मुंबई, दि. 5 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दि. 6 जून हा दिवस सर्व महाविद्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
श्री. सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दिनांक 6 जून हा दिवस सर्व महाविद्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा होणार आहे. याबद्दलचे शासन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा