🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, जुलै ०२, २०२१

सिंचन विहीर मस्टर प्रकरण : ग्रा.पं.माहुली चोर चा महा लाचखोर सरपंच 1,20,000 रुपये लाच मागणी करुन 5,000 यापुर्वी घेतल्याचे मान्य करुन 15,000 लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



आदरणीय महोदय 

*यशस्वी सापळा कारवाई*

▶ *घटक* - अमरावती 

▶ *तक्रारदार* - पुरुष , वय 52 वर्ष रा.माहुली चोर जि.अमरावती.

▶ *ईआलोसे* -

1) श्री.रामभाऊ गणपतराव गाडेकर,वय 64 वर्ष, पद - सरपंच ग्रापंचायत माहुली चोर ता. नांदगांव खंडेश्वर,अमरावती.

▶ *लाच मागणी रक्कम* - तक्रारदार व त्यांचे तीन सहकारी यांना प्रत्येकी 30,000/-रुपये, याप्रमाणे एकूण 1,20,000/- रुपये, त्यापैकी पहिला हप्ता प्रत्येकी 5,000/- रुपये प्रमाणे 20,000/-, त्यापैकी 5000/- स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित 15,000/- लाचेची मागणी.

▶ *स्वीकारलेली लाच रक्कम* - 15,000/- रुपये.

▶ *पडताळणी* -

         दि. 30/06/2021.

➡ *सापळा कारवाई* - 

         दि.01/07/2021.

▶ **घटना स्थळ* -

        तक्रारदार यांचे सहकारी यांचे घर ग्राम माहुली चोर, ता. नांदगांव खंडेश्वर, अमरावती.

▶ *कारण* - तक्रारदार व त्यांचे तीन सहकारी यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजने मंजूर झालेले सिंचन विहीर चे मस्टर वर सही करून अनुदान मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत माहुली चोर चे सरपंच श्री. रामभाऊ गाडेकर हे तक्रारदार व त्यांचे तीन सहकारी यांना प्रत्येकी 30,000/-रुपये या प्रमाणे एकूण 1,20,000/- रुपये लाचेची मागणी करीत असून त्यापैकी पहिल्या मस्टर चे प्रत्येकी 5000/-रू, याप्रमाणे एकूण 20,000/-, रुपये त्यांनी तात्काळ देण्यास सांगितल्याने तक्रारदार यांनी सिंचन विहिरीचे पहिल्या मस्टर चे 5000/- त्यांना नाईलाजास्तव दिले असून उर्वरीत तीन सहकारीचे प्रत्येकी 5000/- रू.असे एकूण 15,000/- रू. ची मागणी करीत आहे अशी तक्रार दिल्यावरून वरून पडताळणी कारवाई दरम्यान सरपंच श्री.गाडेकर यांनी तक्रारदार व त्यांचे सहकारी यांना प्रत्येक सिंचन विहिरी च्या मस्टर वर सही करण्यासाठी प्रत्येकी 30,000/- रू. लागतीलच असे म्हणून तक्रारदार यांचेकडून यापूर्वी 5000/- रू. घेतल्याचे मान्य केले, व तक्रारदार यांचे तीन सहकारी यांचेकडून प्रत्येकी 5,000/- रुपये याप्रमाणे 15,000/- रू लाचेची मागणी करून सापळा कारवाई दरम्यान श्री.गाडेकर सरपंच यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष 15,000/- लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे व पुढील कारवाई सुरू आहे.

 *मार्गदर्शन* -

▶मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. 

श्री.अरुण सावंत, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

श्री. गजानन पडघन, पोलीस उप-अधीक्षक, ला.प्र.वी. अमरावती.

▶️ *सापळा व तपास अधिकारी* - श्री.अमोल कडू, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वी. अमरावती.

▶ *सापळा कारवाई पथक* -

श्री. अमोल कडू,पोलिस निरिक्षक,

 ना.पो.शी युवराज राठोड ,

पो.शी शेलेश कडू , राजेश कोचे

▶ ईआलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा.विभागीय आयुक्त , अमरावती विभाग.अमरावती

-----------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन* *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अमरावती पोलीस निरीक्षक अमोल कडू, मो. नं.+918087072919.

*@दुरध्वनी क्रं - 0721-2552355, 2553055

*@टोल फ्रि क्रं 1064*

----------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट