शुक्रवार, जानेवारी २४, २०२५

महाराष्ट्रात दोन यशस्वी सापळा कारवायामधे चार लाचखोर चतुर्भुज

 


By संजय चिखले

नांदेड,दि.२४-०१-२०२५: आज दिनांक २४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ॲंटी करप्शन‌ ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन युनिट द्वारे करण्यात आलेल्या दोन यशस्वी सापळा कारवाई मधे ४ लाचखोर आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले आहे.धुळे युनिट द्वारे करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत महिला सरपंच व ग्रामसेवक तसेच भंडारा युनिट द्वारे करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत आजी माजी सरपंच जाळ्यात अडकले आहेत.

  1. नाशिक लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत धुळे घटक एक कारवाई
  2. नागपूर लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत भंडारा घटक एक कारवाई

  •  एक यशस्वी सापळा कारवाई धुळे तालुक्यातील नंदाने ग्रामपंचायत पंचायतचा आरोपी सरपंच रविंद्र निंबा पाटील व आरोपी माजी सरपंच अतुल विठ्ठल शिरसाट याचेवर धुळे पथकाने केली
सविस्तर माहिती असी कि,तक्रारदार यांच्या मालकीची मौजे नंदाने ता. जि. धुळे येथे गट नंबर 59/3 येथे शेतजमीन असून सदर जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळणे करिता विभागीय व्यवस्थापन नायरा एजन्सी लिमिटेड यांनी दि 01.09.2024 रोजी धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने सरपंच/ग्रामसेवक ग्रामपंचायत नंदाने ता. जि. धुळे यांच्या नावे सदरचा पेट्रोल पंप उभारणी करिता ना हरकत प्रमाणपत्र मिळणे करिता दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांचे कडे जमा केले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे मित्र योगेश पाटील यांचे सह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय नंदाने येथे जाऊन आलोसे क्र.01 व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला असता आलोसे क्र. 01 यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करिता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांचे करिता 5,00,000/- रुपये लाचेची मागणी केल्याची आज दि. 24.01.2025 रोजी ला.प्र.वि. धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज रोजी पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान आलोसे क्र.01 यांनी 5,00,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यांचे सोबत हजर असलेले आरोपी क्र.02 यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 2,50,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 1,00,000/- रुपयाचा पहिला हप्ता स्वीकारल्याचे मान्य केले होते त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र.01 यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून 1,00,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारून आरोपी क्र.02 यांचेकडे दिली असता, त्यांनी ती स्वीकारून त्यांचे खिशात ठेवून घेतली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल म्हणून गुन्हा.

सदरची सापळा कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र यांचे मार्गदर्शन व श्री सचिन साळुंखे पोलीस उपअधीक्षक लाचलुतपत प्रतिबंधक विभाग धुळे यांचे पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी- 
        श्रीमती   रूपाली खांडवी पोलीस निरीक्षक ला.प्र. विभाग, धुळे, पो. हवा. राजन कदम, पो.कॉ. प्रशांत बागुल, सर्व नेमणूक ला.प्र.वि.धुळे युनिट यांच्या पथकाद्वारे यशस्वी करण्यात आली आहे

  • धुळे जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसम याने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी,किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे 02562234020 येथे संपर्क करावा.
-------------------
टोल फ्री क्रमांक 1064

  • दुसरी यशस्वी सापळा कारवाई भंडारा तालुक्यातील पलाडी ग्रामपंचायत महिला सरपंच आरोपी लता संदीप गोस्वामी व ग्रामसेवक आरोपी मिलिंद रुपदास जनबंधू याचेवर भंडारा पथकाने केली
सविस्तर माहिती असी कि,तक्रारदार यांचे मौजा - पलाडी, तालुका - भंडारा येथे गट क्र 04 मध्ये असलेल्या जमिनीमध्ये त्यांना त्यांचे घराचे बांधकाम करायचे आहे. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत पलाडी येथे नोव्हेंबर 2024 मध्ये अर्ज केला होता. दिनांक 31/12/24 रोजी तक्रारदार यांनी नमूद दोन्ही आरोपीताना भेटून सदर बाबतचे ना हरकत प्रमाण पत्र देणे बाबत बोलणी केली असता, त्यांनी तक्रारदार यांना सदरचे प्रमाणपत्र देण्या करिता 15,000/- रुपये लाचेची मागणी केली. 
तक्रारदार यांचे तक्रारी वरून दिनांक 20/01/25 रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आरोपी तानी तडजोड अंती 15,000/-- रुपयाची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले.
आज रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी इलोसे श्रीमती लता गोस्वामी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून 15000/- रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली. पोलीस स्टेशन कारधा येथे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची सापळा कारवाई श्री.दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर,श्री सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि, नागपूर,श्री संजय पुरंदरे,अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि, नागपूर यांचे मार्गदर्शन व पो.उप.अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार,ला.प्र.वि.भंडारा यांचे पर्यवेक्षणाखाली सापळा व तपास अधिकारी --
      पोलीस निरीक्षक श्री मयूर चौरसिया ला प्र वि भंडारा,
उप.अधीक्षक डॉ.अरुणकुमार लोहार, पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया पो हवा मिथुन चांदेवार, पो हवा अतुल मेश्राम, पो शि विष्णू वरठी, म.पो.शि अभिलाषा गजभिये सर्व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा यांच्या पथकाद्वारे यशस्वी करण्यात आली आहे

  •  भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी स्वतः किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.अँन्टी करप्शन ब्युरो, भंडारा

दुरध्वनी 07184-252661

@ टोल फ्रि क्रं. 1064

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता