मित्रा ! कर मैत्री त्यासी | जो सत्याविण शब्द‌ न बोले सहजहि कोणासी ।।धृ।। तुकड्यादास भजन

 


(चाल: मानवा का चिंता वाहतो...)

मित्रा ! कर मैत्री त्यासी ।

जो सत्याविण शब्द‌ न बोले सहजहि कोणासी ।।धृ0।।

सहनशीलता सरळवृत्तिची, वागणूक ज्याची ।

अपुले टुःख न वदे कुणाला, चिंता इतराची ।।१।।

चरित्र निर्मळ, राहणी साधी, निंदि न कवणासी ।

दिनचर्या सततची योग्य ती, हाव नम मानाची ।।२।।

हीन दीनाची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची ।

तुकड्यादास म्हणे तू तरशिल, कीर्ती जरी गासी ।।४।।

                                                              - सन १९६८


मित्रा ! कर मैत्री त्यासी

चाल : मानवा का चिंता वाहतो...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी येथे 'विकसित भारत – जी राम जी' ग्रामीण रोजगार हमी अभियानाचा शुभारंभ

मुद्देमालच जमा नाही, तर समन्स कशासाठी? बिलोली न्यायालयात फिर्यादीची पाचवी वारी; एसीबीच्या न्यायालयीन समन्वयावर प्रश्नचिन्ह