उपविभागीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात वाळूच्या गाडीसाठी मागितली६५ हजार रुपयांची लाच, सलग दुसऱ्या दिवशी बडा अधिकारी पकडला


 माजलगाव(जि. बीड) : अवैध वाळू उपसा करणारी गाडी चालू देण्यासाठी ६५ हजार रुपयांची लाच घेताना माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई जालना येथील एसीबीच्या पथकाने केली.

माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करण्यात येतो. यासाठी अधिकाऱ्यांना हप्ते द्यावे लागतात, अशी चर्चा सर्रास करण्यात येते. गुरुवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी वाळूची गाडी चालू ठेवण्यासाठी ६५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाचेची रक्कम गायकवाड यांच्या

बीड व पाटोदा पंचायत समितीचे बीडीओ नारायण मिसाळ यांनी पाटोदा तालुक्यातील सार्वजनिक विहिरीचे देयक अदा करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

बीड येथील राहत्या घरी ३७ हजारांची लाच घेताना बीड एसीबीने बुधवारी रंगेहात पकडले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी चालकामार्फत ६५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आला. या दोन घटनांमुळे बीड जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

गाडीचालकाकडे तक्रारदाराने देताना माजलगावातील संभाजी चौकात एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीतून वाळूचा अवैधरीत्या उपसा मोठ्या प्रमाणावर होतो. यास वाळू माफियास पाठबळ देण्याचे काम अधिकारी करत असतात. गोदावरी नदीच्या पलीकडे जालना जिल्ह्याची हह सरू होते दोन्ही भागातन वाळचा

मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या उपसा होतो. हा अवैध उपसा होऊ द्यावा यासाठी वाळू माफिया है अधिकार्यांना लाच देऊन स्वत:चे उखळ पांढरे करतात. यात सर्वांची मिलीभगत असल्याचेही वारंवार समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड व त्यांचा चालक यांना पुढील कार्यवाहीसाठी बीड येथे नेण्यात आले आहे.

* आदरणीय सर*   

Trap Case Report

➡ घटक :- जालना

➡ तक्रारदार :- पुरुष ४५ वर्ष व वाहतुक व शेती

➡ आरोपी : लोकसेवक श्रीकांत शाहू गायकवाड वय ३० वर्ष पद - उपविभागीय अधिकारी,वर्ग १.माजलगाव, जिल्हा बीड,रा मूळ गाव..तूगत तालूका पंढरपूर.जिल्हा सोलापूर

2..लक्ष्मण तात्यासाहेब काळे. वय ३० कोतवाल/डायव्हर.वर्ग ४

➡ लाचेची मागणी:-

     ६५०००/- 

➡ लाच स्विकारली

     ६५०००/-

▶️लाचेची मागणी व स्वीकृति दिनांक :-

  १८/०२/२०२१

➡ कारण :- यातील तक्रारदार यांना वाळू वाहतूक करु देण्यासाठी व वाळू वाहतूक करतांना कोणतीही कारवाई न करण्यासाठी आरोपी क्रं. १ यांनी ६५०००/- रु ची लाचेची मागणी करून आरोपि क्र.2 याने स्विकारली. 

➡ सापळा पथक :- श्री रवींद्र निकाळजे पोलीस उपअधीक्षक, श्री जावेद, चेके,मस्के .लाप्रवि जालना. 

➡मार्गदर्शन अधिकारी :- मा.डाॅ.श्री राहुल खाडे,पोलीस अधीक्षक लाप्रवि ॵरंगाबाद, 

मा डाॅ.अनिता जमादार, अपर पोलिस अधीक्षक , लाप्रवि, ॵरंगाबाद

➡ सक्षम आधिकरी:- प्रधान सचिव,महसुल व वन विभाग,मंत्रालय,मुंबई


👇 लाच लुचपत सापळा कार्यवाहीची वेबसाईट

www.maharashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी येथे 'विकसित भारत – जी राम जी' ग्रामीण रोजगार हमी अभियानाचा शुभारंभ

मुद्देमालच जमा नाही, तर समन्स कशासाठी? बिलोली न्यायालयात फिर्यादीची पाचवी वारी; एसीबीच्या न्यायालयीन समन्वयावर प्रश्नचिन्ह