नायगाव,दि 25 जुलै 2021 : प.पू. श्री. मन्ना महाराज कोलंबीकर यांचा अमृत महोत्सव (७५ वी) व शांती सोहळा शके १९४३, नाम संवत्सरे मिती आषाढ कृ. तृतीया,
सोमवार दि. २६/०७/२०२१ रोजी श्री श्री. शंभू महादेवाच्या नगरीत शिखर शिंगणापूर जिल्हा सातारा येथे अर्थव मंगल कार्यालय, श्री गुप्तलिंग पेट्रोल पंप गुप्तलिंग,येथे अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा साजरा होत आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ब आशिर्वचन - प. पु. शंकराचार्य जी, करवीर पीठ, कोल्हापूर. श्रीमंत छ. कल्पनाराजे भोसले, सातारा.
स. भ. श्री. सोन्ना महाराज रामदासी, सज्जनगड संस्थान. वेदमूर्ती श्री. बाळासाहेब शंकर खटावकर, वरुड श्री. वेदमूर्ती श्री. मधुर शास्त्री जोशी त्र्यंबकेश्वर व नाशिक, वरुड, शिखर शिंगणापुर येथील ब्रम्हवृंद, श्री. कल्याणपंत कुलकर्णी (ब्र. हनुमंत महाराज संस्थान, वावरहिरे) यांची राहणार आहे.
- कार्यक्रमाची रुपरेषा अशी आहे. ६ ते ९ : दशविध स्नानस. ९ ते १० : श्री. शंभू महादेव दर्शन व अभिषेक.१० ते ११ : अल्पोपहार स. ११ ते १ : ऐंद्री शांती व शिवलीलामृत पारायण गणेश पुजन, होमहवन, दिपोत्सव तुलाभार (धान्य, सुवर्ण, तैलतुला, ग्रंथ, तुला)दुपारी . १ ते ३ : महाप्रसाद
सायंकाळी. ३ ते ५ सायंकाळी.५ ते ६ विलासबुवा गरवारे, सि. कुरोली यांचे किर्तन ह.भ.प.नंतर मनोगत कार्यक्रम होणार आहे.त्यानिमित्ताने नांदेड जिल्ह्यातील भक्त गणना येण्याचे आ व्हान शिंगणापूर...येथील मना महाराज सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा