लाच प्रकरण : महा लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह लाचखोर पोलीस हवालदार 10 हजाराची लाच स्वीकारताना चतुर्भुज ! दोन्ही आरोपींना एसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात


पोलिस ठाण्यातच स्वीकारली दहा हजारांची लाच : पोलिस वर्तुळात खळबळ

वरणगाव : वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरावर कारवाई न करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या वरणगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच स्वीकारताच लाच जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यातच हा सापळा यशस्वी झाला. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगन्नाथ वाणी (56, रा. भिरूड कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) व कॉन्स्टेबल गणेश महादेव शेळके (31, पोलीस वसाहत, वरणगाव ता. भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

डंपरवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच 

साकेगाव येथील 30 वर्षीय तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर (क्रं. एम. एच. 40 एन. 4086) असून वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्या द्वारे वाळू वाहतूक केली जाते मात्र या वाहनावर कारवाई न करण्यासाठी दोघा आरोपींनी गुरुवारी लाच मागितली मात्र लाच द्यावयाची नसल्याने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला. पोलिस ठाण्यातच आरोपींनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या पोलिस ठाण्यात नोकरी केली त्या पोलिस ठाण्यातच दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी 

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश डी. भामरे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, एएसबाय दिनेशसिंग पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी येथे 'विकसित भारत – जी राम जी' ग्रामीण रोजगार हमी अभियानाचा शुभारंभ

मुद्देमालच जमा नाही, तर समन्स कशासाठी? बिलोली न्यायालयात फिर्यादीची पाचवी वारी; एसीबीच्या न्यायालयीन समन्वयावर प्रश्नचिन्ह