🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, मार्च ०२, २०२१

तलाठी ४५०० रुपये लाच मागणी करुन ३ हजार लाच स्वीकारताना चतुर्भुज

 

आष्टी (०२ मार्च) : तालुक्यातील मोराळा सज्जाचे तलाठी बाळू बनगे यांनी जमीन नावे करण्यासाठी आणि अनुदान मिळवून देण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी केली होती. यानंतर तडजोडी अंती ३००० रुपये लाच स्विकारण्याचे त्यांनी मान्य केले असता ते पैसे स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात करण्यात आली. तलाठी बनगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका शेतकऱ्यास वाटणीपत्राप्रमाणे भाऊ,आई, वडिल, बहिण यांच्या नावे शेती करण्यासाठी आणि अनुदान मिळून देण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी तालुक्यातील मोराळा सजाचे तलाठी बाळू बनगे यांनी केली होती. याबाबत शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यानंतर मंगळवारी बसस्थानक परिसरात तलाठी बनगे यांनी तडजोडी अंती ३००० रुपये स्विकारण्याचे मान्य केले. याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधिक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय.रविंद्र परदेशी, पोलिस नाईक श्रीराम गिराम, पो शि.भारत गारदे, पो शि संतोष मोरे यांनी केली. या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी विरूद्ध आष्टी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



:: प्रेस नोट ::

दि. ०२/०३/२०२१

आरोपी लोकसेवक श्री.बाळू महादेव जगे वय ५१ वर्ष तलाठी सजा मोराळ ता.आष्टी जि.बीड यांनी ३०००/- (तीन हजार रुपये) लाच मागणी केल्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांचेकडुन कारवाई

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : बीड
  2. पोलीस स्टेशन पोलीस ठाणे : आष्टी
  3. गुन्हा नोंद कलम : कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८
  4. आरोपीचे नांव व कार्यालय : श्री.बाळु महादेव बनगे वय ५१ वर्ष तलाठी सजा मौराळा ता.आष्टी जि.बीड
  5. मगणी केलेली लाच रक्कम : ३०००/- ( तीन हजार रूपये)

थोडक्यात माहिती : दिनांक १४/०१/२०२१ रोजी तक्ररदार यांनी तक्रर दिली की, तक्ररदार यांचे वडीलाचे नावावरील मौजे वनदेवाडी ता.आष्टी येथील शेत जमीन तहसीलदार आष्टी यांचे वाटणीपत्र आदेशाने तक्ररदार व त्यांचे भाउ,बहीन,आई,वडील यांचे नावे करण्यासाठी तसेच आनुदान मिळवुन देणेसाठी व तकारदार यांचे आई वडील यांचे पगार चालु करण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी करत आहेत. सदर तकारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड येथे तक्रार दिली.

सदर तकारीच्या अनुषंगाने दिनांक १४/०१/२०२१ रोजी पंचा सम्ष पडताळणी केली असता लोकसेवक श्री. बाळु बनगे यांनी ४५०० रुपयांची मागणी करुन तडजोडअंती ३००० रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून आज दिनांक ०२.०३.२०२१ रोजी सापळा लावला असता लोकसेक्क यांनी पंचासमक्ष ३०००/- रुपये

लाच मागणी करुन लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन श्री.बाळू महादेव बनगे वय ५१ वर्ष तलाठी सजा

मोराळ ता.आष्टी जि.बीड यांचे विरुद्ध पोलीस ठाणे आष्टी येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कारवाई मा.डॉ. राहुल साठे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, मा.डॉ. अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, श्री.बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उप अधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनााली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र परदेशी, व पोलीस अमलदार श्री.श्रीराम गिराम,भरत गारदे व चालक अमलदार मोरे ,ला.प्र.वि.बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबददल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी संपर्क साधवा.

संपर्क पत्ता : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड

संकेतस्थळ : acbwebmail@mahapolice.gov.in

ई-मेल : - dyspacbbeed@mahapolice.gov.in

2) dyspacbbeed@gmail.com

ऑनलाईन तकार ॲप्लीकेशन : acbmaharashtra.net

टोल फ्री क्रमांक : १०६४

दुरध्वनी क्रमांक : ०२४४२-२२२६४९

व्हॉटस अप क-९९३०९९७७००]

पोलीस अधीक्षक,लाप्रवि,औरंगाबाद ८८८८८०७२९९

अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि,औरंगाबाद :- ९८८११००८१२३

पोलीस उप अधीक्षक लापवि,बीड ९१५८६३२६२६


(बाळकृष्ण पुडे पाटील) 

पोलीस उपअधिक्षक लाचपत प्रतिबंधक विभाग बीड.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट