नायगाव (बा) : येथील बहुचर्चित पंचायत समितीमधील संवर्गनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गटविकास अधिकारी पि.पि.फाजेवाड यांचाही कोणताच वचक राहिला नसून त्यांच्या दालनासह बहुतांश विभाग दि.१० मार्च रोजी कार्यालयीन वेळ संपण्याआधीच कुलूपबंद असल्याचे तर, अनेकांच्या खुर्च्या रिकाम्याच दिसून आल्याने येरे माझ्या मागल्या या उक्तीनुसार येथे परिस्थिती जैसै थे असल्याने स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सविस्तर वृत्त असे की,गत काही वर्षांपासून येथिल पंचायत समितीमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह अधिकारीवर्गाच्या तकलादू भूमिकेतून स्थानिक कार्यालयासह गांव पातळीवरील बहुतांश कर्मचारी हम करे सो कायदा ! म्हणीत कर्तव्य बजावत आहेत अनेकांना मुख्यालयाचे वावडे असून त्यात गटविकास अधिकारी पि.पि.फाजेवाड व त्यांचे सर्वच संवर्गातील कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी अग्रक्रमी आहेत काहीजण गटा-गटाने स्वतःच्या चारचाकीतून थेट नांदेडहून ये-जा करीत असल्याने त्यांची कर्तव्यतत्परता त्यांच्याच मर्जीवरच अवलंबून आहे तोच कित्ता गावपातळीवरील अनेक ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून गिरविला जात आहे त्यामुळेच पंचायत समितीत असो वा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत संबधित अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य जनतेला त्यांच्या कामांसाठी कार्यालयात व वेळेत मिळेलच याबाबतीतील शाश्वतीच राहिलेली नाही. याबाबतीत गत वार्षिक सर्वसाधारण आमसभेत स्थानिक आ.राजेश पवार यांनीही चांगलीच झाडाझडती घेत संबंधितांना समक्ष निर्देश दिले होते त्याचबरोबर,जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती संजय बेळगे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेकदा पाहणी,तपासणीत दांडीबहाद्दरांवर कडक कारवाईचे स्पष्ट आदेश मिळाल्यानंतरही केवळ नोटीसा बजावण्यात धन्यता मानून स्थानिक पातळीवर दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात आलेली नसल्याने परिस्थितीत अद्याप बदल नाही.
महत्त्वाचे म्हणजे कांही महिन्यांपूर्वी गटविकास अधिकारी म्हणून पि.पि.फाजेवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना 'काही' प्रसंगांना सामोरे जावे लागल्याने त्यांचेकडून परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता होती मात्र ती जणू धुसर बनली असून त्यांचा गावपातळीवरील दूरच पण स्थानिक कार्यालयातच वचक नसल्याचा प्रत्यय पून्हा एकदा दि.१० मार्च रोजी दुपारनंतर पहाणीत दिसून आला.त्यामुळे कामासाठी आलेल्या अनेकजणांना माघारी परतावे लागले.
विशेष बाब म्हणजे गटविकास अधिकारी यांच्या दालनासह लेखा,घरकुल व अन्य महत्वपूर्ण विभाग कार्यालयीन वेळ संपण्याआधीच चक्क कुलूपबंद होते तर,तब्बल ४२ अधिकारी- कर्मचारी असलेल्या या कार्यालयात केवळ बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित होते.परंतू,सक्षम असा एकही अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते.गटविकास अधिकारी यांच्याकडे कामानिमित्त आल्यानंतर ते अनुपस्थित असल्याने त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपण नांदेड येथे असून कार्यालय सुरुच असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना परिस्थितीची जाणीव करून देत पुराव्यासह माहिती दिल्याने नरमते घेत त्यांनी सहाय्यक प्रशासन अधिकारी टोंपे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उद्या सुट्टी असल्याने काहीजण लवकर गेल्याचे अफलातून उत्तर दिले.
दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांकडून दांडीबहाद्दरांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आलेले असले तरीही त्यांची 'कामानिमित्त' व सहा.गटविकास अधिकारी एम.एन.केंद्रे,कार्यालयीन अधीक्षक बासरकर व अनेकांची पून्हा अनुपस्थिती आढळून आल्याने त्यांचेसह संबंधितांवर कडक कारवाई होणे अत्यावश्यक असल्याने याबाबत नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष व तालुका प्रभारी लक्ष्मणराव भवरे यांनी या प्रकरणात दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली असून याबाबत लवकरच वरिष्ठ स्तरावर पुराव्यासह तक्रार करणार असल्याचे सांगितले.
मुकाअ श्रीमती ठाकूर यांच्याकडून केवळ फार्स.. ?
महत्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीमती वर्षा ठाकूर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कासारखेडा व मालेगाव येथे तपासणीत आरोग्य विभागातील कांही कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली होती तर,जिल्हा परिषदेतील दांडीबहाद्दरांनाही नोटीसा दिल्या होत्या त्याचबरोबर,जिल्ह्यात अनेक कार्यालयांना भेटी देऊन दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते.माञ प्रत्यक्षात ठोस कारवाई नसल्याने त्यांच्या दोषींविरुद्धच्या कारवाया व दौरे जणू फार्सच असल्याचे स्पष्ट दिसून येत असून कार्यालयीन वेळेपूर्वीच चक्क एखाद्या पंचायत समितीमधील कांही विभाग कुलूपबंद असतील तर,त्यांचा वचक कसा आहे यास यावरून पुष्टी मिळते.त्यामुळे त्यांनीच स्वतः दांडीबहाद्दर व मनमानी अधिकारी- कर्मचारी यांची झाडाझडती घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
www.zpnanded.in www.maharashtra.gov.in
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा