🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, जुलै ०३, २०२१

कृषी यांत्रिकीकरण घटाकाअंतर्गत मेसेज आलेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिका-याचे आवाहन



  • निवड झालेल्या 11 हजार 68 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त 4 हजार 533 लाभार्थ्यांनी केली कागदपत्रे अपलोड 

नांदेड, दि. 2 जूलै 2021 :- कृषि यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत विविध योजनेतून तसेच सुक्ष्म सिंचन या घटकाअंतर्गत विविध योजनेतून महाडीबीटी पोर्टलवर नांदेड जिल्हयातील 11 हजार 68 लाभार्थींची निवड झाली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना लघु संदेश पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त 4 हजार 533 लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाहीत. मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास असे अर्ज महाडीबीटी पोर्टल मधून रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे परंतु त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केली नाहीत, अशा सर्वांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीतअधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

निवड झालेल्या लाभार्थ्यांसाठी यांत्रिकीकरण घटकासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे 7/12 उतारा, 8 अ उतारा, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन व तपासणी अहवाल, अ.जाती / अ. जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे तसेच सुक्ष्म सिंचन घटकासाठी आवश्यक असलेली असलेली कागदपत्रे 7/12 उतारा, 8 अ उतारा, सिंचनाची स्रोत नोंद, अ.जाती / अ.जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र इ. कागदपत्रे अपलोड करावीत. ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत त्यांना कागदपत्रे तपासून पूर्व संमती देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना पूर्व समंती मिळुनही सुक्ष्म संच कार्यन्वित केले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी सुक्ष्म संच प्रक्षेत्रावर कार्यान्वित करुनच देयके अपलोड करावीत, असेही आवाहन कृषि कार्यालयाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट