लाच देणे आणि घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे
![]() |
| विरुद्ध सापळा कारवाई |
औरंगाबाद (०२ मार्च) : वाळूचे अवैद्य दोन टेम्पो चालवू देण्यासाठी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षकाला इच्छा नसताना २५ हजारांची लाच देणाऱ्या वाळू ठेकेदाराला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी साडे चारच्या सुमारास करण्यात आली. गोकुळ बाळासाहेब सूर्यवंशी (४०, रा.बळेगाव, ता.वैजापूर) असे अटकेतील वाळू ठेकेदाराचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक शैलेश उद्धवराव जोगदंड हे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गोकुळ सूर्यवंशी हा वाळूची ठेकेदारी करतो. त्याने त्याचे दोन टेम्पो सुरू करण्यासाठी उपनिरीक्षक जोगदंड यांना इच्छा नसताना एका टेम्पोचा हप्ता म्हणून २५ हजारांची लाच देऊ केली.
मात्र, जोगदंड यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी सापळा लावून सूर्यवंशी याला रंगेहात पकडले.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात एकीकडे देवगाव रंगारी येथे कार्यरत असलेले पोउपनिरीक्षक शैलेश जोगदंड याने लाच देणाऱ्याला एसीबी च्या हवाली केले तर दुसरीकडे पिशोर पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेले रणजित गंगाधर कासले यांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदरणीय सर,जय हिंद
➡️विरुद्ध सापळा अहवाल
▶️ युनिट- जालना
▶️ तक्रारदार- शैलेश उद्धवराव जोगदंड वय 38
पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे.देवगाव (रंगारी)जि. औरंगाबाद ग्रामीण
▶️ आरोपी खाजगी इसम :- श्री.गोकुळ पिता बाळासाहेब सूर्यवंशी, वय 40 वर्षे धंदा- वाळू वाहतूक रा.बळेगाव,ता.वैजापूर जिल्हा औरंगाबाद.
▶️ देउ केलेली लाचेची रक्कम- 25,000/- रूपये
▶️ लाच दिली -25,000/- रुपये
▶️ लाच दिलेली ता.
दिनांक 02.03.2021 रोजी 16.30 वाजता
▶️ कारण - तक्रारदार हे पो.स्टे.देवगाव रंगारी येथे नेमणुकीस असून त्यांची लाच घेण्याची इच्छा नसताना यातील आरोपी याने त्याचे दोन टेम्पो अवैद्य वाळू वाहतुकीवर चालवू देण्यासाठी एका टेम्पोचा हफ्ता म्हणून 25000/-रुपये लाच दिली असताना पंचाचे समक्ष सापळा पथकाने आरोपीस पकडले.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी, श्री.एस.एस.शेख,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.जालना.
▶️मार्गदर्शक-मा.डॉ राहुल खाडे,पोलीस अधीक्षक, मा.डाॅ.अनिता जमादार,
अपर पोलीस अधीक्षक, आर. डी. निकाळजे, पो उप अधिक्षक, ला प्र वि जालना
➡️सापळा पथक - पो. कॉ.गणेश चेके,गजानन कांबळे,शेख जावेद,प्रवीण खंदारे,ला. प्र. वि. जालना.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा