3) मा. विजय जाधव, वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* -  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट