VB-G RAM G योजना मनरेगा ऐवजी नवा ग्रामीण रोजगार हमी कायदा; १२५ दिवस रोजगार, सुधारित मजुरी व डिजिटल पारदर्शकतेवर भर मरवाळी (ता. नायगाव, जि. नांदेड), दि. २ जुलै : ग्रामपंचायत मरवाळी/कोपरा येथे गुरुवारी 'विकसित भारत – जी राम जी (VB-G RAM G – विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन-ग्रामीण)' ग्रामीण रोजगार हमी अभियानाचा शुभारंभ व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात ग्रामीण रोजगार हमीच्या नव्या कायद्याच्या तरतुदी, लाभार्थ्यांचे अधिकार, रोजगाराची प्रक्रिया, ग्रामपंचायतीची भूमिका आणि ग्रामीण विकासातील लोकसहभाग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अभियंता जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, VB-G RAM G हा केंद्र सरकारचा ग्रामीण रोजगार हमी विषयक नवा कायदा असून, १ जुलै २०२६ पासून देशभर लागू करण्यात आला आहे. या कायद्यामुळे पूर्वीच्या मनरेगा (MGNREGA) योजनेऐवजी पात्र ग्रामीण कुटुंबांना आता दरवर्षी १२५ दिवसांच्या हमी रोजगाराचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. या नव्या कायद्यानुसार रोजगार हमीचा कालावधी १०० दिवसांवरून १२५ दिवसांपर्यंत वाढविण्यात आला असून, महागा...
टिप्पण्या