बिलोली-देगलूर मतदारसंघामधील भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्याची नायगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी पदी निवड_जिल्हाध्यक्ष धोंडगेचा तुघलकी कारभार-स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर



 नायगाव,(१९ फेब्रुवारी) : जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्षपदाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मात्र नायगाव तालुक्यातील निवड वादाच्या भोव-यात सापडली आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेला पदाधिकारी चक्क देगलूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे काम करणारा तर तालुकाध्यक्षपदीही भाजपचेच सक्रीय काम करणा-यांची वर्णी लावण्यात आली असल्याचा पक्षातील तरूण निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दावा केला असून मतदार संघात असंख्य सक्षम पदाधिकारी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हत्वाच्या पदावर मतदार संघाबाहेरील व पक्षाबाहेरील लोकांची निवड का ? असा सवाल करण्यात येत आहे. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी जिल्हा भरातील विविध तालुक्यातील विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड नुकतीच जाहीर केली आहे. 

नायगाव तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आलेला अमोल जाधव हा पदाधिकारी भाजपाचे नेते राजेश देशमुख कुंटूरकर यांचा सक्रीय कार्यकर्ता आहे. तो त्यांच्या नावाने ' राजेश कुंटूरकर युवा समुह ' या नावाचा व्हाटस्प् ग्रुप चालवतो. या माध्यमातून त्यांनी राजेश कुंटूरकर यांच्यामागे तरूणांची एक मोठी फळी उभी केला आहे. 

विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेला पंडीत जाधव हा पदाधिकारी चक्क देगलूर विधानसभा संघातील कामरसपल्ली (ता. बिलोली) या गावचा रहिवासी आहे. तो नुकताच आपल्या गावात भाजपाच्या गटाकडून आपल्या चुलत्याला उभा करून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. स्वतः ला राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा नेता म्हणून घेणारा हा नेता खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, रवी पाटील खतगावकर, श्रावण पाटील भिलवंडे, माणिकराव लोहगावे या भाजपातील जेष्ठ कनिष्ठ नेते मंडळीकडे वावरतो. विशेष म्हणजे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चा तो धर्माबाद तालुकाध्यक्ष आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माधव देवसरकर हे भाजपाचेचं काम करतात. तर मग पंडित जाधव हा युवा नेता नेमका कोणत्या पक्षाचा ? असा सवाल करण्यात येत आहे. 

विशेष म्हणजे निवड करण्यात आलेले दोन्ही पदाधिकारी हे आता पर्यंत तालुक्यात झालेल्या कोणत्याच चळवळीत कधी भाग घेतला नसल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

नायगाव तालुका हा खूप जुना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मधल्या काळात थोडीशी पडझड झाली असली तरी गेल्या दहा बारा वर्षा पासून तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे यांनी उतरत्या काळात पक्षाची कमान सांभाळत तरूणांची एक फार मोठी फळी निर्माण केली आहे. तालुक्यात असंख्य सक्षम कार्यकर्ते असताना बाहेरच्या मतदार संघातील व बाहेर च्या पक्षात काम करणा-या लोकांची पक्षातील म्हत्वाच्या पदावर वर्णी लावण्यात आल्याने नायगाव विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यंक्त केली आहे. जिल्हाध्यक्ष धोंडगे हे फादरचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांना विश्वासात न घेता घरी बसूनच पदाधिका-यांची निवड करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडे तक्रार करण्यात येणार असल्याचे पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते गजानन पाटील पवार यांनी सांगितले आहे.

👇 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अधिकृत वेबसाईट/संकेतस्थळ

https://www.ncp.org.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी येथे 'विकसित भारत – जी राम जी' ग्रामीण रोजगार हमी अभियानाचा शुभारंभ

मुद्देमालच जमा नाही, तर समन्स कशासाठी? बिलोली न्यायालयात फिर्यादीची पाचवी वारी; एसीबीच्या न्यायालयीन समन्वयावर प्रश्नचिन्ह