🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, मार्च २५, २०२१

दरोडेखोरांना अभय देणार्‍या भाग्यनगरच्या पोलीसांवर कारवाई करण्याची पत्रकारांची मागणी

गुन्हा दाखल न करण्यामागे भाग्यनगर पोलीसाचे गौडबंगाल काय आहे?

नांदेड,(दि.२५ मार्च) : नांदेड शहरात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचे ढिंधवडे निघत आहेत. सुपारीबाज दरोडेखोर आणि पोलीस यांच्या अभद्र युतीतूनच निर्मल होस्टेलवर दरोडा पडला आहे. काही सुपारीबाज दरोडेखोरांनी जवळपास पाच तास लूट करीत असतानाही भाग्यनगरचे पोलीस मात्र कोणाच्या दबावाखाली या दरोड्याकडे दुर्लक्ष करीत होते हे समजत नाही. दरोडा पडून पाच ते सहा दिवस होत आहेत तरीही भाग्यनगरच्या पोलीसांकडून या दरोड्याचा गुन्हा दाखल न करता कायद्याची अमलबजावणी न करता तपास करत असल्याचेच सांगत आहेत. तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करुन तपास करायचे की तपास करुन गुन्हा दाखल करायचे आणि गुन्हेगारांना शोधायचे हेच पोलीसांना समत नाही काय? असा प्रश्न निर्माण होतो आहे. भाग्यनगरचे पोलीस म्हणजे हिटलरशाहीचा नमुना बनत आहे. या पोलीस स्टेशनचे अनेक कारनामे सध्या चर्चित आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नावालाच शिल्लक असून फक्त आपल्या थैल्या भरण्यासाठीच कायदा व सुव्यवस्थेला फासावर चढवण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरु आहे. सामान्य नागरीकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवून गुंड आणि गुन्हेगारांच्या अभद्र युतीतून वसुली चालू ठेवायची एवढेच काम सध्या भाग्यनगरच्या पोलीसांकडून सुरु आहे.नांदेड शहरात गजबजलेल्या वस्तीत पाच तास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून जवळपास पन्नास लाखांचा माल दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. यासाठी ट्रकचा वापर केला. शेजारच्या लोकांना शस्त्रांचा धाक दाखवत घराबाहेर येऊ नका अशा धमक्या दिल्या. एखाद्या चित्रपटात शोभेल असा दरोडा टाकून दहशत निर्माण केली असली तरीही पोलीस मात्र या दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवत नाहीत. यावरुन या दरोडेखोरांची या परिसरात किती दहशत असेल याची कल्पना येते. अनेकदा पोलीस निरीक्षकांना फोन करुनही केवळ तपास चालू असल्याचीच धून चालू आहे. पोलीस अधिक्षकांनाही याबाबत निवेदन दिले असतानाही अद्यापही या दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची धमक पोलीसात नाही. म्हणजेच भाग्यनगरचे पोलीस आणि दरोडेखोर यांची अप्रत्यक्ष युती आहे की काय? असा सवाल निर्माण होतो.भाग्यनगर पोलीसांच्या हफ्तेखोर कृतीमुळेच या भागात गुन्हेगारांच मनोबल वाढत असून सुपारीबाज गुंड तयार होत आहेत. पोलीसांच्या वरदहस्तानेच चालू असलेली ही गुंडगीरी थांबविण्यासाठी भाग्यनगरच्या पोलीसांची चौकशी करुन दोषींवर कारवाई केल्यासच या गुंडांना मिळणारा पोलीसांचा पाठींबा बंद होईल. गुंडांना आणि दरोडेखोरांना अभय देणार्‍या भाग्यनगरच्या पोलीस निरीक्षकांची चौकशी करुन त्यांना निलंबीत करणे अशी मागणी पत्रकारांनी केली असून याबाबत लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकारांनी दिला आहे.





✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट