🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, जून ०४, २०२१

लाच प्रकरण : लाचखोर सरपंच पती ग्रामपंचायत सदस्य 20 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले

 लाच देणे आणि लाच घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे


जालना : मौजे काजळा ता. बदनापुर जि.जालना येथील सरपंच यांचे पती व स्वतः ग्रामपंचायत सदस्य श्री. रंगनाथ सुभाष देवकाते यास पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी 20,000/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाच्या पथकाने रंगहात पकडले.

याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी दिनांक 22.03.2021 रोजी तक्रार दिली कि, तक्रारदार मौजे काजळा ता. बदनापुर जि.जालना येथील रहिवाशी असून त्यांचे नावे पंतप्रधान आवास घरकुल योजने अंतर्गत 1,20,000/- रुपये मंजूर झाले असून, त्यापैकी 15,000/- रुपयांची रक्कम त्यांचे खात्यावर जमा झालेली आहे, त्यांचा दुसरा हप्ता 45,000/- रुपयांचा त्यांचे खात्यावर टाकण्यासाठी नमुद मौजे काजळा ता. बदनापुर जि.जालना येथील सरपंचाचे पती ग्रामपंचायत सदस्य श्री. रंगनाथ सुभाष देवकाते यांनी 30,000/- रुपयांची लाचेची मागणी तक्रारदार यांचेकडे केली होती. सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली.

सदर तक्रारीवरून दिनांक 22.03.2021 रोजी लाचेची पडताळणी केली असता, तक्रारदार यांचेकडे ग्रामपंचायत सदस्य श्री. रंगनाथ सुभाष देवकाते यांनी पंतप्रधान आवास घरकुल योजने अंतर्गत दुसरा हप्ता 45,000/- रुपयांचा त्यांचे खात्यावर टाकण्यासाठी 30,000/- रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पण्ण झाले. आज दि. 29.04.2021 रोजी ग्रामपंचायत सदस्य श्री. रंगनाथ सुभाष देवकाते यांनी तक्रारदार यांचा पंतप्रधान आवास घरकुल योजने अंतर्गत दुसरा हप्ता 45,000/- रुपयांचा त्यांचे खात्यावर टाकण्यासाठी पहीला हप्ता म्हणून 20,000/- रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष करून स्विकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना पथकाने ग्रामपंचायत कार्यालय, मौजे काजळा ता. बदनापुर जि. जालना येथे रंगेहाथ पकडण्यात आले.

ईतर लोकसेवक श्री. रंगनाथ सुभाष देवकाते, वय 32 वर्ष, ग्रामपंचायत सदस्य, मौजे काजळा ता. बदनापुर जि.जालना यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालु आहे.


तसेच अॅन्टी करप्शन ब्यूरो कडुन आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482-220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट