सोमवार, मार्च १५, २०२१

उस्मानाबाद आर.टि.ओ. दलाल पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडला !

 

5000/- रुपयांची लाच मागणी करून 5000/- रुपये लाच रक्कम स्विकारल्याने आर. टी. ओ एजेंट यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी घेतले ताब्यात

उस्मानाबाद : तक्रारदार व त्यांचे दोन मित्र असे तिघांचे टू व्हीलर व फोर व्हीलरचे लर्निंग लायसन्स साठी प्रत्येकी एक हजार रुपये यापूर्वी खाजगी आर. टी. ओ. एजेंट यांनी स्वतः स्विकारल्याचे मान्य करून तक्रारदार आणि त्याच्या एका मित्राचे टू व्हीलर व फोर व्हीलर वाहनांची ड्रायविंग टेस्टची ऑनलाईन तारीख घेऊन परमनंट लायसन मिळवून देण्यासाठी आर. टी. ओ एजेंट ओंकार नागनाथ थोरबोले, वय 22 वर्ष, रा. मंगळवार पेठ, परांडा यांनी तक्रारदार यांचेकडे 5000 रुपये लाचेची मागणी करून 5000 रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वीकारली. याबाबत पो स्टे परंडा , ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.श्री.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबादयांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके , अविनाश आचार्य, चालक इरफान पठाण यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) 

गौरीशंकर पाबळे, पो. नि, ला. प्र. वि. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) यांनी केले आहे.

www.acbmaharashtra.gov.in

प्रेस नोट क्र.1382


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा मिळालाच पाहिजे - हनुमंत कदम बामणीकर

 


वर्षे 2020 चा खरीप हंगाम पिक विमा परतावा मिळवून देण्यासाठी माननीय जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांना निवेदनाद्वारे हनुमंत कदम यांनी सोमवारी दिनांक 15 मार्च 2021 रोजी निवेदनाद्वारे विनंती अर्ज केला आहे. 2020 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी नंतर पीक विमा कंपनीकडून अचानक 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीला नुकसानीची माहिती देण्याची अट घालण्यात आली दरम्यान ग्रामीण भागांमध्ये शेतकरी अद्यापही तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला नसताना त्या माध्यमातून माहिती देणे बंधनकारक करण्यात आले परिणामी सदर प्रक्रियेतील शेत संपूर्ण माहिती नसल्याने आणि अतिवृष्टीच्या प्रचेता शेती व पिकांचे अत्यंत वाईट परिस्थिती झाल्याने कंधार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची नुकसान ची माहिती कंपनीला देणे शक्य झालं नाही ज्या काही मोजक्या शेतकऱ्यांनी माहिती दिली होती त्यांच्या शेतात देखील नुकसानीची पाहणी कंपनीकडून उशिरा करण्यात आली आहे.

विमा कंपनीने शासकीय पंचनामे ग्राह्य धरून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा परतावा द्यावा 72 तासाच्या आत ग्रामीण भागात कंपनीकडून वापर व्यापक स्वरूपात प्रचार व प्रसार झालेला नाही त्यामुळे ही शेतकऱ्यावरती ही वेळ आलेली आहे ती अट काढून शंभर टक्के शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळावा याकरता शेतकरी पुत्र हनुमंत कदम बामणीकर यांनी दिनांक 15 मार्च 2021 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नांदेड माननीय रविशंकर चलवादे सर यांना निवेदनाद्वारे हनुमंत कदम यांनी विनंती केली

https://pmfby.gov.in/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

अख्खे दुय्यम निबंधक कार्यालयच निघाले लाचखोर,दुय्यम निबंधकासह सर्वच लाचखोरांना एसीबी पथकाने रंगेहात पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या


कोल्हापूर  : आपण एखादा अधिकारी लाच घेताना जाळ्यात अशा बातम्या वाचतो.पण,कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याची बातमी कधी ऐकली नसेल.हा विक्रम नोंदविला आहे कोल्हापूर जिल्ह्यातीत दुय्यम निबंधक कार्यालयाने !

प्रकरण असे की,पन्हाळा तालुक्यातील धनगरवाडा येथील एक शेतकरी तानाजी रामू पाटील यांना आपली चार गुंठे शेतजमीन विकायची होती. त्यासाठी त्यांनी शेतजमीन खरेदीसाठी लागणाऱ्या शासकीय फीबाबत विचारणा करण्यासाठी दुप्यम निबंधक कार्यालय गाठले. पण, तेथे त्यांना भलताच अनुभव आला. दुय्यम निबंधक यशवंत चव्हाणने त्यांना माहिती तर दिली. पण, शासकीय फी व्यतिरिक्त स्वत:साठी १५०० रुपये,व संगणक ऑपरेटरला १५०० रुपये आणि कार्यालयातील सर्व कर्मचान्यांना प्रत्येकी ५०० लागतील,अशी मागणी केली.यावर तडजोड झाली आणि सर्व मिळून ३५०० रुपयांत सौदा पक्का झाला.

पण पाटील यांना लाच द्यायची नव्हतीच.त्यांनी कोल्हापूर येथील लाचतुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले व तक्रार नोंदविली.या तक्रारीवरून कार्यालयातच सापळा रचण्यात आला.ठरलेल्या दिवशी पाटील ३५०० रुपये घेऊन कार्यालयात दाखत झाले. त्यांनी मग प्रत्येकाला वाटप सुरू केले. वाटप पूर्ण होताच, दबा धरून बसलेल्या लाचतुचपत प्रतिबंधक विभागाने धाड घातली आणि दुय्यम निबंधक यशवंत सदाशिव चव्हाण यांच्यासह महिला लिपिक गीता पांडुरंग धोटे, शिपाई प्रकाश यशवंत सनगर, संगणक ऑपरेटर नितीन काटकर, सुशांत दत्तात्रेय वणिरे आणि दलाल शहाजी बळवंत पाटीत या सर्वांना रंगेहात अटक केली. या सर्वांविरुद्ध पन्हाळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. पथकाचे निरीक्षक प्रवीण पाटील आणि सहायक फौजदार श्यामसुंदर बुचडे यांच्या नेतृत्वात ही धाड घालण्यात आली..

निबंधक कार्यालयात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. अशा तक्रारी अजूनही सुरूच आहेत. त्यात मात्र संपूर्ण कार्यालयच भ्रष्ट असल्याची बाब समोर आत्यामुळे ही एकच बाब संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली आहे.

प्रथम माहिती अहवाल (FIR)

http://acbmaharashtra.gov.in/PressRelease

www.acbmaharashtra.gov.in

http://acbmaharashtra.gov.in/Statistics


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले : जाणता राजा शिवरायांचे जनक !



(शहाजीराजे भोसले जन्म दिवस)

शहाजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी बुद्धिमंत उत्तम प्रशासक व स्वतंत्र राज्यकर्ते होते. अशी मूलभूत गुण-कौशल्ये असलेले त्यांचे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते. मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई उर्फ उमाबाई हिच्या पोटी सिंदखेड येथे शहाजीराजे यांचा जन्म दि.१५ मार्च १५९४ रोजी झाला. नेहमीप्रमाणे त्यांच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. काहींच्या मते मालोजी भोसले यांची मुख्य राणी उमव्वा साठे यांची कन्या उमाबाई ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपाबाई याच शहाजी व शरीफजी यांच्या माता होत. राजस्थानमधील चित्तोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजेंचा जन्म झाला.


त्यांच्या जन्माच्या वेळी मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाऊंशी शहाजीराजेंचा विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.

मालोजीराजे हे भाऊ विठोजीराजेंसह इ.स.१५७७ मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर मालोजीराजेंनी जाधव यांची नोकरी सोडून इ.स.१५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली. मुघलशाहने इ.स.१६२४साली लष्कर खानला १.२ लाख सैन्यासह निजामशाही संपवण्यासाठी दक्षिणेस पाठविले. त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मिळाला.


शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील अर्धे अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन अर्धे सैन्य त्यांनी स्वत:कडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळ असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे त्यांचे बंदी झाले आणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. याच लढाईत त्यांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. भातवडी हे गाव अहमदनगर पासून १५ किमी अंतरावर आहें.शहाजीराजांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही या सर्व सत्ताधीशांकडे काम केले.


त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे असे – आदिलशाही : इ.स.१६२५ ते इ.स.१६२८, निजामशाही : इ.स.१६२८ ते इ.स.१६२९, मुघलशाही : इ.स.१६३० ते इ.स.१६३३, निजामशाही : इ.स.१६३३ ते इ.स.१६३६, आदिलशाही : इ.स.१६३६ ते इ.स.१६६४, पुढे ते इ.स.१६६१-६२ दरम्यान महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. म्हणजेच दि.२३ जानेवारी १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असता त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला. त्यामुळे ते खाली कोसळले व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

!! शहाजीराजेंना त्यांच्या पावन जन्म दिनी विनम्र अभिवादन !!


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

नायगाव मध्ये शनिवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटने भीषण आग आगीत सहा दुकान व एक दवाखाना जळून खाक

 आगीत 38 लाखाच्या वर नुकसान

नायगाव : नायगाव येथे शनिवारी मध्य रात्री अचानक लागलेल्या आगी मध्ये सहा दुकान व एक दवाखाना जळून खाक झाला असून गाढ झोपत नायगाव शहर असताना ही आग लागल्याने आगीचे तांडव फार मोठ्या प्रमाणात झाले आगीत 38  लाखाच्या वर रुपयांचे नुकसानझाले आहे.घटनेची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्याचे खा.चिखलीकर,व माजी आ.वसंतराव चव्हाण या सह अनेक मान्यवरआदीने भेट दिली.

नायगाव येथील डाँ हेडगेवार चौका पासून नायगाव शहराच्या मुख्य रस्त्यावर हाकेच्या अंतरावर असलेले माजी आ.वसंत चव्हाण यांचे बंधू डॉक्टर विश्वास व्यंकटराव चव्हाण यांचे हॉस्पिटल आगीत पूर्णता जळाले असून आगीत 9 लाख 81 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे तर त्यांचेच बंधू श्रीधर व्यंकटराव  पाटील चव्हाण यांचे मेडिकल चे पूर्ण औषधी व फर्निचर जळाले असून जवळपास 21 लाख 20 हजार रुपायचे साहित्य भस्मसात झाले आहे. 

      त्याच्या शेजारिच असलेले शिवराज समृत वडपत्रे यांचे गणेश लॉन्ड्री दुकान,व शिवा ग्राफिक्स चे दुकान जळाले त्यात त्याचे 2 लाख 47 हजार  रुपयांचे नुकसान झाले.किशन माधवराव कुंचेलवाड यांचे साई हेअर कटिंग सलून आगीत पूर्णता जळाले त्यात त्याचे 1लाख 84 हजार रुपयांचे नुकसान  झाले आहे.त्याच्या शेजारीच असलेले पंढरी गणपत वडपत्रे यांच्या विनोद लाँड्री चे ही आगीत 46 हजार रु.चेनुकसान झाले,  या मध्ये शेजारचे महंमद आरिफ महंमद आजम  बागवान यांचे न्यू रजा ज्यूस सेंटर चे 3 लाख 36 हजार  रुपयांचे नुकसान झाले आहे.

    सदर आग शनिवार दिनांक 13 मार्च 2021रोजी मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे लागलीअसा अंदाज आल्याने. लाईनमन ला पोलीस यंत्राने कडून फोन गेला लाईट बंद करण्यात आली.ही आग नायगाव शहर पूर्ण गाढ झोपीत होते तेंव्हा म्हणजे रात्री दिड वा नंतर लागली.या रस्त्यावर कोण्हीच नव्हते त्या मुळे लवकर कळू शकले नाही .दरम्यान नांदेड हैद्राबाद मार्गावरून जाणाऱ्या ट्रक ड्रॉयव्हरला धु दिसून आला नंतर चौकात येऊन त्याना ही आग दिसली त्याने डाँ हेडगेवार चौकात उभारून सराफा लाईन मधील गस्तीवर असलेला गुरखा यांना सांगितले गुरख्याने पोलीस ठाणे व दुकानावरील पाटीचे नाव पाहून दुकान मालकाला फोन लाऊन कळवले.


 काही वेळानंतर आग विझवण्यासाठी नायगाव ,नांदेड, सह अन्य एक गाडी आली व आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु मेडिकल व दवाखाण्याचे शेटर लवकर न निघाल्याने आगिने रौद्र रूप धारण केले.या मुळे दुकानातील सोनोग्राफी मशीन,मेडिकल औषधी साहित्य,दवाखान्याची फर्निचर ,कॅबिन, महागड्या वस्तू व महत्वाची कागदपत्र जळून खाक झाले.

सदर आगीची माजीती मिळताच तलाठी बी एस राठोड,पो.नि आर एस पडवळ यांनी घटना स्थळा ला भेट देऊन आगीचा पंचनामा केला

आगीची माहिती मिळताच एका खाजगी कार्यक्रमासाठी नायगाव शहरात आलेले खा.चिखलीकर, जे कि,डाँ विश्वास चव्हाण व श्रीधर चव्हाण यांचे मावसे (काका), आहेत त्यांनी व चव्हाण परिवाराचे मोठे बंधू माजी आ वसंत चव्हाण,माजी उप महापौर आनंद चव्हाण,आदीने भेट देऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली.


 ✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com