शिव भोजनालय शिवसेना पदाधिका-याचेच : नांदेडमध्ये वृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या शिवभोजन चालकावर तात्काळ कारवाई करा - पत्रकार संरक्षण समिती

 


नांदेड,दि 22 एप्रिल : सध्या कोरोणा महामारीने अनेक गोर गरीब लोकांचे बेरोजगारीने हाल बेहाल झाले असुन तीच बाब  लक्षात घेऊन ठाकरे सरकारने कष्टकरी कामगार व गोरगरीब लोकांसाठी शिवभोजन थाळी मोफत मिळणार असल्याची घोषणा केली. 

 तरी मात्र नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिवभोजन चावलवण्याचे काम शिवसेनेच्या पदाधिकारी ने घेऊन इतर व्यक्तीस चालवण्यास दिले असून या शिवभोजनालयात स्वतंत्र स्वयंपाकगृह नाही व कसलीही स्वच्छता दिसुन येत नाही व तसेच याठिकाणी काही मोजक्याच व्यक्तींना भोजन दिले जात असुन सदरील भोजनालय चालक जनतेची दिशाभूल करीत असुन या भोजनालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.

अशातच दि. २० एप्रिल रोजी एक वृद्ध महिला या शिवभोजनालयात  भोजन मागण्यास गेली असता त्या गरीब वृद्ध महिलेला शिवीगाळ करत मारहाण करून माणुसकीला काळीमा फासण्याचे काम केले आहे.


तरी या प्रकरणाची चौकशी करून त्या शिवभोजन चालकासह मारहाण करणाऱ्या महिलेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आले असुन या निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,सचिव शशिकांत गाढे आदि सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी येथे 'विकसित भारत – जी राम जी' ग्रामीण रोजगार हमी अभियानाचा शुभारंभ

मुद्देमालच जमा नाही, तर समन्स कशासाठी? बिलोली न्यायालयात फिर्यादीची पाचवी वारी; एसीबीच्या न्यायालयीन समन्वयावर प्रश्नचिन्ह