- आरोपीचे नाव,हृद्दा व पत्ता : लोकसेवक श्री. राजू नारायण घाडगे वय 35 वर्ष व्यवसाय नोकरी वरीष्ठ तंत्रज्ञ महावितरण, शाखा तिर्थपुरी, जि. जालना रा. मारुती मंदीराजवळ तिर्थपुरी ता.घनसावंगी जि. जालना
- गुन्हा घ ता व ठि : दि- 01.03.2021 रोजी महावितरण कार्यालय,शाखा तिथ्थपुरी, जि. जालना येथे
- लाचेची रक्कम : 11,000/- रुपये.
याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, त्यांची मौजे भायगव्हाण ता. घनसावंगी येथे शेती असून त्यांना जायकवाडी कॅनॉल येथुन शेतीसाठी पाणी आवश्यक असल्याने त्यांनी व इतर 3 शेतकरी यांनी कृषी पंपासाठी विदयुत पॉवरची आवश्यकता असल्याने कृषी पंपासाठीचे कोटेशन भरुन महावितरण, शाखा तिर्थपुरी येथे अर्ज होता, सदर तक्रारदार यांना व इतर 3 शेतकरी यांना कृषी पंप जोडणीचे कोटेशन मंजुर करुन देण्यासाठी महावितरण, शाखा तिर्थपुरी येथील वरीष्ठ तंत्रज्ञ श्री. राजू नारायण घाडगे यांनी कोटेशनच्या रक्कमे व्यतिरिक्त स्वतःसाठी 5,000/- रुपये व इतरांसाठी 14,000/- रुपये अशी एकुण 19,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदारास वरीष्ट तंत्रज्ञ श्री. राजू नारायण घाडगे यांना व त्यांचे सहकारी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. सदर तक्रारीवरून दि. 24.02.2021 रोजी पडताळणी केली असता वरीष्ठ तंत्रज्ञ श्री. राजू नारायण घाडगे यांनी तक्रारदार यांचे व त्यांचे सोबतचे इतर 3 शेतकरी यांचे जायकवाडी कॅनॉल वरुन विदयुत पंपासाठी कनेक्शन जोडणी कोटेशन मंजुर करुन देण्यासाठी स्वत:चे 5,000/- रुपये व इतरांसाठी 14,000/- रुपये अशी एकुण 19,000/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण्ण झाले. तसेच आज दि. 01.03.2021 रोजी आलोसे वरीष्ठ तंत्रज्ञ श्री. राजू नारायण घाडगे यांनी तक्रारदार यांचेकडून विदयुत पंपाचे कोटेशन मंजूर करुन देण्यासाठी 11,000/- रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्विकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने महावितरण कार्यालय, उपकेंद्र तिर्थपुरी जि जालना येथे रंगेहाथ पकडले.
लोकसेवक श्री. राजू नारायण घाडगे वय 40 वर्ष व्यवसाय नोकरी वरीष्ठ तंत्रज्ञ महावितरण, उपकेंद्र तिर्थपुरी, जि. जालना रा. मारुती मंदीराजवळ तिर्थपुरी ता. घनसावंगी जि. जालना (बर्ग - 3 ) यांचे विरुद्द गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालु आहे.
तसेच अॅन्टी करप्शन ब्युरो कडून आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482-220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क कराया.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता