Respected sir/madam
* Demand CASE
➡युनिट :- नांदेड
➡तक्रारदार :- पुरुष वय 48 वर्ष
➡आरोपी लोकसेवक :- 1)श्री प्रमोद बाबुराव सीतापे, वय 40 वर्ष, व्यवसाय नोकरी कनिष्ठ लीपीक, ग्रामिण रुग्णालय बाभळगाव, ता. जि. लातुर रा. विकासनगर, बार्शी रोड, लातुर
➡ तक्रार प्राप्त :- दिनांक 02/03/2021
➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 02/03/2021
➡ लाच मागणी रक्कम:- 4,000/- रुपये तडजोडीअंती 3000/-रू
➡ कारण:-
यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना 7 व्या आयोगाच्या सुधारित सेवा अंतर्गत अश्वासीत प्रगती योजनेचा मंजुर झालेल्या 03 लाभांपैकी पहिल्या लाभाची रक्कम तक्रारदार यांचे खात्यावर जमा केली त्याचे बक्षीस / मोबदला म्हणुन 4,000/- रु . लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 3,000/- रु . स्वीकारण्याचे मान्य केले.
➡️मार्गदर्शक:- मा. श्रीमती कल्पना बारवकर,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र नांदेड
मा. श्रीमती अर्चना पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक ला. प्र.वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड
➡️ SO:- श्री विजय डोंगरे पोलीस उपअधिक्षक ला.प्र.वि.नांदेड
➡️TLO:- श्री राहुल पखाले ,पोलीस निरीक्षक
ACB नांदेड, टीम पोहेकॉ बालाजी तेलंगे, पोना गणेश तालकोकूलवार, जगन्नाथ अनंतवार, सचिन गायकवाड, शेख मुजीब
प्रेसनोट
दिनांक ०२/०३/२०२१
ग्रामिण रूग्णालय बाभळगांव ता. जि. लातुर येथील कनिष्ठ लिपीक प्रमोद सितापे यांनी यांनी ३,०००/- रू. ची लाच मागणी केल्या बाबत नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कार्यवाही
दिनांक ०२/०३/२०२१ रोजी यातील तक्रारदार यांनी तकार दिली की, "यातील लोकसेवक प्रमोद सितापे हे तकारदार यांना ७ व्या वेतन आयोगाच्या सुधारित सेवा अंतर्गत अश्वासित प्रगती योजनेवा मंजूर झालेल्या ०३ लाभां पैकी पहिल्या लाभाची रक्कम तकारदार यांचे खात्यावर जमा केली त्याचे बक्षींस/ मोबदला म्हणुन ४,०००/- रू. लाचेची मागणी करीत आहेत".
तकारदार यांचे तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडून दिनांक ०२/०३/२०२१ रोजी ग्रामिण रूगणालय, बाभळगांव ता.जि. लातुर परिसारत पंचासमथ्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये लोकसेवकः सितापे यांनी तकारदार यांना उपरोक्त कामासाठी ४,०००/- रू. लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३,०००/- रू. स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. म्हणुन लोकसेवक प्रमोद बाबुराव सितापे, वय ४० वर्ष, व्यवसाय नोकरी कनिष्ठ लिपीक, ग्रामिण रूप्णालय, बाभळगांव ता.जि. लातुर रा. विकासनगर, बार्शी रोड, लातुर यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये पोलीस स्टेशन लातुर ग्रामिण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि बी.एच. काकडे लाप्रवि लातूर हे करीत आहे.
सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उप अधिक्षक श्री विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल पखाले, पोहेकॉ बालाजी तेलंगे, पोना गणेश तालकोकुलवार, जगन्नाथ अनंतवार, सचिन गायकवाड, शेख मुजीब यांनी पार पाडली आहे.
तरी सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी/ कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनबर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर खालील कमाकावर संपर्क करावा.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता