*आदरणीय सर*
*यशस्वी सापळा*
▶️ *युनिट -* बुलडाणा
▶️ *तक्रारदार-* पुरुष ,वय- ४२ वर्षे रा. शिर्ला नेमाणे, ता. खामगाव, जि.बुलडाणा
▶️ *आरोपी-*
१) श्री. विलास साहेबराव खेडेकर
वय- ५२ वर्षे,
पद- मंडळ अधिकारी, (वर्ग ३)
नेमणूक - लाखनवाडा,
रा. गजानन काॅलनी, खामगाव.
२) बाबुराव उखर्डा मोरे,
वय - ३६ वर्षे , पद - तलाठी, वर्ग (३)
नेमणूक - शिर्ला नेमाणे , ता.खामगाव
रा. किन्ही महादेव, ता. खामगाव.
▶️ *लाचेची मागणी*- रुपये १०००० व दारू मटणाची पार्टी,
▶️ *लाच स्विकारली-*
रुपये १०००० व दारु मटणाची पार्टी.
▶️ *हस्तगत मुद्देमाल-*
दोन इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या बाटल्या व मांसाहारी जेवणाचे पदार्थ.
▶️ *लाचेची मागणी -*
ता. २८/०५/२०२१
▶️ *लाच स्विकारली -*
ता. २८/०५/२०२१
▶️ *घटनास्थळ*
पिंप्री धनगर शिवारातील श्री प्रल्हाद चव्हाण यांचे शेतातील झोपडीसमोर, ता. खामगाव, जि. बुलडाणा.
▶️ *लाचेचे कारण -*.
यातील तक्रारदार यांच्या भावाच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटची सातबारा नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांना रु १००००/- व दारु मटण पार्टीची मागणी करुन रु १०००० यापूर्वीच स्विकारले असून पडताळणी दरम्यान दारु मटण पार्टीची मागणी करुन, सापळा कारवाई दरम्यान दारु मटनाच्या मेजवानीच्या स्वरुपात अनुचित लाभ मिळवितांना मिळून आले.
▶️हॅश व्हॅल्यू काढण्यात आली आहे.
▶️ *सापळा व मदत पथक-* पो.उपअधिक्षक श्री. संजय चौधरी,
पो.निरीक्षक - श्री.सचिन इंगळे
पोलीस नाईक - श्री विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिझवान.
पो.शि.- श्री विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी
चालक पो. ना. श्री नितीन शेटे, पो.शि. शेख अर्शद
▶️ *मार्गदर्शन अधिकारी* :-
1) श्री. विशाल गायकवाड,
पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र.
2) श्री. अरुण सावंत,
अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र.
▶️ *तपासी अधिकारी*
पो. उप अधिक्षक श्री संजय चौधरी.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*
मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा .
----------------------------------------------
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा*.
*संपर्क क्रमांक* - *8888768218*
*टोल फ्री क्रमांक* - *1064*.
-------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा