- नायगाव येथे ऑक्सिजन निर्मिती कारखाना लवकरच चालू होणार...
- अपूर्ण असलेले बांधकाम लवकरच पूर्ण होणार...
- नायगाव दवाखान्याचा फायदा संपूर्ण मतदार संघाला
नायगाव,दि 14 एप्रिल : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असुन विशेषतः ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुका कोरोना संसर्गामध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सध्या नायगाव येथे फक्त कोविड केअर सेंटर असून त्याठिकाणी फक्त प्रथमोपचार केला जातो परंतु चिंताजनक / गंभीर (Critical) रुग्णांना मात्र नांदेड येथे उपचारासाठी भटकावे लागते बऱ्याचदा त्यांना बेडसुध्दा मिळत नाहीत. त्यामुळे आ.राजेश पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांना नायगाव येथे कोरोना सेंटर चालू करण्यासाठी विनंती केली असता त्यांनी त्वरीत मान्य केले.त्याचप्रमाणे 14 रोजी आ.राजेश पवार यांच्या विनंतीवरुन जिल्हाधिकारी नायगाव येथे आले.जिल्हाधिकारी आणि आ.राजेश पवार यांनी नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली व कोरोना दवाखान्याच्या नियोजनाबात चर्चा केली.
त्याचप्रमाणे येथे कर्मचारी निवास सदनासाठी (Staff Quarters) साठी निधी द्यावा अशी मागणी देखील जिल्हाधिका-यांना केली असता तत्वता त्यांनी ती मागणी देखील मान्य केली. त्याचप्रमाणे येथील शस्त्रक्रिया विभाग (Operation Theatre) पुर्णपणे सुसज्य करण्याचे ठरले आहे. तसेच नवीन सोनोग्राफी मशीन व शस्त्रक्रिया विभागामधील इतर उपकरणे देखील त्वरीत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे आता नायगाव ग्रामीण रुग्णालय लवकरच सर्वप्रकारे सुसज्य होणार असल्यामुळे नायगाव तालुक्यासह नायगाव विधानसभा मतदार संघातील इतर तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे येथे अजुन नवनवीन उपकरणे उपलब्ध होणार असल्यामुळे याठिकाणी सद्यस्थितीपेक्षा तीन पट जास्तीच्या रुग्णांवर उपचार झाला पाहीजे असे आ.राजेश पवार यांनी येथील डॉक्टरांना सुचना केली आहे.
नायगाव येथे ऑक्सिजन निर्मिती कारखाना लवकरच चालू होणार...
५० खाटांच्या कोरोना दवाखान्यासाठी त्याचप्रमाणे पुढील इतर आजारातील रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास सध्या नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे नांदेडहून उपलब्ध केल्या जाते बऱ्याचवेळेस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते म्हणूनच मा. जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करुन याठिकाणी साधारणत: १५ ते २० दिवसांनी ऑक्सिजन निमिर्ती कारखाना उभा करण्याचे नियोजन केले आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक
यांचे आ.पवारांनी मानले आभार...
माझी मागणी मंजूर केल्याबद्दल मी नायगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या वतीने जिल्हाधिकारी, डॉ. विपीन इटनकर व जिल्हा शल्यचिकित्सक, श्री. डॉ. निळकंठ भोसीकर व ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता, डॉ. गुंटूरकर यांचे आभार व्यक्त केले.
अपूर्ण असलेले बांधकाम लवकरच पूर्ण होणार...
ग्रामीण रुग्णालय नायगाव परिसरामध्ये एका इमारतीचे बांधकाम मागील तीन वर्षापासून बंद आहे त्याकामाबद्दल सुध्दा संबंधीत अधिकारी व गुत्तेदाराला देखील सदरील काम पूर्ण करण्याची ताकीद देण्यात आली आहे. सदरील अपूर्ण काम आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या निवास सदनाचे (Staff Quarter) दुरुस्तीचे काम पुढील चार ते सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे गुत्तेदारांनी सांगितले आहे.
नायगाव दवाखान्याचा फायदा संपूर्ण मतदार संघाला
कोरोनाचा दवाखाना हा नायगाव शहरात होणार असला तरी देखील मतदार संघातील उमरी व धर्माबाद तालुक्यातील जनतेला देखील नांदेडला न जाता येथेच उपचार घेता येईल, त्याचप्रमाणे या दवाखान्यातील इतर सोयीसुविधा अद्ययावत करण्याचा प्रयत्न होणार असल्यामुळे या दवाखान्याचा एकंदरीतच फायदा संपूर्ण मतदार संघाला होणार आहे.
#कोवीड दवाखाना
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा