🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१

उद्धवजी अजब आपले सरकार ! हिच का ती शेतकरी कर्जमुक्ती ? सरकारकडे पैसे नाहीत म्हणून नांदेड जिल्ह्यातील जानेवारीत आधार प्रमाणिकरण करून ३९८९ शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित अन् पिक कर्जापासूनही...मग १५०९८ पात्र शेतकऱ्यांचा नंबर कधी येणार ? पालकमंत्र्यांनी बैठकात सूचना करुन उपयोग तो काय?

 


जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नांदेड यांचे कार्यालय,नवा मोंढा कमानीसमोर,बिसेन नगर, नांदेड २

Telephone (02462) 284886 Email ID - ddr.nanded2017@gmail.com

जा.क्र.कक्ष-८/मजोफुशेकयो,२०१९/५८६/२०२१

दिनांक: २८/२९ जून, २०२१

प्रति,

मा.प्रधान सचिव

सहकार,पणन आणि वस्त्रोद्योग विभाग,

मंत्रालय,महाराष्ट्र

विषय :  महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ बाबत..

संदर्भ

१. शासन निर्णय क्र.कृकमा १२१९ / प्र. क्र. १५७ / २.स. दि. २७ डिसेंबर, २०१९ 

२. मा. पालकमंत्री महोदय नांदेड यांच्या दि. २५ जून, २०२१ रोजीच्या सभेतील सूचना,

उपरोक्त विषयी ज्या शेतकऱ्यांकडील दि. १ एप्रिल २०१५ ते दि. ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची दि. ३० सप्टेंबर २०१५ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली तसेच पुनर्गठीत / फेर पुनर्गठीत रक्कम रु. २.०० लाखापर्यंत आहे. अशा शेतकन्यांचे अल्प / अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्जखात्यात रु. २.०० लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय दि. २७ डिसेंबर २०१९ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

तसेच मा. पालकमंत्री महोदय, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली दि. २५ जून २०२१ रोजी झालेल्या सभेत महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेऊन जिल्ह्यातील पात्र शेतकरी असून अद्याप यादीत नाव आलेले नाही.तसेच ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले आहे.परंतु त्यांच्या खात्यावर रक्कम अद्याप (२९ जून २०२१ पर्यंत) जमा झालेले नाही.याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे बाबत सूचित केले आहे.त्यानुषंगाने नांदेड जिल्ह्यातील पात्र १८३२४५ शेतकऱ्यांना शासनामार्फत रु. १२५२.०९ कोटीचा लाभ मिळालेला आहे. तथापि खालील कारणास्तव अद्यापही पात्र लाभार्थी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत.

१. ३९८९ शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण केलेले आहे. तथापि त्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झालेली नाही.

२. १५०९८ पात्र शेतकऱ्याची यादी अद्याप संकेतस्थळावर प्राप्त झालेली नाही.

उपरोक्त कारणामुळे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याने त्यांना नव्याने पीक कर्ज वाटप करण्यास अडचण येत आहे.

तरी वरील बाबींवर शासनस्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.


(अनिल चव्हाण)

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था,नांदेड



शेतकऱ्यांना लाख मोलाचा दिलासा ! शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी, सहज, सोपी आणि पारदर्शक कर्जमुक्ती योजना

👉 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 

▶️ २ लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ 

▶️ अर्ज करण्याची आवश्यकता नाही 

▶️ थकबाकी भरण्याची अट नाही

राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे.
मंत्रिमंडळ निर्णय


२. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मान्यता

आज (24/12/2019) मंत्रिमंडळाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आराखड्याला दिली मान्यता


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट