पोस्ट्स

मीडिया मॉनिटरिंगविषयक शासन निर्णयाबाबत महाराष्ट्र शासनाचे स्पष्टीकरण

इमेज
  मुंबई प्रेस क्लबने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन By: संजय चिखले (✍🏼माळा आडवं मरवाळी✍🏼) वृत्त विशेष 📍मुंबई, रविवार दि.०९ मार्च २०२५ :  महाराष्ट्र शासनाने आज मीडिया मॉनिटरिंगविषयक निर्गमित शासन निर्णयाबाबत सविस्तर स्पष्टीकरण देत मुंबई प्रेस क्लबने व्यक्त केलेल्या शंकांचे निरसन केले आहे. या उपक्रमाचा उद्देश माध्यमांवर देखरेख ठेवणे किंवा टीकेला आळा घालणे नसून, चुकीच्या माहितीचे विश्लेषण करून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे हा आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. देखरेख नव्हे , तथ्य तपासणी: हा उपक्रम केवळ प्रसिद्ध झालेल्या माहितीमधील तथ्यांची पडताळणी करेल. पत्रकार किंवा वृत्तसंस्थांवर कोणतीही देखरेख ठेवली जाणार नाही. सार्वजनिक हितासाठी चुकीच्या माहितीचे निराकरण केले जाईल. वस्तुनिष्ठ विश्लेषण ‘नकारात्मक’ वृत्तांत म्हणजे केवळ चुकीची, दिशाभूल करणारी किंवा जाणीवपूर्वक विकृत केलेली माहिती, असे यात अभिप्रेत आहे. तथ्यांवर आधारित रचनात्मक टीका कधीही नकारात्मक म्हणून वर्गीकृत केली जाणार नाही. स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित ही वर्गीकरण प्रणाली आहे. तसेच माध्यमांमधून प्रसिद्ध झालेली वस्...

एसटी महामंडळ बसमध्ये प्रवास करताना आता सुट्ट्या पैशाची चिंता मिटली,MSRTC ने यूपीआय क्यू आर कोड स्कॅन करून तिकीट देण्याची सुविधा सुरू केली

इमेज
  संजय चिखले, नांदेड : एसटीतून प्रवास करताना आतापर्यंत तिकीट काढण्यासाठी सुट्या पैशांची मोठी समस्या जाणवत होती. अनेकदा या सुट्या पैशावरून प्रवासी व वाहकामध्ये वादही होत. मात्र आता एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट देण्याची सोय केली आहे. त्यामुळे प्रवाशांची आता तिकिटासाठी सुट्या पैशांची चिंता मिटणार आहे. एसटीत पारंपरिक पद्धतीने अजूनही रोख पैसे घेऊन तिकीट देण्याची पद्धत आहे. परंतु यात बऱ्याचदा सुटे पैेसे नसल्याने तिकिटाची अडचण होते. सुटे पैसे नसतील तर कंडक्टर (वाहक) उतरताना उरलेले पैसे घ्या म्हणतात. बऱ्याचदा घाईत उतरताना ते पैसे घेण्याचे प्रवासी विसरतात. किंवा वाहकाकडेच सुटे पैसे नसतील तर प्रवाशांसोबत तू-तू मै-मै होते. यावर आता एसटी महामंडळाने कायमस्वरूपी तोडगा काढला असून आता डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट देण्यात सोय करण्यात आली आहे. सर्व वाहकांसाठी ॲण्ड्राईड तिकीट इश्यू मशिन्स (ईटीआयएम) नव्याने सेवेत दाखल झाल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे. शिवाय रोख पैसे दे...

वृत्त विशेष: शेत वहीवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

इमेज
By संजय चिखले मरवाळी, गुरुवार,दि.१६/०१/२०२५: यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत तहसिलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेत रस्त्याचा समावेश बंधनकारक करणे व शेत रस्त्यांच्या नोंदणी ७/१२ इतर हक्कात करण्याबाबत महसूल मंत्री यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस वित्त नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार अभिमन्यू पवार, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते. महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले की, शासनाने शेत रस्त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही होतात. शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनाव...

वृत्त विशेष: शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

इमेज
  शिवपाणंद व शेत रस्त्यांची कामे दर्जेदार करा ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करणार पाणंद रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे महिनाभरात निकाली काढणार मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार By संजय चिखले मरवाळी, गुरुवार,दि.०६/०२/२०२५ : राज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, अशी सूचना देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. शिवपाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. नागपूर पॅटर्न राबवणार महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात प्रती किलोमिटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनविण्यात आले आहेत. या कार्यप...

PCR-MCR: नांदेडच्या उप-यास दोन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड(PCR) तर दुसरीकडे अंबड उपविभागीय कार्यालयातील आरोपीचा वाढीव PCR संपल्यानंतर आता १७ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी (MCR)

इमेज
     संजय चिखले नांदेड, मंगळवार,दि.०४ फेब्रुवारी २०२५: काल दि. 03.02.2025 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कार्यालय जालना, जि. जालना येथे करण्यात आलेल्या लाच सापळा कारवाईतील आलोसे नामे अमोल रमेश येन्नावार  वय 47 वर्ष पद - वरीष्ठ लिपीक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कार्यालय, जालना जि. जालना ( वर्ग 3) यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक करून आज दि. 04.02.2025 रोजी मा. श्री. एस. जी. अडके साहेब, विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, क्र 4, जालना जि. जालना यांचे समक्ष न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने नमुद आलोसेचा गुन्ह्याचे तपासकामी दि. 05.02.2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड (PCR) मंजुर केला आहे.               तसेच वाढीव पोलीस कोठडी मध्ये असलेला उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबड जि. जालना येथील सापळा कारवाईतील आलोसे नामे देवानंद कारभारी डोईफोडे वय 37 वर्षे, सहाय्यक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी, कार्यालय अंबड जि. जालना यांचा वाढीव एक दिवसाचा  PCR संपत असल्याने आलोसे यास पुन्हा एक दिवसाचे वाढीव PCR चे मागणीसह मा.विशेष न्यायालय अंबड येथे ...

MJP परतूर कार्यालयात वरिष्ठ क्लर्क असलेल्या नांदेडच्या उप-याच्या भाडेतत्त्वावर असलेल्या गाडीचे बिल काढण्यासाठी साहेब व स्वतः करिता 8 हजाराची लाच स्वीकारताना ऍंटी करप्शन ब्युरो पथकाने मुसक्या आवळल्या

इमेज
  By संजय चिखले नांदेड, सोमवार,दि.०३-०२-२०२५: तक्रारदार यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उप विभाग परतूर येथिल कार्यालयात भाडेतत्वावर असलेल्या बोलेरो जीपचे बिले मंजुर करण्यासाठी आलोसे अमोल रमेश यन्नावार वय 47 वर्षे व्यवसाय नौकरी वरीष्ठ लिपीक, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग कार्यालय, जालना यांनी साहेबासाठी 5000/-रुपये व स्वतः करिता 3000/- रुपये अशी एकुण 8000/- रुपयांची लाच मागणी करुन ती स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे तक्रारदार यांची बोलेरो जीप क्र. एम.एच.46 पी-8184 ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जालना अंतर्गत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उप विभाग परतूर येथिल कार्यालयात भाडेतत्वावर असुन सदर जीपचे मागील तीन बिले एकुण 1,25000/- रुपये मंजुर करण्यासाठी यातील आलोसे अमोल रमेश यन्नावार वय 47 वर्षे व्यवसाय नोकरी वरीष्ठ लिपीक, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग कार्यालय, जालना यांनी साहेबासाठी 5000/-रुपये व स्वतः करिता 3000/- रुपये अशी एकुण 8000/- रुपयांची लाच मागणी केली, परंतु तक्रारदार यांची त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे तक्रार ...

PCR:अंबड उपविभागीय महसूल कार्यालयातील अव्वल कारकूनास (महसूल सहायक) ३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड

इमेज
  जात प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना जालना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडून आवळल्या होत्या मुसक्या By संजय चिखले नांदेड, शनिवार, दि.०१-०२-२०२५: काल दि. ३१.०१.२०२५ रोजी उपविभागीय अधिकारी, कार्यालय अंबड, जि. जालना येथे करण्यात आलेल्या लाच सापळा कारवाईतील आलोसे नामे देवानंद कारभारी डोईफोडे वय ३७ वर्ष सहाय्यक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबड जि. जालना ( वर्ग ३) यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक करून आज दि. ०१.०२.२०२५ रोजी मा. श्री. गायधनी साहेब, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, अंबड जि. जालना यांचे समक्ष न्यायालयात हजर केले असता... मा. न्यायालयाने नमुद आरोपीचा गुन्ह्याचे तपासकामी दि. ०३.०२.२०२५ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड (PCR) मंजुर केला आहे.             लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील क्रंमांकावर संपर्क साधावा. अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जालना कार्यालय 02482-220252 मो. क्रं. 9881463365. मो. क्र. 9767108455. टोल फ्री क्र. 1064.