गुरुवार, फेब्रुवारी १८, २०२१

सिंचन विहिर बिल प्रकरण-आरोपी लोकसेवक-नारायण मिसाळ,गट विकास अधिकारी,५० हजार लाच मागून ३७ हजार स्विकारताना रंगेहात पकडले


 आरोपी लोकसेवक गटविकास अधिकाऱ्याचे वय अवघे 32 वर्षे

:: प्रेस नोट ::

दि. १७/०२/२०२१

आरोपी लोकसेवक - श्री नारायण बाबासाहेब मिसाळ, वय ३२ वर्षे, पद गट विकास अधिकारी,पंचायत समिती,पाटोदा वर्ग-१ ,रा.हॉटेल जनसागर समोर च-हाटा फाटा नगर रोड बीड, ता.जि.बीड, कायमचा पत्ता खोकरमोह ता.शिरुर कासार जि.बीड यांना ३७०००/-(सदोतीस हजार रुपये) लाच स्विकारल्या वरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांचेकडुन कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग :- बीड 

पोलीस स्टेशन :- पोलीस ठाणे बीड ग्रामीण, ता.जि. बीड

गुन्हा नोंद कलम :- कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ 

आरोपीचे नाव व कार्यालय :- श्री.नारायण बाबासाहेब मिसाळ, वय ३२ वर्षे, पद गट विकास अधिकारी, पंचायत समिती, पाटोदा,वर्ग-१ ,रा.हॉटेल जनसागर समोर ब-हाटा फाटा नगर रोड बीड, ता.जि.बीड कायमचा पत्ता सोकरमोह ता शिरुर कासार जि.बीड.

स्विकारलेली लाचेची रक्कम :- ३७०००/- (सदोतीस हजार रूपये)

थोडक्यात माहिती :- तक्रारदार यांनी दिनांक २०/११/२०२० रोजी तक्रार दिली की, तक्रारदार यांचे मनरेगांतर्गत खोदलेल्या सार्वजनिक विहीरी चे बिल मंजुर करण्यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती पाटोदा श्री.नारायण मिसाळ हे ५०,००० हजार रुपये लाचेची मागणी करत आहेत. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड येथे तक्रार दिली.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २०/११/२०२० रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक श्री. नारायण मिसाळ गट विकास अधिकारी पंचायत समिती,पाटोया यांनी पंचासमक्ष ५०००० रु. मागणी करुन तडजोडी अंती ३७००० रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.

सदर लाच मागणी पढताळणीवरुन आज दिनांक १७.०२.२०२१ रोजी आलोसे श्री.नारायण गिसाळ, यंचे विरुद्ध त्यांचे घरी नगर रोड,बीड येथे सापळा लावला असता त्यांना पंचासमक्ष रु.३७००० लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात पकड़ण्यात आले आहे. 

आलोसे श्री.नारायण बाबासाहेब मिसाळ, वय-३२ क गट विकास अधिकारी पंचायत समिती,पाटोदा वर्ग-१ ,रा.हॉटेल जनसागर समोर च-हाटा फाटा नगर रोड बीठ, ता.जि.बीड यांचे विरुध्द पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.

सदरची कारवाई मा.डॉ.राहुल खाडे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, मा.डॉ. अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद,यांचे मार्गर्कनासाली श्री.बाळकृषण हनपुडे पाटील, पोलीस उप अधीक्षक, बीड व पोलीस अमंलदार,सत्यनारायण खेत्रे,अमोल बागलाने,हनुमान गोरे,विजयकुमार बरकडे,सखाराम घोलप,स्नेहलकुमार कोरडे, चालक अमंलदार मोरे,म्हेत्रे ला.प्र.वि.बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाया लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी संपर्क साधवा.

संपर्क पत्ता :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड

संकेतस्थळ :- www.acbmaharashtra.gov.in

ई-मेल1)dyspacbbeed@ mahapolice.gov.in

2)dyspacbbeed@gmail.com 

ऑनलाईन तक्रार अॅप्लीकेशन :- acbmaharashtra.net

टोल फ्री क्रमांक :- १०६४

दुरध्वनी क्रमांक :- ০२४४२-२२२६४९

व्हॉटस अप क्र. :-९९३०९९७७००,

पोलीस अधीक्षक ला.प्र.विभाग औरंगाबाद :-८८८८८०७२९९

अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि,औरंगाबाद :- ९८८११००८१२३

पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.विभाग,बीड :- ९१५८६३२६२६


(बाळकृष्ण हलमुडे पाटील) 

पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता