🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, मार्च १८, २०२१

महाडीबीटी पोर्टल वर पुन्हा सर्व शेतकरी बांधवांनी सन 2021-22 साठी अर्ज करावेत व विविध शेती विषयक योजनेचा लाभ घ्यावा-गजानन पाटील चव्हाण

     


  नायगाव : कृषी खात्याच्या विविध योजनेमधील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दर वेळी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करण्याची किटकिट पद्धत आता बंद करण्यात आली आहे पारदर्शकतेसाठी सर्व सुविधा देणारे https.mahadbtmahait.gov.in हे महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली बहुतेक योजनांसाठी एकाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळाल्याने सन वर्ष 2020 व 21 मध्ये 12 लाख शेतकर्‍यांनी पहिल्याच टप्प्यात 24 लाख बाबीसाठी अर्ज केले आहे. 

तालुका कृषी अधिकारी सिंगाडे यांच्याशी चर्चा केली असता सदर पोर्टलवर 2020 -21 साठीच्या या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला त्यानुसार आलेल्या लॉटरीमध्ये शेतकऱ्यांना काही ठिकाणी पूर्व संमती पत्रे देणे सुरू आहे. 

तर काही योजनांमध्ये निधीची उपलब्धता पाहून कामे सुरू आहेत मात्र कोणत्याही योजनेसाठी निवड झालेल्या शेतकरी आता पुन्हा पोर्टलवर जाऊन त्यांच्या  अर्जामध्ये बदल करू शकतात असे सुधारित अर्ज 2021-22 करिता ग्राह्य धरणार आहेत तसेच असा बदल करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाहीत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्यभरात कोणत्याही सामुहीक सेवा केंद्राची मदत शेतकरी बांधव घेऊ शकतात 

मात्र कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या मेलवर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक मात्र आधी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.

एखाद्या शेतकऱ्याकडे आधार क्रमांक नसल्यास प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करावी लागणार आहे आधारचा असा नोंदणी क्रमांक मिळताच पुन्हा महाडीबीटी पोर्टलमध्ये तो क्रमांक नमूद करून योजनेसाठी अर्ज करता येईल मात्र आधार क्रमांक प्रमाणित करून घेतला नसल्यास अनुदानाचे वितरण होणार नाही,असे कृषी खात्याच्या वरिष्ठ व संबंधितासोबत चर्चा करते वेळेस स्पष्ट सांगितले आहे  

पुढील प्रमाणे फलोत्पादन योजने अंतर्गत

👉🏻 कांदा चाळ 👉🏻 पॅक हाऊस 👉🏻जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन 👉🏻फळबागांना आकार देणे 👉🏻 फळबाग लागवड

👉🏻 मधुमक्षिकापालन

👉🏻 हरितगृह 👉🏻शेडनेट हाऊस 👉🏻प्लास्टिक मल्चिंग 

*तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत* 

 👉🏻 आंबा लागवड 👉🏻डाळिंब लागवड 👉🏻मोसंबी लागवड 👉🏻पेरू लागवड 👉🏻सिताफळ लागवड 

👉🏻तसेच इतर फळबाग लागवड योजना 👉🏻शेततळ्यातील पन्नी

👉🏻 सामायिक शेततळे 

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत

👉🏻ट्रॅक्टर 👉🏻 ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे 👉🏻प्रक्रिया संच 👉🏻पावर टिलर 👉🏻बैलचलित अवजारे

👉🏻 मनुष्य अवजारे 👉🏻स्वयंचलित अवजारे

👉🏻 कल्टीवेटर 👉🏻कापणी यंत्र 👉🏻नांगर 👉🏻पेरणी यंत्र 👉🏻मल्चिंग यंत्र 👉🏻मळणी यंत्र 👉🏻रोटावेटर 👉🏻 वखर

आवश्यक कागदपत्रे

1) ७/१२, 2)८ अ, 3)बॅक पासबुक,4)आधारकार्ड

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. 

 संबंधित कृषी कार्यालयाच्या अधिकारी यांचे सोबत चर्चा करते वेळेस तालुका कृषी अधिकारी बी एस सिंगाडे, कृषी मंडळ अधिकारी टी जी सुगावे,शेतकरी मित्र डुमणे, धनंजय पा.चव्हाण सह कार्यालयातील सर्व स्टॉप उपस्थित होते

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट