प्रेसनोट
दिनांक ०८/०३/२०२१ आरोपी लोकसेवक कांचन ज्ञानदेव पालवे वय ४५ वर्षे, पद वरीष्ठ सहायक वर्ग ३, नेमणुक जिल्हा परिषद लातूर, जि.लातूर यांनी ३,०००/-रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वतः स्विकारली म्हणुन गुन्हा दाखल.
यातील तक्रारदार यांच्या सेवानिवृत्ती नंतरचे प्रलंबीत बिलाचा प्रस्ताव पंचायत समिती लातुर यांच्या कडे सादर करण्यासाठी तक्रारदार यांना ६०००/- रुपये लाचेची मागणी करत असले बाबतची तक्रार दिनांक ०८/०३/२०२१ रोजी प्राप्त झाली होती. तक्रारदार यांचे तक्ररीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांच्याकडून दिनांक ०८/०३/२०२१ रोजी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता कांचन पालवे वरीष्ठ सहायक यांनी ५,०००/- रूपये लाचेची मागणी करून तटजोडीअंती ३०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी लोकसेवक कांचन पालवे वरीष्ठ सहायक यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम देण्यासाठी तक्ररदार यांना दिनांक ०८/०३/२०२१ रोजी पाठविले असता आरोपी लोकसेवक कांचन पालवे वरीष्ठ सहायक यांनी पंचासमक्ष ३,०००/-रुपये लाचेची रक्कम स्वतः स्विकारली.
म्हणून त्याचे विरूध्द पोलीस स्टेशन शिवाजी नगर लातुर येथे गु.र.नं ११९/ २०२१ कलम ७, ला.प्र.का. अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर हे करीत आहेत.
सदरची सापळा कार्यवाही श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नदिड परिक्षेत्र नांदेड, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नदिड परिक्षेत्र, नादिड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे, सपोउपनि संजय पस्तापुरे, पोह/रमाकांत चाटे, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, पोना/मोहन सुरवसे, मपोना/शिवकांता शेळके, संतोष गिरी, शिवशंकर कव्छवे, आशिष वीरसागर, अमोल शिंदे, संदीप जाधव, दिपक कलवले, मपोशि रुपाली भोसले, चापोना/राजु महाजन यांनी पार पाडली आहे.
तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी/ कर्मचारीहे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणी संदर्भात मोबाईल फोनवर अधिकारी/कर्मचारी (लोकसेवक) यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबंधाने काही माहीती असल्यास किंवा शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर खालील कमांकावर संपर्क करावा.
१) मा.श्रीमती कल्पना बारवकर,
पोलीस अधीक्षक,ला.प्र.विभाग, नांदेड परिक्षेत्र -मोबाईल क्रमांक ८८८८८४१९६५
२) माणिक बेंद्रे, पोलीस उप अधिक्षक -मोबाईल क्रमांक ९९२३६६६६४१४
३) कुमार दराडे पोलीस निरीक्षक -मोबाईल क्रमांक ९६५७७०९८४१
४) बबासाहेब काकडे पोलीस निरीक्षक -मोबाईल क्रमांक ९०६७२६६२६४
५) टोल फ्री हेल्प लाईन कमांक -1064
६) कार्यालयाचा फोन कमांक -०२४८२-२४२६७४
७) Website - www.acbmaharashtra.gov.in
८) Mobile App - www.achmaharashtra.net
१) Facebook Page - www.facebook.com/MaharashtraACE
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर
open this link in a new window


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा