आगीत 38 लाखाच्या वर नुकसान
नायगाव : नायगाव येथे शनिवारी मध्य रात्री अचानक लागलेल्या आगी मध्ये सहा दुकान व एक दवाखाना जळून खाक झाला असून गाढ झोपत नायगाव शहर असताना ही आग लागल्याने आगीचे तांडव फार मोठ्या प्रमाणात झाले आगीत 38 लाखाच्या वर रुपयांचे नुकसानझाले आहे.घटनेची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्याचे खा.चिखलीकर,व माजी आ.वसंतराव चव्हाण या सह अनेक मान्यवरआदीने भेट दिली.
नायगाव येथील डाँ हेडगेवार चौका पासून नायगाव शहराच्या मुख्य रस्त्यावर हाकेच्या अंतरावर असलेले माजी आ.वसंत चव्हाण यांचे बंधू डॉक्टर विश्वास व्यंकटराव चव्हाण यांचे हॉस्पिटल आगीत पूर्णता जळाले असून आगीत 9 लाख 81 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे तर त्यांचेच बंधू श्रीधर व्यंकटराव पाटील चव्हाण यांचे मेडिकल चे पूर्ण औषधी व फर्निचर जळाले असून जवळपास 21 लाख 20 हजार रुपायचे साहित्य भस्मसात झाले आहे.
त्याच्या शेजारिच असलेले शिवराज समृत वडपत्रे यांचे गणेश लॉन्ड्री दुकान,व शिवा ग्राफिक्स चे दुकान जळाले त्यात त्याचे 2 लाख 47 हजार रुपयांचे नुकसान झाले.किशन माधवराव कुंचेलवाड यांचे साई हेअर कटिंग सलून आगीत पूर्णता जळाले त्यात त्याचे 1लाख 84 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.त्याच्या शेजारीच असलेले पंढरी गणपत वडपत्रे यांच्या विनोद लाँड्री चे ही आगीत 46 हजार रु.चेनुकसान झाले, या मध्ये शेजारचे महंमद आरिफ महंमद आजम बागवान यांचे न्यू रजा ज्यूस सेंटर चे 3 लाख 36 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सदर आग शनिवार दिनांक 13 मार्च 2021रोजी मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे लागलीअसा अंदाज आल्याने. लाईनमन ला पोलीस यंत्राने कडून फोन गेला लाईट बंद करण्यात आली.ही आग नायगाव शहर पूर्ण गाढ झोपीत होते तेंव्हा म्हणजे रात्री दिड वा नंतर लागली.या रस्त्यावर कोण्हीच नव्हते त्या मुळे लवकर कळू शकले नाही .दरम्यान नांदेड हैद्राबाद मार्गावरून जाणाऱ्या ट्रक ड्रॉयव्हरला धु दिसून आला नंतर चौकात येऊन त्याना ही आग दिसली त्याने डाँ हेडगेवार चौकात उभारून सराफा लाईन मधील गस्तीवर असलेला गुरखा यांना सांगितले गुरख्याने पोलीस ठाणे व दुकानावरील पाटीचे नाव पाहून दुकान मालकाला फोन लाऊन कळवले.
काही वेळानंतर आग विझवण्यासाठी नायगाव ,नांदेड, सह अन्य एक गाडी आली व आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु मेडिकल व दवाखाण्याचे शेटर लवकर न निघाल्याने आगिने रौद्र रूप धारण केले.या मुळे दुकानातील सोनोग्राफी मशीन,मेडिकल औषधी साहित्य,दवाखान्याची फर्निचर ,कॅबिन, महागड्या वस्तू व महत्वाची कागदपत्र जळून खाक झाले.
सदर आगीची माजीती मिळताच तलाठी बी एस राठोड,पो.नि आर एस पडवळ यांनी घटना स्थळा ला भेट देऊन आगीचा पंचनामा केला
आगीची माहिती मिळताच एका खाजगी कार्यक्रमासाठी नायगाव शहरात आलेले खा.चिखलीकर, जे कि,डाँ विश्वास चव्हाण व श्रीधर चव्हाण यांचे मावसे (काका), आहेत त्यांनी व चव्हाण परिवाराचे मोठे बंधू माजी आ वसंत चव्हाण,माजी उप महापौर आनंद चव्हाण,आदीने भेट देऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता