
नायगाव : तालुक्यातील धानोरा तमा येथे लटकवलेल्या स्थितीत आढळून आला, या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु या इसमाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिव्यली. संपत्तीच्या वादातून या इसमाची बहीण,भावजी व भाच्यांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी एकूण १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील टाकळी त.मा.येथील रहिवासी तुळशीराम दता झेलेकर ५० व त्याच्या बहिणी केराबाई शेषेराव गोरगे रा.धानोरा त.मा., चंदरबाई धोडिबा गिने रा.मुगाव,सुनीता हणमंत बोडके रा.पोखणी, अनिता अशोक लव्हाळे, रासालेगाव यांच्यात संपत्तीचा वाद होता. दोन वर्षांपासून हा वाद नायगावच्या न्यायालयात सुरु आहे.या संदर्भात दोन्ही बाजूंनी अनेक बैठका घेण्यात आल्या पण त्या निष्फळ ठरल्या. बैठक आहे म्हणून तुळशीराम यांना धानोरा येथे १६ मार्च रोजी मेव्हणा शेषेराव गोरगे यांनी तुळशीरामचा मुलगा अर्जुन जवळ निरोप देऊन बोलावून घेतले. तुळशीराम हा टाकळी त.मा येथून गेला. पण परत आला नाही. यामुळे मयताच्या नातेवाईकांचा संशय बळावला. वडील मुलगा अर्जुन तुळशीराम झेलेकर हा १७ मार्च रोजी सकाळी वडिलांच्या शोधार्थ टाकळी त.मा.रस्त्याने पायी निघाला असता काही महिला त्याला भेटल्या व त्यांना चौकशी केला असता धानोरा शिवारात पश्चिम दिशेला शेषेराव गोरगे यांच्या शेतात एकाचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या स्थितीत असल्याचे आढळून आले. अर्जुनने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार संशयास्पद वाटला. त्याने त्याने ही माहिती नातेवाईकांना दिली. नंतर रामतीर्थ पोलिसांना ही घटना कळविली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांनी रामतीर्थ पोलिसांना सांगितले रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी मयताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करु असे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी सहा तासानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायगावला नेण्यास परवानगी दिली. मृत व्यक्ती तुळशीराम हा टाकळी त.मा. येथील रहिवासी आहे त्यास १० एकर भिजवणीची जमीन आहे. संपत्ती बळकावण्याच्या हेतूने मयताच्या ४ बहिणींनी वाद निर्माण केला आहे. पूर्वी तुळशीराम यांचे वडील दत्ता झेलकर यांचाही धानोरा येथेच गोरगे यांच्या घरी मृत्यू झाला असून, जमिनीच्या वादातून ४ बहिणी व त्यांचे मालक, मुलांनी तुळशीरामला संपविण्यासाठी प्रकार केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला.
हा मयत तुळशीराम यास २ मुले, सुना नातवंडे,२ मुली असा परिवार आहे. पत्नीचा दोन महिन्यापूर्वी याच वादातून तणावात अपघाती मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाई कांनी केला.मयताचा मुलगा अर्जुन झेलेकर याच्या फिर्यादीवरुन केराबाई शेषेराव गोरगे बहीण-भाजवी, रा धानोरा त.मा, चंदरबाई धोंडिबा गिने बहीण भावजी रा.मुगाव, सुनीता हणमंत बोडके बहीण भावजी रा.पोकर्णी,ता बिलोली, अनिता अशोक लव्हाळे बहीण व भावजी रा.सालेगाव नायगाव व अन्य चार भाचे यांच्याविरुध्द रामतीर्थ पोलीस ठाण्यात कलम ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि महादेव पुरी अधिक तपास करीत आहेत.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा