कार्यालय पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जालना
टोल फ्री क्रमांक - 1064
कार्यालय दुरध्वनी क्र :- 02482-220252
:: प्रेस नोट :: 1379
दिनांक :- 15.03.2021.
खासगी इसम श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल यास कार्यकारी अभियंता, महावितरण ग्रामीण नं 1 चिखलटाणा, औरंगाबाद यांचेकडुन इन्स्टीमेंट मंजुर करुन देतो असे सांगुन 6,000/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाच्या पथकाने पकडले.
- आरोपीचे नाव, हुद्दा व पत्ता - श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल, वय 31 वर्ष व्यवसाय गुत्तेदारी रा. खासगेटजवळ घर नं 8-12-448 जिन्सी, औरंगाबाद (खाजगी इसम)
- गुन्हा घडला तारीख व ठिकाण - दिनांक 15.03.2021 रोजी विभागीय कार्यकारी अभियंता कार्यालय, ग्रामीण विभाग क्रं 1 , चिखलठाणा औरंगाबाद येथे
- लाचेची रक्कम - 16,000/- रुपये.
याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार हे महावितरण कंपनीमध्ये गुत्तेदार असून त्यांनी दिनांक 04.03.2021 रोजी तक्रार दिली की, त्यांचेकडील दोन ग्राहकांचे इन्स्टीमेट मंजुर होणेसाठी त्यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण ग्रामीण नं 1 चिखलठाणा, औरंगाबाद यांचेकडे अर्ज केला होता. सदर गुत्तेदार यांचेकडील ग्राहकांचे इन्स्टीमेंट मंजुर करुन देण्यासाठी खासगी इसम श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल याने कार्यकारी अभियंता, महावितरण ग्रामीण नं । चिखलठाणा, औरंगाबाद यांचेकडुन तुमचे ग्राहकांचे इन्स्टीमेंट मंजुर करुन देतो, असे म्हणून तक्रारदारास 7,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली.
सदर तक्रारीवरून दिनांक 04.03.2021 रोजी लाचेची पडताळणी केली असता खासगी इसम श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल याने तुमचे ग्राहकांचे इन्स्टीमेंट मंजुर करुन देण्यासाठी 7,000/- हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण्ण झाले होते, त्यावरुन आज दिनांक 15.03.2021 रोजी खासगी इसम श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल याने तुमचेकडील ग्राहकांचे इन्स्टीमेंट कार्यकारी अभियंता, महावितरण ग्रामीण नं । चिखलठाणा, औरंगाबाद यांचेकडुन मंजुर करुन देतो, असे म्हणून 7.000 रुपये लाचेची मागणी करुन तक्रारदार यांचेकडून 6,000/- रुपये लाचेची रक्कम स्वत: पंचासमक्ष स्वीकारली असतांना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना पथकाने विभागीय कार्यकारी अभियंता कार्यालय, ग्रामीण विभाग, क्रं 1 , चिखलठाणा औरंगाबाद येथे रंगेहाथ पकडण्यात आले.
खाजगी इसम श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल, वय 31 वर्ष व्यवसाय गुत्तेदारी रा. खासगेटजवळ घर नं 8-12-448 जिन्सी, औरंगाबाद यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालु आहे.
तसेच अॅन्टी करप्शन ब्युरो कडुन आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482-220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क करावा.
पोलसि उप अधिक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जालना.
![]() |
| प्रेस नोट क्र.1379 |
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा