शनिवार, जानेवारी २५, २०२५

महाराष्ट्रात तीन यशस्वी सापळा कारवायामधे चार लाचखोर चतुर्भुज

 

By संजय चिखले

नांदेड,दि.२५-०१-२०२५: आज दिनांक २५ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ॲंटी करप्शन‌ ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तीन युनिट द्वारे करण्यात आलेल्या तीन यशस्वी सापळा कारवाई मधे ४ लाचखोर आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले आहे.छत्रपती संभाजीनगर युनिट द्वारे शिल्लोड तालुक्यात करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत महसूल सहायक (अनाधिकृत गौण खनिज उत्खनन/वाहतूक पथक) तसेच गडचिरोली युनिट द्वारे पुराडा वनपरिक्षेत्रात करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत वनपाल व सांगली युनिट द्वारे करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत पोलीस हवालदार व पोलीस नाईक ACB च्या जाळ्यात अडकले आहेत.

  1. छत्रपती संभाजीनगर लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत छत्रपती संभाजीनगर घटक एक कारवाई
  2. नागपूर परिक्षेत्र अंतर्गत अंतर्गत गडचिरोली घटक एक कारवाई
  3. पुणे लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत सांगली घटक एक कारवाई
  • एक यशस्वी सापळा कारवाई शिल्लोड तहसील कार्यालयातील महसूल सहायक,वर्ग-३ (अनाधिकृत गौण खनिज उत्खनन/वाहतूक पथक) आरोपी शरद दयाराम पाटील याचेवर छत्रपती संभाजीनगर पथकाने केली

सविस्तर माहिती असी कि,तक्रारदार यांचे ट्रॅक्टर ट्रॉली असून उपळी गावाजवळील नदी पात्रातून अवैध वाळू काढून, वाळू वाहतूक करू देऊन, तक्रार यांच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून महिन्याला 25,000/- लाचेची मागणी करून, त्यात तडजोड करून, तडजोडी अंती 20,000/-रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. मागणी केलेली लाचेची रक्कम,20,000/-रुपये, पंचासमक्ष स्वतः स्विकारली, असता आलोसे यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पो.स्टे सिल्लोड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सुरू आहे.

सदरची सापळा कारवाई श्री संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ॲंटी करप्शन‌ ब्युरो छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक,(ॲंटी करप्शन‌ ब्युरो छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र), श्री. राजीव तळेकर, 
पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. छ.संभाजी नगर ,श्री. दिलीप साबळे ,पो. उप अधिक्षक,ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी-
      केशव दिंडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर
  सहाय्यक सापळा अधिकारी-
 विजय वगरे, पोलीस निरीक्षक ,ला. प्र. वि छत्रपती संभाजीनगर,पोह/अशोक नागरगोजे, पोह/राजेंद्र सिनकर, ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर यांच्या पथकाद्वारे यशस्वी करण्यात आली आहे.

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अमाचेशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र:- 1064
पोलीस अधीक्षक, लाप्रवि.छत्रपती संभाजीनगर :-9923023361
  • दुसरी यशस्वी सापळा कारवाई पुराडा वनपरिक्षेत्रातील कोहका उपक्षेत्र चा वनपाल आरोपी नरेंद्र सिताराम तोकलवार याचेवर गडचिरोली पथकाने केली
सविस्तर माहिती असी कि,तक्रारदार यांचे ट्रॅक्टर असुन ते घरकूल बांधकामकरीता शासकीय रॉयल्टिसह रेती वाहतूक करित असताना यातील आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे ट्रॅक्टर पकडून त्याचे ट्रॅक्टर वर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला व पुढे सुरळितपणे रेती वाह्तुकी साठी ट्रक्टर चालू देणे करिता 25,000/-रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि.गडचिरोली कडे तक्रार दिली असता लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक. याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडे 25,000/- रुपयांची सुस्पष्ट मागणी करुन तडजोडीअंती 20,000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन लाच रक्कम स्विकारताना रंगेहात मिळुन आल्याने आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन पुराडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सुरु आहे.

सदरची सापळा कारवाई श्री.दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर,श्री सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि, नागपूर,श्री संजय पुरंदरे,अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि, नागपूर यांचे मार्गदर्शन व श्री. चंद्रशेखर ढोले
पोलीस उप अधीक्षक
 ला. प्र. वि. गडचिरोली यांच्या पर्यवेक्षणात सापळा /तपास अधिकारी
         श्री. शिवाजी राठोड,पोलिस निरिक्षक व पोलिस निरिक्षक श्री. संतोष पाटिल,स.फौ.सूनिल पेद्दिवार, 
पो. हवा. शंकर डांगे, संदीप घोरमोडे, संदीप उडान.राजेश पद्मगिरवांर ,प्रविण जुमनाके हितेश जेट्टिवार, म.पो.शी. जोत्स्ना वसाके, विद्या मशाखेत्री, चालक . पो हवा राजेश्वर कुमरे यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.

  • गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य रकमेची/लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी संपर्क साधावा.
 1) डाॅ.श्री दिगंबर प्रधान, पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर.मो.नं.9923185566 
 2)श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र.
3) श्री चंद्रशेखर ढोले
पोलीस उप अधीक्षक
  ला. प्र.वि .गडचिरोली
 मो. नं.9923332755
4) श्री संतोष पाटील
 पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. गडचिरोली
मो. क्र.9892753374
5) श्री शिवाजी राठोड
पोलीस निरीक्षक
ला. प्र. वि. गडचिरोली 9422571589
कार्यालय दुरध्वनी क्रं 07132295020 
@ टोल फ्रि क्रं. 1064

  • तिसरी यशस्वी सापळा कारवाई मंगळवेढा पो.ठाण्यातील पोलीस हवालदार आरोपी महेश राचप्पा कोळी व पोलीस शिपाई आरोपी वैभव रामचंद्र घायाळ याचेवर सांगली पथकाने केली
सविस्तर माहिती असी कि,मंगळवेढा पोलीस ठाणे कडील अर्ज चौकशीवरून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून यातील तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी, तसेच तक्रारदार यांचे इतर नातेवाईक यांना गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन साठी आणि इतर सर्व सहकार्य करण्यासाठी आलोसे क्रमांक (1) व (2) यांनी आज रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये 10,00,000 रुपये लाचेची रक्कम गुन्ह्यातील रिकवरी च्या नावाखाली मागितले असल्याचे निष्पन्न झाले. 
      त्यानुसार आज रोजीच केलेल्या सापळा कारवाई मध्ये यातील आलोसे क्रमांक (2) यांनी यातील पहिला हप्ता म्हणून लाच रक्कम रुपये 5,00,000/- स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. तरी वर नमूद आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाणे जिल्हा सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सुरू आहे

सदर सापळा कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र,
डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शन व श्री उमेश पाटील, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. सांगली यांच्या पर्यवेक्षणात
       श्री. किशोर कुमार खाडे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सांगली, पोह ऋषिकेश बडणीकर, पो.ना. प्रितम चौगुले, पो. शि. अजित पाटील
सर्व नेमणूक लाप्रवि, सोलापूर यांच्या पथकाद्वारे करण्यात आली आहे

  • सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी स्वतः अगर खाजगी इसमाच्या मार्फतीने कोणतेही शासकीय काम करण्यासाठी अगर न करण्यासाठी फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली येथे संपर्क साधावा.
उमेश पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली.
मो.क्र. 9552539889
कार्यालय क्र 0233- 2373095
Toll free no 1064

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता