PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

 

PM मोदींनी PM-KISAN योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी केला

दिल्ली,दि.01 जानेवारी 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकरी बाधवांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी किसान सन्मान योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारच्या वतीनं देशातील शेतकऱ्यांना गिफ्ट मिळालं आहे.पंतप्रधान कार्यालयाने 29 डिसेंबर रोजी एक निवेदन जारी करुन सांगितलं होतं की, 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीं पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता हस्तांतरित करण्याची घोषणा करतील. त्यानुसार आज पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.  


देशभरातील 10 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 20 हजार कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजारांचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यातील 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 या तीन महिन्यांचा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. 
या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. 


 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी येथे 'विकसित भारत – जी राम जी' ग्रामीण रोजगार हमी अभियानाचा शुभारंभ

मुद्देमालच जमा नाही, तर समन्स कशासाठी? बिलोली न्यायालयात फिर्यादीची पाचवी वारी; एसीबीच्या न्यायालयीन समन्वयावर प्रश्नचिन्ह