जळगाव : एरंडोल नगरपालिका संकुलातील मुदत संपलेल्या गाळे नोटीस न काढता लिलावात ताब्यात द्यावे यासाठी दीड लाख रूपयांची लाख घेणाऱ्या कर निर्धारण व प्रशासकीय विभागातील कार्यालय अधीक्षकाला धुळे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. एरंडोल पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देवून तसेच तक्रार यांच्या इतर गाळ्यांना नोटीस न देण्यासाठी कर निर्धारण व प्रशासकीय विभागातील कार्यालय अधिक्षक संजय दगडू ढमाळ (वय-५१) रा. म्हाडा कॉलनी अमळनेर यांनी दोन लाख रूपयांची लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती दीड लाख रूपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार 12 रोजी लाचलुचपत विभागाने दुपारी सापळा रचून संशयित आरोपी संजय ढमाळ यांनी दीड लाख रूपये स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी रात्री एरंडोल पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई धुळे एसीबी उपअधिक्षक सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर सोनवणे, संतोष हिरे , कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, राजन कदम,सुधीर मोरे यांनी केली.
Toll free : 1064
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा