सजग नागरिकाची दिशाभूल? राज्य माहिती आयुक्त प्रदीप व्यास यांच्या आदेशातील 'तो' भोंगळ कारभार उघड
मुंबई (विशेष प्रतिनिधी): करोडो रुपयांची कर चुकवेगिरी उघड करणाऱ्या एका सजग नागरिकाला कायदेशीर न्याय देण्याऐवजी, चक्क शासकीय आदेशातच दिशाभूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . राज्य माहिती आयुक्त (बृहन्मुंबई) श्री. प्रदीप व्यास यांच्या कार्यालयातील भोंगळ कारभार एका द्वितीय अपिलाच्या आदेशामुळे चव्हाट्यावर आला असून, सुनावणीच्या आदल्या दिवशीच जन माहिती अधिकाऱ्याने निवेदन सादर केल्याचा खोटा उल्लेख आदेशात केल्याचा गंभीर आरोप तक्रारदार यांनी केला आहे. नेमका काय आहे प्रकार? आणि मुख्य आक्षेप भायखळा येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक श्री. वसंत शामराव उटीकर यांनी माहिती अधिकारांतर्गत दाखल केलेल्या एका द्वितीय अपिलाची सुनावणी शुक्रवार, दिनांक ०८ मे २०२६ रोजी राज्य माहिती आयुक्त प्रदीप व्यास यांच्या कार्यालयात पार पडली होती. या सुनावणीचा निकाल दिनांक १८ मे २०२६ रोजी पारीत करून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आला. सदर आदेशाची प्रिंट उटीकर यांनी दिनांक २१ मे २०२६ रोजी काढून पडताळून पाहिली असता, त्यांना मोठा धक्का बसला. आदेशातील अनुक्...