🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

रविवार, जुलै ०४, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर गट सचिव शेख हैदरला (सेवा सहकारी सोसायटी,मरवाळी) 100/- रुपयाची लाच स्वीकारताना नांदेड एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ; गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले

 

नायगाव,दिनांक ०३/०७/२०२१ :- मरवाळी ता.नायगांव येथील सेवा सहकारी सोसायटीचा गट सचिव श्री शेख हैदरसाब याला १००/- रुपयाची लाच स्वीकारताना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, दिनांक १५/०६/२०२१ रोजी यातील तक्रारदार यांनी तक्रर दिली की, "तक्रारदार यांना सेवा सहकारी सोसायटी लिमीटेड,मौजे.मरवाळी ता.नायगांव जि.नांदेड येथुन बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी सदर सोसायटीचा सचिव शेख हैदरसाब हा १००/- रू. लाचेची मागणी करीत आहे.तक्रारदार यांचे तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड कार्यालयाकडुन दिनांक ०३/०७/२०२१ रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये सचिव शेख हैदरसाब याने तक्रारदार यांचेकडे उपरोक्त कामासाठी १००/- रु. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून आजच दिनांक ०३/०७/२०२१ रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक,शाखा रातोळी ता.नायगांव चे परिसरात लावण्यात आलेल्या सापळया दरम्याण सचिव शेख हैदरसाब यांने तक्रारदार यांचेकडुन उपरोक्त कामासाठी १००/- रू. लाचेची रक्कम स्विकारली म्हणुन श्री शेख हैदरसाब हुसेनसाब, वय ४८ वर्ष,व्यवसाय नोकरी- गट सचिव-सेवा सहकारी सोसायटी लिमीटेड,मौजे.मरवाळी,ता. नायगांव रा.रातोळी ता. नायगांव जि. नांदेड नांदेड याचे विरुध्द पोलीस ठाणे नायगांव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उप अधिक्षक श्री विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पो.ना किशन चिंतोरे, जगन्नाथ अनंतवार, अमरजितसिंह चौधरी, मारोती सोनटक्के यांनी पार पाडली आहे.


तरी सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी / कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर खालील कंमाकावर संपर्क करावा.

१) टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक :- १०६४ 

(२) कार्यालयाचा फोन क्रमांक ०२४६२-२५३५१२ 

३) श्री विजय डोंगरे, पो.उप अधिक्षकांचा मोबाईल क्रमांक ८९७५७६९९१८

Website : www.acbmaharashtra.gov.in

Mobile App -  www.acbmaharashtra.net

Facebook Page: www.facebook.com/MaharashtraACB


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट