नायगाव बाजार पेठेत तुफान गर्दी, सर्व कापड दुकाने, बुट दुकाने, इलेक्ट्रिक दुकाने, कुलर फ्रीज ची दुकाने बिंधास्त चालु ! पोलीस व नगर पंचायतचे साफ दुर्लक्ष; जिल्ह्याचे कलेक्टर विपिन ईटनकर ,पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे सह संबंधित अधिकारी, लक्ष देतील का?
राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना, दिवसेंदिवस नायगाव मधील रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पहायला मिळत आहे,आज नायगांव तालुका बाधीत रुग्णांची संख्या-१७१ वर गेली असताना प्रशासन नुसते बघ्याच्य भूमिका आहे.नायगाव मध्ये नगरपंचायत प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत, तसेच नायगाव तहसिलचे पथक झोपा काढत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. नायगाव मधील कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या वाढण्यास प्रशासन जबाबदार असून मोठे व्यापारी प्रशासनास हाताशी धरून छुप्या पद्धतीने व्यापार चालवत आहे परंतु छोटा व्यापारी व सामान्य नागरिक भरडल्या जात आहे.एवढ्या मोठ्या संख्येने उभे असलेली वाहने आणि दुकानाच्या छोट्या दरवाजा उघडा आहे. हे नगरपंचायत, महसूल विभाग व पोलीस यंत्रणेला दिसत नसेल तरी कसा? वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे
![]() |
| कपड्याच्या दुकानात चपलांचा खच |




टिप्पण्या