*आदरणीय सर*
*== प्रेसनोट ==*
*यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -* पालघर, ठाणे
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-३० वर्षें,
▶️ *आरोपी-* *१.अंकुश पुरुषोत्तम पाटील वय ३७ वर्ष भूसंपादन सहायक जिल्हाधिकारी कार्यालय पालघर*
*२.*वर्षा मनोहर पानझडे पाटील अव्वल कारकून जिल्हाधिकारी कार्यालय पालघर*
▶️ *लाचेची मागणी-* १५,०००/- रुपये,
▶️ *लाच स्विकारली-* १५,०००/ रुपये
▶️ *हस्तगत रक्कम-* १५,०००/-रुपये
▶️ *लाचेची मागणी -* ता.१८/०६/२०२१
▶️ *लाच स्विकारली -* ता. २१/०६/२०२१ रोजी १८:३२ वा.
▶️ *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार यांचे राहते घर विरार डहाणू रेल्वे चार पदरीकरणात संपादित केले असून त्याचे मोबदला म्हणून ६,३६,०००/- मिळालेले आहेत सदर रक्कम मिळवून दिली म्हणून लोकसेवक क्र १ व २ यांनी तक्रारदार यांचेकडे १५,०००/- रु. ची मागणी करीत होते म्हणून तक्रारदार यांनी एसीबी पालघर येथे तक्रार दिली. त्याअनुषंगाने दि.१८/०६/२०२१ रोजी तक्रारदार यांना पंचासह आलोसे क्र १ यांचेकडे पडताळणी करीता पाठवले असता आलोसे क्र१ यांनी आलोसे क्र २ यांचेकरीता तक्रारदार यांना १५,०००/- रु. लाचेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये स्पष्ट झाल्याने आज दि.२१/०६/२०२१ रोजी सापळा रचून तक्रारदार यांना आलोसे यांचेकडे लाचेच्या रकमेसह पाठवण्यात आले असता आलोसे क्र १ यांनी पालघर रेल्वे स्टेशन परिसरात तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यास आलोसे क्र २ यांनी प्रोत्साहन देवून सहमती दर्शविली आहे. आलोसे क्र १ यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पुढील कारवाई चालू आहे.
▶️ *सापळा पथक -* *नवनाथ जगताप, पोलिस उपअधीक्षक ,भारत साळुंखे, पोलीस निरीक्षक, मपोहवा/मांजरेकर, पोना/चव्हाण, पोना/सुतार, पोना/ सुमडा, पोशी/उमतोल, चापोशि/ दोडे*
▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-
*मा.श्री.पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* - *जिल्हाधिकारी पालघर*
----------------------------------------
*पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
------------+++++++++----------
*अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर*
*दुरध्वनी 02525-297297*
*पोलिस उप अधीक्षक नवनाथ जगताप*
*मोबा 9923346810/ 9850158810*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
====================

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा