🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, फेब्रुवारी १७, २०२१

नांदेड परिक्षेत्राचा सापळा कारवाई दोषसिद्धी अहवाल-७,००० लाच घेतलेल्या ग्रामसेवकास ३ वर्षे कारावासाची शिक्षा

 

*सापळा कार्यवाही दोषसिध्दी अहवाल*

▶️ *युनिट -* लातूर

▶️ *न्यायालयाचे नाव* - मा.अतिरिक्त सत्र न्यायालय 06, लातूर.

▶ *पो.स्टे गु.र.नं. व कलम* - पो.स्टे. चाकुर गु.र.नं. 3020/2012  कलम 7,12, 13(1)(ड) सह 13(2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988

▶ *वि.ख.क्र* - 06/ 2013

▶️ *आ.लो.से*- 

1. श्रीकांत प्रभाकर पतंगे वय 27 वर्ष, पद-ग्रामसेवक वर्ग-3, नेमणूक-ग्रामपंचायत कार्यालय, जठाळा ता. चाकुर 2. प्रल्हाद नागनाथ कानुरे, वय 26 वर्ष, पद-ग्रामसेवक, वर्ग-3, नेमणूक- ग्रामपंचायत कार्यालय डोंगरज ता. चाकुर                                    

▶️ *लाचेची रक्कम* - 7,000/-₹ 

▶️ *शिक्षा*-  आरोपी क्रमांक 01 यांना कलम 7 अन्वये 3 वर्षे शिक्षा व 10,000/-रु. दंड तसेच कलम 13 अन्वये 3 वर्षे शिक्षा व 10,000/-रु. दंड. दोन्ही शिक्षा एकदाच भोगायाच्या आहेत.                         

आरोपी क्रमांक 02 यांची  निर्दोष मुक्तता केली आहे.

▶️ *तपासी अधिकारी* - एन.जी. अंकुशकर, तत्कालीन पो.उप.अधीक्षक, ला.प्र.वि. लातूर

▶️ *शिक्षेचे कारण* - यातील तक्रारदार यांच्या जिल्हा परीषद प्राथमिक शाळा जठाळा येथील शाळेच्या खोलीचे दुरुस्तीचे केलेल्या कामाचे 1,22,180/-रुपयाचे मंजूर होवुन आलेल्या बीलाच्या चेकवर सही करण्याचे  कामासाठी आरोपी क्रमांक 01 यांनी 7,000/-रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम हाँटेल मयूर हॉटेलमध्ये आरोपी क्रमांक 02 यांचे करवी लाच स्वीकारली म्हणून शिक्षा.

▶  *मार्गदर्शन* - सदर शिक्षेची कार्यवाही नांदेड परिक्षेत्र नांदेडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पो.उपअधिक्षक माणिक बेद्रे, यांचे मार्गदर्शनाखाली सरकारी वकील श्री.संतोष देशपांडे, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे,दराडे,पो.हवालदार लक्ष्मीकांत देशमुख यांनी पार पाडली आहे.    

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर

*दुरध्वनी क्रं.* - 02382-242674

*टोल फ्रि क्रं. - 1064*

*माणिक बेद्रे, पोलीस उप अधीक्षक* 9923666644

*पो. नि.कुमार दराडे* - 9657709841 *  

*पो.नि.बाबासाहेब काकडे*- 9067266264

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट

www.acbmaharashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट