🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, मार्च २६, २०२१

एसीबीची तीन दिवसात दुसरी कारवाई : लाचखोर महिला सहा.पोलीस निरीक्षक (रेल्वे) सह दोन लाचखोरांना साडे बारा हजार घेताना एसीबीने त्यांच्या मागे साडेसाती लावून घेतले ताब्यात पण एक भगोडा लाचखोर लाच घेऊन पळून गेला

 लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाची तीन दिवसात दुसरी कारवाई

रेल्वे पोलिस कर्मचारी एक लाख रुपयाची लाच स्विकारताना अटक

गंगाखेड प्रतिनिधी :- लाचलुचपत विभागाची गंगाखेड तालुक्यातील दि २२ मार्च रोजी तलाठी आणि सरपंच यांना १२,५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. ही घटना ताजी असताना दिनांक २५ मार्च रोजी परळी पोलिसांकडून एक लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेसह दोघांना रंगेहात पकडले आहे. 

गंगाखेड रेल्वेस्थानकावरील कँन्टीन चालू देण्यासाठी व आॅट्रासिटी गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणार्‍या परळी येथील रेल्वे पोलिस ठाण्यातील एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह लाच स्वीकारणार्‍या दोघा पोलिस कर्मचार्‍यांविरीध्द परभणीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दि.२५ मार्च रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे यांच्यासह पोलिस निरीक्षक अमोल कडू यांची तक्रारदाराने भेट घेतली. परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी महादेवराव मुंढे यांच्यासह तेथील कर्मचारी संजय त्रंबक भेंडेकर, प्रेमदास दयाराम पवार हे आपल्याविरूध्द दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीचा अर्ज मागे घ्यावयास व गंगाखेड रेल्वेस्थानकात असलेले कँटीन चालवू ठेवण्यासाठी मदत करू. त्यासाठी एक लाख रुपये दे, अशी मागणी केल्याचे म्हटले. या तक्रारीच्या आधारे हुंबे, कडू यांनी कर्मचारी जमील जहागीरदार, अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, शेख मुखीद सचिन धबडगे, माणिक चट्टे, सारिका टेहरे, सावित्री दंडवते, रमेश चौधरी, जनार्धन कदम आदींच्या पथकाव्दारे सापळा लावला. त्यावेळी दोघे पोलिस कर्मचारी पंचासमक्ष रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडल्या गेले. त्याक्षणी संजय भेंडेकर याने लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्या पाठोपाठ घटनास्थळावरून पोबारा केला. महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंडे या लाच स्वीकारताना घटनास्थळी आल्या नाहीत, परंतु त्यांनी पडताळणी दरम्यान लाच मागीतल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दिली.गंगाखेड शहरातील तीन दिवसातील ही दुसरी घटना आसल्याने अधिकारी व कर्मचारी लाच घेताना आता नविन पर्याय शोधतात का ? आशी चर्चा गंगाखेड शहरात होत आहे.


आदरणीय मॅडम/सर,

➡️सापळा अहवाल ⬅️

▶️ युनिट- परभणी

▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 45 वर्ष

▶️ आरोपी लोकसेवक:-क्र 1) माधुरी महादेवराव मुंढे , वय 32 वर्षे व्यवसाय- सहायक पोलिस निरीक्षक, शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ 

आरोपी क्र 2) संजय त्रंबक भेंडेकर, वय 53 वर्ष, व्यवसाय पोह ब.नं 214 नेमणूक शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ आरोपी क्र.3) प्रेमदास दयाराम पवार, वय 37 वर्षे, पोलीस शिपाई ब.नं 567 शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ 

▶️ लाचेची मागणी:- आरोपी लोकसेवक क्र.1,2 व 3 यानी 1,00,000/- रूपये

▶️ लाच स्वीकारली रक्कम 1,00,000/- रुपये आलोसे क्र. 2 यांनी स्विकारून लाचेच्या रक्कमेसह पळून गेला आहे.

▶️ लाचेची मागणी 

 दि.18/03/2021 रेल्वे पोलीस स्टेशन गंगाखेडची पार्किंग

 दि. 20/03/2021 रेल्वे पोलीस स्टेशन परळी

▶️ लाचेची स्वीकृती

 दिनांक 25/03/2021 रोजी                                     

▶️ कारण - तक्रारदार यांचे विरुद्धच्या अट्रोसिटी अर्जा मध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व त्यांची रेल्वे स्टेशन गंगाखेड येथील कँटीन चालवू देण्यासाठी आरोपी क्र.1 ,2 व 3 यांनी तक्रारदार यांना पंचसमक्ष 1,00,000/- रु लाचेची मागणी करुन आरोपी क्र.2 यांनी सदर लाचेची रक्कम पंच क्र.1 यांचे समक्ष स्विकारून लाचेच्या रकमेसह पळून गेला आहे.पोस्टे गंगाखेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️मार्गदर्शक-मा. कल्पना बारवकर,पोलीस अधीक्षक, मा.अर्चना पाटील ,अपर पोलीस अधीक्षक ला प्र वि नांदेड परिक्षेत्र नांदेड 

▶️ पर्यवेक्षण अधिकारी :- श्री भरत के हुंबे, पोलीस उप आधीक्षक,ला.प्र.वि. परभणी

▶️ सापळा पथक :- श्री.अमोल कडू, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि. परभणी , पोना/अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, शेख मुखीद पोकाॅ/सचिन धबडगे , सारिका टेहरे, चापोना चौधरी व सर्व सापळा पथक, ला. प्र. वि.परभणी

➡️आलोसे क्रं 1 यांचे सक्षम अधिकारी - मा.पोलीस महासंचालक मुंबई

आलोसे क्रमांक 2 व 3 यांचे सक्षम अधिकारी मा.पोलीस अधीक्षक, औरंगाबाद रेल्वे



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇 लेटेस्ट न्यूज अपडेट पाहण्यासाठी गुगलवर सर्च करा

www.nandednewsupdate.blogspot.com

सापळा कारवाई अहवालासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

👊1️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊2️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊3️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट